AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : स्वयंघोषीत नाही तर खऱ्या देवाकडे आमचे गाऱ्हाणे, ‘देवा तूच सांग कॅम्पेन’मधून राष्ट्रवादीने खसाखसा मीठ चोळले, पवार पॉवर दाखवणार?

Sharad Pawar NCP : 'देव तूच सांग' या कम्पेनमधून देवाभाऊला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने केला. तर या कॅम्पेनमधून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे. राज्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Sharad Pawar : स्वयंघोषीत नाही तर खऱ्या देवाकडे आमचे गाऱ्हाणे, 'देवा तूच सांग कॅम्पेन'मधून राष्ट्रवादीने खसाखसा मीठ चोळले, पवार पॉवर दाखवणार?
शरद पवार
| Updated on: Sep 14, 2025 | 12:03 PM
Share

Deva Tuch Sang Campaign : ‘देवा तूच सांग’ या कॅम्पेनने ‘देवाभाऊ’ला जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नाशिकमध्ये आज एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मोठा धमाका करण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यात पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचा रोख नेमका कसा असेल याची चुणूक दाखवण्यात आली. आगामी निवडणुकीत पवार पॉवर दाखवतील हाच संदेश यातून देण्यात आल्याची चर्चा आहे.

देवाभाऊ कॅम्पेनला देवा तूच सांगने उत्तर?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नाशिक जिल्ह्यात विविध दैनिकात जाहिरात दिली. शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, कांदा निर्यातबंदी, अतिवृष्टीमुळे झालेल नुकसान, लाडक्या बहिणींना २१०० रुपये, युवाना नोकरी या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार? देवा तूच सांग म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भव्य आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचं पक्षाकडून आवाहन करण्यात आलं. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नाशिक मधे भव्य आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

उद्या आक्रोश मोर्चा

गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवाभाऊ नावाने बॅनर लागले आहेत या सगळ्या जाहिरात कॅम्पेनिंग ला आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नाशिक मधील स्थानिक वृत्तपत्रातून उत्तर देण्यात आल आहे कारण आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक दिवसीय शिबीर नाशिक मधे पार पडत आहे आणि उद्या शरद पवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात नाशिक मधे भव्य असा आक्रोश मोर्चा होणार आहे या पाश्वभूमीवर आज वृत्तपत्रात देवा तू सांग ना?या आशयाचे जाहिरात देऊन मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर कधी मिळणार असा सवाल या जाहिरातीतून उपस्थित केला आहे

मायबाप विठ्ठलाला साकडे

या शिबिरीला माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची अनुपस्थितीत सकाळच्या सत्रात दिसली. तर सध्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारवर चांगलेच तोंडसूख घेतले. कुणाला आव्हान देण्याचा आमचा प्रयत्न नाही तर राज्यातील समस्या समोर आणण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे म्हणाले. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये असं शिबीर आयोजित केल्याचे ते म्हणाले. उद्या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले. तर स्वयंघोषीत नाही तर परमेश्वराला साकडं घातल्याचं विठ्ठलाला साकडं घातल्याचा सूर आळवला.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.