एकनाथ खडसे काही दिवसांनी भाजपमध्ये जातील, कुणी केला दावा?; जळगावात काय घडतंय?

शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हाचं रायगडावर अनावरण होतं. पण एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे तिकडे फिरकल्या नाहीत. तेव्हाच दोघा बापलेकींची शरद पवार गटावरील निष्ठा संपल्याचं दिसून आलं. दोघेही आता नावालाच शरद पवार यांच्यासोबत आहेत, अशी टीका अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केली. ते मीडियाशी बोलत होते.

एकनाथ खडसे काही दिवसांनी भाजपमध्ये जातील, कुणी केला दावा?; जळगावात काय घडतंय?
eknath khadseImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2024 | 8:05 PM

जळगाव | 16 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात आता आरोपप्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी एक मोठा दावा केला आहे. काही दिवसांनी एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये जातील असा दावाच संजय पवार यांनी केला आहे. संजय पवार यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे जळगावातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हेही वर्तवण्यात येत आहेत.

अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला होता. सुनेला खासदार करण्यासाठी एकनाथ खडसे यांनी उमेदवारी मागितली आणि पुन्हा उमेदवारी मागे घेण्याची खेळी खेळली. सुनेच्या उमेदवारीसाठी खडसे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना धोका दिला. त्यांना फसवलं. सुनेला भाजपकडून उमेदवारी मिळताच खडसे यांनी पळ काढला. मैदान सोडलं. नाथाभाऊ हे रणछोडदास आहेत, अशी जोरदार टीका संजय पवार यांनी केली.

नाथाभाऊंना शोभत नाही

मरेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहील असं एकनाथ खडसेंनी जाहीर करावं. हिम्मत असेल तर एकनाथ खडसेंनी रावेर लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी. खडसे यांनी स्वत:ला रावेरची उमेदवारी मागून घेतली. त्यांच्यासाठी शरद पवार गटाने जागाही सोडली. आता सुनेला उमेदवारी जाहीर होताच खडसे यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. एकाच घरात भाजपकडून सुनेसाठी खासदारकी आणि दुसरीकडे राष्ट्रवादीकडून आमदारकी नाथाभाऊंनी घेतली आहे. नाथाभाऊंनी एकाच हाताने दोन प्रसाद घेऊ नये. त्यांना ते शोभत नाही. काही दिवसांनी एकनाथ खडसे भाजपमध्ये जातील. त्यांची मुलगी रोहिणी खडसे या भाजपमधूनच विधानसभेची निवडणूक लढवतील, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

आधी राजीनामा द्या, मग टीका करा

गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी अजित पवार तसेच मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेवरही संजय पवार यांनी पलटवार केला आहे. खडसे हे अजित पवार आणि अनिल पाटील यांच्यासह 45 आमदारांच्या मतांवरच विधान परिषदेत आमदार झाले आहेत. त्यामुळे नाथाभाऊंनी आधी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा. त्यानंतर अजित पवार आणि अनिल पाटील यांच्यावर टीका करावी, असं आव्हानच त्यांनी दिलं.

त्यांचे सीडीआर तपासा

नाथाभाऊंना विधान परिषदेचा राजीनामा द्यायचा नसेल तर त्यांनी किंवा त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढवावी, आमचं त्यांना आव्हान आहे. सत्तेचा वापर एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी केला आणि स्वतःच्या कुटुंबातच पदे मागितली. आता हे आजारपणाच नाव नाव दाखवून रुग्णालयात दाखल होतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचां प्रचार करणार नाही. ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे सीडीआर तपासले. आता त्यांचे सीडीआर तपासले पाहिजे. खडसे यांचे सीडीआर तपासावे अशी विनंती मी शरद पवार तसेच जयंत पाटील यांना करणार आहे, असंही ते म्हणाले.

रोहिणी खडसे यांचा राजीनामा

रोहिणी खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे खडसे यांच्याबरोबर रोहिणी खडसे यांनी पळ काढला आहे, असा दावाच त्यांनी केला. मरेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहील असे एकनाथ खडसे यांनी सांगायला हवं. पण शरद पवार यांच्या सल्ल्यानेच भाजपमध्ये जाईल असं ते म्हणत आहेत. यातच सर्व काही आलं आहे, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.