Maharashtra OBC Reservation LIVE | ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं चक्का जाम आंदोलन, महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप आक्रमक

| Updated on: Jun 26, 2021 | 5:50 PM

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी राज्यभरात भाजपकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. ( )

Maharashtra OBC Reservation LIVE | ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं चक्का जाम आंदोलन, महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप आक्रमक
obc reservation protest

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Reservation) मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. पुणे,मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. OBC Reservation Quota Cancel in Maharashtra live updates BJP Protest Against Mahavikas Aghadi Congress BJP shiv sena Government latest news today

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन

आम्हाला गर्दी करण्याचा शौक नाही. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं  50 वर्षांचं आरक्षण 100 टक्के जात असेल तर आमचा नाईलाज झाला आहे, असं विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस म्हणाले.  पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार पडल्या तर एक उदाहरण निर्माण होईल. उद्या त्यामुळे ओबीसी आरक्षण पुन्हा येणारच नाही, त्यामुळे सरकारचा नेमका डाव काय आहे हे कळत नाही.  सजग प्रहरी म्हणून धोका पत्करून ही आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे. जर सरकार जागं झालं असत तर आम्हाला आंदोलन करावं लागला नसतं. ओबीसीआरक्षणासाठी जे जे करावे लागेल, ते सर्व आम्ही करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर जोरदार टीका केली.
सरकारच्या नाकर्तेपणामुळं आरक्षण गेलं, पंकजा मुंडे यांचं पुण्यात टीकास्त्र
मी मंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते… ओबीसीचे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरती गेले… याच्याविषयी कोर्टाच्या तारखा चालू होत्या… ते आरक्षण कसे योग्य आहे हे सांगण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये काही डाटा सबमिट करत होतो… आम्ही काही सर्व्हे करत होतो… आम्हाला कोर्टाने वेळ दिला होता… तेवढ्यात आचार संहिता लागली त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि जवळपास पंधरा महिने झालं हे सरकार फक्त कोर्टाकडून तारखाच घेत आहे… इंपिरिकलच्या आधारे कृष्णमूर्ती यांच्या मतांच्या आधारावर सरकारने हा सगळा डाटा सबमिट करावा असं त्यांनी सांगितलं पण या सरकारने पंधरा महिन्यांमध्ये कुठलाही डाटा तयार केला नाही… सरकार फक्त गोल गोल फिरवतंय, असं म्हणत सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलं, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात एल्गार

संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन होत आहे. ओबीसींचं आरक्षण राज्य सरकारमुळे गेलं. सरकारचा नाकर्तेपणा आता जनतेसमोर आलाय. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहे. जो पर्यंत महाराष्ट्र सरकार डाटा गोळा करणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आंदोलनानंतर पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शेलार, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन यांचं मुंबईत तर प्रविण दरेकर यांच  ठाण्यात आंदोलन

भाजप नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. ओबीसी आरक्षण हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, रद्द झालेलं आरक्षण मिळालंच पाहिजे, अशा घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शेलार आणि महाजन यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. सरकार ओबीसी आरक्षणविरोधी असल्याची टीका त्यांनी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ठाणे येथे चक्काजाम आंदोलन केलं.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Jun 2021 01:18 PM (IST)

    नवी मुंबईत चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात भाजपचं चक्का जाम आंदोलन

    ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य भरात आंदोलन करण्यात आले.नवी मुंबई व कळंबोली येथे देखील चक्का जाम करण्यात आले. भाजपच्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वखाली वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चक्का जाम करण्यात आला.. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात ठीकठिकाणी भाजपकडून आज अर्थात 26 जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. विविध ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि ओबीसी नेते रस्त्यावर उतरले आहेत.भाजपचे दिग्गज नेते यावेळी रस्त्यावर उतरले आहेत. चक्काजाम आंदोलन होत असून इथे हजारोच्या संख्येनं भाजप कार्यकर्त रस्त्यावर उतरले आहेत.

