AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गळ्यात कांद्याच्या माळा… सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी… कांद्याच्या दरवाढीसाठी महाविकास आघाडी मैदानात, कुठे कुठे रस्ता रोको?

Mahavikas Aaghadi Agitation For Onion Price: कांद्याला भावच मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मातीमोल किंमतीत कांद्याची खरेदी होत आहे. त्याविरोधात आज नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रात मोठे आंदोलन होत आहे. महाविकास आघाडी कांदा प्रश्नी आक्रमक झाली आहे.

गळ्यात कांद्याच्या माळा... सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी... कांद्याच्या दरवाढीसाठी महाविकास आघाडी मैदानात, कुठे कुठे रस्ता रोको?
कांद्याच्या दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक, महाविकास आघाडी मैदानातImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 26, 2026 | 10:54 AM
Share

Mahavikas Aaghadi Agitation For Onion Price: कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने त्याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला आहे. त्यामुळे दूर दूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चांदवड येथे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. कांदा प्रश्नी शेतकऱ्यांनी महामोर्चा काढला आहे. नाशिकमधील शेतकऱ्यांच्या क्रांती महामोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदचे आमदार अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक नेते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. सरकारच्या धोरणाविरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात येत आहे. अनेक नेत्यांनी गळ्यात कांद्याची माळ घातली आहे. तर आंदोलकांच्या गळ्यातही कांद्याची माळ आहे.

सरकार विधान परिषद निवडणुकीत गर्क

या मोर्चातून आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. या मोर्चाचे प्रतिनिधित्व सामान्य शेतकरी करत आहेत. आम्ही फक्त सहभागी होतो आहो. 18 तारखेला मोर्चा झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले 24 रुपये भाव देऊ आणि आता म्हणतात 12 रुपये दिला. आता सरकारवर प्रेशर आलं आहे. मोर्चाच्या आधी साडे पंधरा रुपये रेट वाढवला. त्यात काय होणार? नाफेडकडून फक्त 2 लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे. आमची मागणी आहे प्रदेशात देखील कांदा विकावा. ज्यांनी कांदा विकला त्यांना अनुदान द्या. आमचा अंदाज आहे शेतापासून मार्केट पर्यंत येण्यासाठी 1 लाख रुपये लागतात. पाऊस देखील कमी पडण्याची शक्यता आहे पुढचे 3 वर्ष शेतकऱ्यांनी जगायच कसे हा प्रश्न आहे. आज सरकार मध्ये चर्चा MLC कोणते सीट कोणाला ही चर्चा सुरू आहे. डिझेलसाठी रांगा कराव्या लागतात. शेतकरी काळा बाजार करतात असे नेते मंडळी आरोप करतात. शेतकर्‍यांच्या पाठीशी कोणी तरी उभ राहण गरजेचं आहे. नाफेडकडून घोळ होत असल्याचा आरोप पवारांनी केला.

शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट

शिवसेना (ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर मोठा घाणाघात केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट झालाय. कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. सरकार कांदा उत्पादक आणि जनतेची दिशाभूल करते. कोणताच भाव मिळाला नाही आणि कोणाची काही खरेदी केली नाही. या कांद्याला भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. आज आम्ही सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत.बारा रुपये दर जाहीर करून डिक्लेर करून दहा-बारा दिवस झाले. एखाद्या क्विंटल शेतकऱ्याचा खरेदी केला एखादी पावती सरकारने आम्हाला दाखवावी घोषणेला काय अर्थ असा मोठा आरोप दानवे यांनी सरकारवर केला.

हे शेतकऱ्यांचे आंदोलन आहे आमचे नाही

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा सोलापूरमध्ये कांदा प्रश्नी आंदोलन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प तात्यांच्या आहारी गेलेत. ट्रम्प बोले मोदी डोले अशी अवस्था झालीय. अदानी यांचे कर्ज माफ करण्याचे काम मोदी सरकार करत आहेत. ये तो शुरुवात है आंदोलन अभी बाकी है. आम्ही या सरकारचा धिक्कार करतोय, हे आंदोलन शेतकऱ्यांचे असल्याचे शिंदे म्हणाल्या.

महामोर्चात बैल बिथरला

आंदोलनातील बैलगाडी बिथरली. त्यामुळे आमदार रोहित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना नेते अंबादास दानवे, यांना बैलगाडीवरून उतरतपायी महामोर्चात सहभागी झाले. बैल म्हणतो सरकारला जाऊन धडकतो. जर बैलगाडी समोर सरकार आले असते तर त्यावर धडक ओले असते, अशी प्रतिक्रिया त्यावर आमदार रोहित पवार यांनी दिली.

कांद्याला मिळाला अवघा सव्वा रुपया भाव; संतप्त शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला अत्यल्प दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला प्रतिकिलो अवघा सव्वा रुपया भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी सायंकाळी बाजार समितीच्या गेटसमोरच कांदा रस्त्यावर फेकून देत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. गंगापूर-वैजापूर महामार्गावर झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सोमवारी दुपारच्या सत्रात अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी गंगापूर बाजार समितीत दाखल झाले होते. मात्र लिलावादरम्यान जाहीर झालेल्या दरांनी शेतकरी हताश झाले. नरहरी रांजणगाव येथील शेतकरी लक्ष्मण दुशिंग यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल अवघे 125 रुपये, तर अरबाज सय्यद आणि वाहेगाव येथील शेतकरी गणेश शेवाळे यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल केवळ 130 रुपये दर मिळाला. मिळालेल्या दरातून वाहतूक खर्चही निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल