Nashik | शिक्षणासाठी जीव धोक्यात, विद्यार्थ्यांची जिद्द, पण प्रशासनाला हाय लागणार, नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात या स्थितीसाठी कोण जबाबदार?
कळमणे, बेगू ,सावरपाडा, मदळपाडा, खिरमाणी आदी गावातील विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करून शाळेला जावे लागते. मात्र, प्रशासनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कोणतेही संरक्षण नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होताना दिसून येत आहे. एखादी घटना जीवावर बेतू शकते.

मालेगाव : नाशिकच्या (Nashik) आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथील विद्यार्थ्यांना (Students) शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास दररोज करावा लागतोयं. रस्ता नसल्याने चक्क विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी केटीवेअर बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थानी अनेकदा रस्ता करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केलीयं. मात्र, प्रशासनाकडून (Administration) याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोयं. एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असणार असा प्रश्न उपस्थित केला जातोयं.
शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा दररोज जीवघेणा प्रवास
कळमणे, बेगू ,सावरपाडा, मदळपाडा, खिरमाणी आदी गावातील विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करून शाळेला जावे लागते. मात्र, प्रशासनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कोणतेही संरक्षण नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होताना दिसून येत आहे. एखादी घटना जीवावर बेतू शकते, याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. शासनाने योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधावा अशी मागणी पालकांसह, ग्रामस्थानी केली आहे.
प्रशासनानचे सोईस्कर दुर्लक्ष, विद्यार्थ्यांचे हाल
नाशिक जिल्हात दमदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक नद्यांना पुर आलायं. तसेच गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीयं. त्याच सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथील बंधाऱ्यावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी धोकादायक पध्दतीने प्रवास करावा लागतोयं. पुराच्या पाण्यात वाढ झाल्याने कधी कधी विद्यार्थ्यांच्या कंबर इतके पाणी देखील असते. यामुळे एखादी घटना घडण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवली जातंय.
