वेळ बदलते, अधिकाऱ्यांना सांगतो… कुणाला सोडणार नाही; उद्धव ठाकरे कडाडले

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून कोकणच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. आजही त्यांनी सभांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच धूत पापेश्वर मंदिरात जाऊन सपत्नीक दर्शन घेतलं. यावेळी ते मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणीही करणार आहेत.

वेळ बदलते, अधिकाऱ्यांना सांगतो... कुणाला सोडणार नाही; उद्धव ठाकरे कडाडले
uddhav thackeray Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 05, 2024 | 4:51 PM

मनोज लेले, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, राजापूर | 5 फेब्रुवारी 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटच्या दिवशी शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांसह अधिकाऱ्यांवरही जोरदार हल्ला चढवला आहे. राजन साळवींच्या विरोधात कोणी तक्रार केली? काय मिळालं तुम्हाला? सत्ता येते आणि जाते. अधिकाऱ्यांना सांगून ठेवतो, वेळ बदलते. कोणाला सोडणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसेच राजन साळवींच्या विरोधात जो उमेदवार आहे, तो जे पैसे वाटतोय त्याची चौकशी करा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे आज राजापुरात आहे. राजपूरमध्ये एका सभेत बोलताना त्यांनी हा इशारा दिला. आज मुद्दाम राजापूरात आलोय. इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. बाजूलाचा पवित्र दर्गा आहे. जो कोणी देशाला आपलं मानतो, देशासाठी मरायला तयार आहे. लढायला तयार आहे हे आमचं हिंदुत्व आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सर्वांचे दिवस फिरतात…

यावेळी उद्धव ठाकरे यांनी एसीबीने साळवी यांच्या घरातील संपत्तीची किंमत केलेली यादी वाचून दाखवली. या यादीवर सावंत नावाच्या व्यक्तीची सही आहे. राजन साळवींना धन्यवाद द्यायला आलो आहे. सुशांत चव्हाण तुम्ही महाराजांच्या मूर्तीची किंमत केली आहे. किती तर पाच हजार रुपये. बाळासाहेबांचा फोटो आणि खुर्ची याची किंमत दहा हजार रुपये. माझ्या वडिलांची किंमत मिंध्याना कळली पण तुम्हाला नाही कळली. सर्वांचे दिवस फिरतात हे लक्षात ठेवा आता त्यांचे दिवस आहेत, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

सात पिढ्या आल्या तरी…

तुमच्या सात पिढ्या आल्या तरी त्याची किंमत करता येणार नाही. तुमच्या आई वडिलांची किंमत केली तर तुमची किंमत किती? मिंध्याना त्यांच्या वडिलांची किंमत कळाली नाही म्हणून माझा बाप चोरताहेत, असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढवला.

सपत्नीक दर्शन

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी धूत पापेश्वर मंदिरात सपत्नीक दर्शन घेतलं. पुन्हा ठाकरे राज येऊ दे, असं साकडं यावेळी पापेश्वर देवाला घालण्यात आलं. पुन्हा शिवसेना ऊबाठाची सत्ता येऊ देत, असं गाऱ्हाणंही घालण्यात आलं. मंदिराच्या परिसरात नव निर्माण सुरू आहे. त्या कामाची उद्धव ठाकरे पाहणी करणार आहे. आमदार राजन साळवी यांच्या फंडातून मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे.

Non Stop LIVE Update
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.