  • 26 Jun 2021 01:14 PM (IST)

    जो तो आपलं आपलं बघत असतो, ओबीसींचं कोण बघणार?: छगन भुजबळ

    – छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे दैवत आहेत, हे सर्वांना माहित आहे

    – जो तो आपलं आपलं बघत असतो, ओबीसींचं कोण बघणार?

    – ओबीसी खात्याची जबाबदारी पहिल्यांदाच ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांना.

    – स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही लढाई सुरु झाली, आजंही सुरुच आहे

    – आमचे अहवाल कचऱ्याच्या पेटीत फेकून दिले

    – २७ टक्के आरक्षण लागू करणारं महाराष्ट्रातलं पहिलं राज्य

  • 26 Jun 2021 01:13 PM (IST)

    पंकजा मुंडे पिंपरी चिंचवडमधील आंदोलन स्थळी दाखल

    -पिंपरी चिंचवड शहरात भाजप कडून ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू,  पंकजा मुंडे या आंदोलनात होणार सहभागी

  • 26 Jun 2021 01:07 PM (IST)

    तुमच्या छत्तीसगड, राजस्थानात ओबीसी आरक्षण सुरु, महाराष्ट्रातलं का गेलं? , देवेंद्र फडणवीसांचा सवाल

  • 26 Jun 2021 01:06 PM (IST)

    पिंपरी चिंचवड शहरात भाजप कडून ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू

    पिंपरी चिंचवड

    -पिंपरी चिंचवड शहरात भाजप कडून ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू

    -पंकजा मुंडे या आंदोलनात होणार सहभागी

  • 26 Jun 2021 01:05 PM (IST)

    OBC आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? फडणवीस म्हणाले, 'लिहून घ्या, 2 नावं सांगतो!'

  • 26 Jun 2021 01:03 PM (IST)

    आता सत्तेवर आलात, भविष्यात जनता दारात उभं करणार नाही, OBC आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर घणाघात

  • 26 Jun 2021 01:01 PM (IST)

    एकमेकांवर आरोप करुन ओबीसींचा प्रश्न सुटणार नाही -विजय वडेट्टीवार

    - आधी मुंडे साहेब होते, आज भुजबळ साहेब ओबीसी साठी लढतायत

    - एकमेकांवर आरोप करुन ओबीसींचा प्रश्न सुटणार नाही

    - पक्षाचे विचार बाजूला ठेऊन, पक्षाची झुल बाजूला ठेऊन, ज्या समाजाने मोठं केलं त्या ओबीसी समाजासाठी लढावं

    - पावणेपाचशे जातींचा ओबीसी समूह आहे

    - प्रस्थापितांविरोधात लढण्यासाठी विस्थापितांनी एकत्र यायला हवं

    - आजंही ओबीसीतला घटन गावाबाहेर पालात राहतो

  • 26 Jun 2021 12:58 PM (IST)

    संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळत तोच नेता होऊ शकतो - मुख्यमंत्री

    कोल्हापूर

    उद्धव ठाकरे

    हा योगायोग म्हणा किंवा मुहूर्त म्हणा पण यात एक ओलावा आहे

    न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण हा भाग आहे

    संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळत तोच नेता होऊ शकतो

    संभाजीराजे तुम्ही संघर्ष थांबवून संवाद सुरू केला

    अनेकजण आजून ही आदलआपट करत आहेत त्यांच्या बद्दल आता जास्त बोलणार नाही

  • 26 Jun 2021 12:58 PM (IST)

    कुडाळमध्ये आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या नेऋत्वाखाली भाजप कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

    सिंधुदुर्ग -

    ओबीसी आरक्षण मुद्यावरून भाजप आक्रमक

    कुडाळमध्ये आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या नेऋत्वाखाली भाजप कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

    भर पावसात शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर

    राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

    कुडाळ येथील भाजप कार्यालय ते मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ नाका येथे करणार चक्काजाम आंदोलन

  • 26 Jun 2021 12:55 PM (IST)

