Gulabrao Patil : ‘दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नका’, गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना खोचक टोला, तुफान फटकेबाजीने खसखस पिकली
Gulabrao Patil on Ajit Pawar: दाबून मत द्या आणि मोठा निधी मिळवा अशी काहीशी योजना नगरपालिका निवडणुकीत काही पक्षांनी राबवली आहे. त्यावरून महायुतीतच वाक् युद्ध पेटले आहे. शिंदे सेना आणि राष्ट्रवादीत त्यावरून सध्या जुंपल्याचे दिसून येत आहे. गुलाबराव पाटलांनी यावरून अजितदादांना मोठा चिमटा काढला.

Gulabrao Patil Criticised: मत द्या, विकासासाठी निधी देतो असो सर्रास प्रचार नगपालिका निवडणुकीत करण्यात आला. अजितदादांनी याविषयीची रोखठोक भूमिका बारामती, मराठवाड्यासह अकोल्यातही मांडली. मत दिलं नाही तर विकासासाठी निधी मिळणार नाही असेच नेत्यांचा सूर उमटत आहे. दरम्यान अजितदादांच्या (Ajit Pawar) वक्तव्याचा शिंदे सेनेचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला. त्यावरून शिंदे सेना आणि राष्ट्रवादीत त्यावरून सध्या जुंपल्याचे दिसून येत आहे.
आताही तुम्हाला लक्ष्मी मिळेल तुम्ही घराबाहेर झोपा
नाशिकमधील सभेत गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. पहिले बायको नव्याऱ्यांकडे पैसे मागायच्या. आता नवरा बायकोकडे पैसे मागतो. ही निवडणूक शहर विकासाची आहे. अर्ध्यरात्री रक्त देणारी माणसं तुमच्यासमोर उभे केली आहेत. आता मटण देतील. मटण त्यांचे खा बटन आपले दाबा. ज्याचा बँड वाजवायचा आहे लोकांनी ठरवले आहे. त्याच्याकडे फक्त पैसा आहे. विधानसभा निवडणूक आधी लक्ष्मी आली. आताही तुम्हाला लक्ष्मी मिळेल तुम्ही घराबाहेर झोपा असा चिमटाही पाटील यांनी काढला. मागच्यावेळी आमदारकीचं 21 तारखेला मतदान होतं.18 तारखेला लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली.ऊठ भक्ता काय झोपलाय, मी आलीये तुला प्रसन्न करायला. बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही, 1 तारखेला लक्ष्मी येणार आहे, ऊठ भक्ता काय झोपलाय ऊठ, असे वादग्रस्त विधानही पाटील यांनी केली.
दुसऱ्याची पोरं आपली सांगू नये
आता पाणी योजना आम्ही आणली त्यांनी सांगितले आमची आहे.आता तर नगरविकास खाते आपल्याकडे आहे नगरविकास खाते मे माल है. मी मतदारसंघात बौद्ध विहार कामे केली सर्व समाजासाठी कामे केली. एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघात 350 कोटी रुपये दिले. तिकडे मुंडकं भाजपचे हात राष्ट्रवादीचे कमर उबठाचे, पाय मनसेचे आपल्याकडे एक सरळ आहे. सरसकट शिवसेना आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
रात्री 4 वाजेपर्यंत पक्षाचा सरकारचा काम करणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहे. अजित पवारांनी मला विचारले विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी भगूर ला जाऊ का? मी सांगितले जा आणि पाणीपुरवठा योजनेचे घोषणा केली. शहण्यासारखे वागावे, दुसऱ्याचे पोर आपले सांगू नये, असा खोचक टोला पाटील यांनी अजितदादांना लगावला. छोटे छोटे लोकं बाळासाहेबांनी मोठे केले. भुजबळ भाजीपाला विकायचे, नारायण राव काय करायचे, कोंबडी विकायचे, आपलं लव्ह मॅरेज आहे त्यांच्यासोबत सर्व उमेदवार दणक्यात निवडून द्यायचे आहेत असे गुलाबराव पाटील म्हणाले.
