AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Rain Video : नाशकात पावसाचा कहर, गोदावरी दुथडी भरून, गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला…

Nashik : गोदावरी नदीला पूर

Nashik Rain Video : नाशकात पावसाचा कहर, गोदावरी दुथडी भरून, गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला...
| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 11:34 AM
Share

नाशिक : राज्यात सर्वदूर पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईत मुसळधार पाऊस (Maharashtra Heavy Rain) कोसळतोय. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यात संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दारणा ,गंगापूर आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी (Godavari River Flood) पत्रातून 72 हजार 717 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येते आहे आज सकाळी 6 वाजेपर्यंत या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून 5 टीएमसी 61 लक्ष घनफूट पाण्याचा गोदावरी नदीतून सोडण्यात आले असून यामुळे मराठवाड्याला नक्कीच याचा फायदा होणार आहे

गोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी हळूहळू नियंत्रनात येत असल्याने गोसीखुर्द धरनाने आपल्या दरवाज्या स्थितीत बदल केला असून आता केवळ 33 पैकी 19 दरवाजे उघड़े आहे।विशेष म्हणजे काल पर्यत्न 27 दरवाजे उघड़े असतांना रात्रभर टप्पाटप्पाने गोसीखुर्द धरणाच्या दरवाज्याच्या स्थितीत बदल करण्यात आला आहे।या 19 दरवाज्यातुन 2182.82 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. विशेष सलग सातव्या दिवशी गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडे ठेवण्याची वेळ धरण प्रशासनाला आली आहे. असे असले तरी धरन प्रशासन अद्याप ही अलर्ट मोड़ वर आहे. त्यातही प्रशासनाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासन डोळ्यात तेल टाकून आहे गोसीखुर्द धरणाची स्थिति लक्षात घेता भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील नद्या दुथळी भरून वाहत असून नदी काठील गावाला सतर्क इशारा देण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झाली असून, गंगापूर धरणातून जवळपास दहा हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक शहरातील रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या जवळपास मानेपर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे. गोदावरी नदीतील पाणी पातळीत वाढ झाली आहे. महापालिका आयुक्त तसा प्रशासक रमेश पवार यांनी गोदाकाठच्या परिसरात येऊन पाहणी केली. तसेच इथल्या व्यावसायिकांना आपले दुकान इतरत्र हलवण्यासाठी निर्देश दिले आहेत. गंगापूर धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सायंकाळपर्यंत पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.