    जर मी आरक्षण परत आणू शकलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईल - देवेंद्र फडणवीस

    मी आज सर्व ओबीसी नेत्यांना आव्हान करतो, तुमची आमची दुश्मनी नाही, तुम्ही कुठल्याही पक्षात असाल, पण ओबीसीप्रती इमानदार असाल, तरी आम्ही तुमच्यासोबत उभं राहायला तयार आहे, राजकारणाशिवाय तुमच्यासोबत उभं राहायलं तयार आहे

    मी दाव्याने सांगतो पुढच्या तीन चार महिन्यात आपण ओबीसी आरक्षण परत आणू शकतो,

    खऱ्या अर्थाने आमच्या हाती सूत्र दिलीत तर, मी दाव्याने सांगतो ओबीसीचं राजकीय आरक्षण परत आणू शकलो नाही तर राजकारणातून संन्यास घेईल

  • 26 Jun 2021 12:51 PM (IST)

    आता आंदोलन सुरू झालं आरक्षण मिळत नाही तो पर्यंत कोणी शांत बसणार नाही - देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस -

    तथाकथित विचार वंत आता मोदी नी डेटा दिला नाही हे सांगत फिरणार हा त्यांचा प्रयत्न आहे

    मात्र राज्याने हे काम करावं लागतं हे त्यांना माहीत नाही

    आम्ही या खोट बोलणार्यांना उघड केल्याशिवाय राहणार नाही

    पोलिसांजवल गाड्या कमी आहे त्यामुळे जेवढ्यान जमत तेवढे अटक घ्या

    आपलं आंदोलन सरकार विरोधात आहे पोलिसांच्या विरोधात नाही

    आता आंदोलन सुरू झालं आरक्षण मिळत नाही तो पर्यंत कोणी शांत बसणार नाही

  • 26 Jun 2021 12:50 PM (IST)

    ताटात लोणच्या इतकंच ओबीसी नेत्यांचं महत्त्व - देवेंद्र फडणवीस

    या सरकारमध्ये ओबीसी नेत्यांचं महत्त्व हे एखाद्या ताटात चटणी, कोशींबीर, लोणचे असते, तितकंच आहे

    ते खाजगीत काय बोलतात हे तुम्हाला सांगू शकत नाही

    त्यांना राजकीय भविष्य आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या राजकीय मालकांनी ने सांगितलं ते तितकंच करतात

    हे षड्यंत्र आहे, फेब्रुवारीत निवडणुका होणार आहेत, ८५ टक्के महाराष्ट्र निवडणुकीला जातं, तोपर्यंत हे आरक्षण होऊ द्यायचं नाही, ओबीसींना वंचित ठेवायचं

    म्हणून आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल, आपला दबाव आणावाच लागेल, सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडावंच लागेल

  • 26 Jun 2021 12:39 PM (IST)

    तर ५० टक्क्याच्या आतलं आरक्षण वाचलं असतं - देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस -

    १३ डिसेंबर २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाने आदेशात सांगितलं की के कृष्णमूर्ती यांच्या जजमेंटमध्ये सांगितलं प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे ओबीसी आरक्षण आहे, त्या ठिकाणी राज्य मागास वर्ग आयोग तयार करुन दर दहा वर्षांनी इम्पेरिकल डाटा तयार करा आणि त्यावरुन राज्यसरकारला सांगितले की याचा कम्लॅअन्स करा पुढच्या तारखेला आम्हाला सांगा

    हे ५० टक्क्याच्या आतल्या आरक्षणाबाबत होतं

    यामध्ये राज्य सरकारला इतकंच करायचं होतं की राज्य मागास वर्ग आयोग तयार करुन त्यांना इम्पेरिकल डाटा तयार करण्यासाठी एजन्सी नेमायची होती, तसं अॅफीडेवि़ट लिहून सादर करायचं होतं, त्यामुळे सर्व हे ५० टक्क्याच्या आतलं आरक्षण वाचलं असतं, मात्र या सरकारने १५ महिने अॅफीडेवि़टच केलं नाही

    सातवेळी तारखा घेतल्या, शेवटच्या तारखेला त्या आदेशात लिहिलंय काी राज्य सरकारला वेळकाढू धोरण करायचं आहे, हे गंभीर नाहीयेत, हे लोक जाणीवपूर्वक सांगितललेली कारवाई करत नाहीत, म्हणून आम्ही ५० टक्क्याच्या आतलंही आरक्षण रद्द करतो

    देशाच्या प्रत्यंक राज्यात ओबीसी आरक्षण आहे आमि तुमचे १५ महिने पूर्ण होता होता केवळ महाराष्ट्रातलं आरक्षण गेलं आहे

  • 26 Jun 2021 12:27 PM (IST)

    यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील - देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस -

    1500 ठिकाणी ओबीसी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले

    या सरकारला आता ओबीसी आरक्षण द्यावं लागेल नाही तर खुर्ची खाली करावी लागेल

    मोदी जी कडे बोट दाखवत त्यांनी डेटा दिला नाही असं सांगतात मात्र

    या सरकार मधील मंत्री एक मेकांच कपडे फाडायला तयार आहे

    हे सरकार प्रत्येक गोष्टीत मोदी कडे बोट दाखवत यांच्या बायकांनी याना मारलं तरी ते मोदी जी नी केलं अस म्हणतील

    ओबीसी खातं आम्ही तयार केलं, वडेट्टीवार त्या खात्याचे मंत्री म्हणून मिरवतात

    ओबीसीआरक्षणाचे खरे मारेकरी कोण?

    या संदर्भातील याचिकाकर्ते सुद्धा काँग्रेसशी संबंधित आहेत

    त्यांची उठबस त्यांच्या कार्यालयात आहे

    ५० टक्क्यांच्या वरचं आरक्षण भाजप सरकारने वाचवलं, एक दिवसात ऑर्डिनन्स पारित केला

    पण, सरकार गेली आणि या सरकारने आमचा ऑर्डिनन्स लॅप्स केला

  • 26 Jun 2021 12:08 PM (IST)

    साताऱ्यात आमदार जयकुमार गोरे पारंपरिक गजी नृत्यातील ढोल वाजवत आंदोलनात सहभागी

    सातारा :

    दहिवडी येथे अनोख्या चक्काजाम आंदोलनाला सुरुवात.

    भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन...

    आमदार जयकुमार गोरे पारंपरिक गजी नृत्यातील ढोल वाजवत आंदोलनात झाले सहभागी

    ओबीसी राजकीय आरक्षण लागू करा या मागणीसाठी दहिवडी शहरात चक्काजाम आंदोलन

    छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी सरकार मध्ये राहून आंदोलनाची नौटंकी करावी

    ओबीसी राजकीय आरक्षण लागू होत नाही तो पर्यंत यापुडील एक हि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडूक होऊ देणार नाही

    आ जयकुमार गोरे यांचा इशारा....

  • 26 Jun 2021 12:07 PM (IST)

    चंद्रपुरात शहरात प्रवेश करण्याचा मुख्य मार्गावर पडोली चौकात हजारो भाजप कार्यकर्त्यांनी रोखला मार्ग

    चंद्रपूर -

    ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपचे चक्काजाम

    शहरात प्रवेश करण्याचा मुख्य मार्गावर पडोली चौकात हजारो भाजप कार्यकर्त्यांनी रोखला मार्ग

    भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

    पडोली चौकात लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा, शहर-ग्रामीण भागातून ओबीसी कार्यकर्त्यानी लावली आंदोलनाला हजेरी

    राज्य सरकार ओबीसींच्या आरक्षण हिरावण्यासाठी कारणीभूत असल्याचे प्रतिपादन

  • 26 Jun 2021 12:06 PM (IST)

    तर ओबीसींचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी करावं, छगन भुजबळ यांची खुली ऑफर

  • 26 Jun 2021 12:06 PM (IST)

    सौ चुहे खाके बिल्ली हज को चली, यंत पाटलांची भाजपच्या आंदोलनावर  खरमरीत टीका

    राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. सौ चुहे खाके बिल्ली हज को चली, ट्वीट करत जयंत पाटलांची भाजपच्या आंदोलनावर  खरमरीत टीका

  • 26 Jun 2021 12:01 PM (IST)

    ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने संपूर्ण राज्यात ताणतणाव, ते मिळेपर्यंत भाजप लढेल - चंद्रकांत पाटील

    कोल्हापूर

    चंद्रकांत पाटील

    ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने संपूर्ण राज्यात ताणतणाव, ते मिळेपर्यंत भाजप लढेल

    सर्वोच्च न्यायालयाने १५ वेळा महाविकास आघाडी सरकारला सांगितलं की इम्पेरिकल डाटा द्या, हा इंग्रजी शब्द कदाचित त्यांना कळाला नसेल

    हे म्हणतात केंद्राने दिला नाही, पण इम्पेरिकल डाटा हा राज्याच्या मागासवर्गीय आयोगाने तयार करायचा असतो, केंद्राचा संबंध काय

    छगन भुजबळांना माझं आव्हान आहे त्यांनी कोल्हापूरच्या बिंदू चौकात देवेंद्र फडणवींसांसमोर यावे, ज्यात कोण कोणाला फसवतंय ते कळू द्या

    ओबीसी समाजाला सांगा आरक्षण कोणामुळे गेलं

  • 26 Jun 2021 11:43 AM (IST)

    पुण्याच्या भाजपच्या चक्का जाम आंदोलनात नेत्या पंकजा सहभागी

    पुण्याच्या भाजपच्या चक्का जाम आंदोलनात नेत्या पंकजा मुंडे सहभागी

    परत द्या परत द्या ओबीसी आरक्षण परत द्या, पंकजा मुंडेंची घोषणा

    छोट मन ठेवून तुम्ही काहीही मिळवणार नाही, नशिबाने तुम्ही सरकारमध्ये आलात

    पुन्हा जनता तुम्हाला दारातही उभं करणार नाही

    मी ओबीसींना सांगू इच्छिते तुम्ही आपलं मन तुटू देऊ नका, संघर्षाची भावना तुटू देऊ नका, ओबीसींच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे

    पी़डितांचा वाली होण्यासाठी मुंडेसाहेब राजकारणात आले, त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार

    सरकारमधील मंत्री आंदोलनाची भाषा करतात हे तुम्हाला शोभतं का

    आम्ही सरकारमध्ये असताना आम्ही आंदोलन केलं नाही

    यांनी ५० टक्क्यांच्या आरक्षणाचा मुद्दा सुरु असताना या सरकारने ५० टक्क्यांच्या आतलंही आरक्षण संपुष्टात आणलं

    या सरकारला लाज वाटली पाहिजे

    ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही

  • 26 Jun 2021 11:41 AM (IST)

    आशिष शेलार, मनोज कोटक अर्ध्या तासाभरापासून पोलीस ठाण्यात

    आमदार आशिष शेलार आणि खासदार मनोज कोटक यांना नवघर पोलिसांनी घेतलं ताब्यात

    - अर्ध्या तासापासून पोलिस स्टेशनच्या आत

    बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

  • 26 Jun 2021 11:40 AM (IST)

    दक्षिण मुंबईतील भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदेलन, महाजन, लोढा सहभागी

    दक्षिण मुंबईतील भाजपच्या कार्यालयाबाहेर भाजपचं चक्का जाम आंदेलन,

    भाजप नेते गिरीष महाजन, मंगल प्रभात लोढा आंदोलनात सहभागी झाले आहेत

  • 26 Jun 2021 11:39 AM (IST)

    औरंगाबादेत भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

    औरंगाबाद ब्रेकिंग :-

    भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

    विश्वशंकर मंगलकार्यालायत कार्यकर्त्यांना ठेवलं ताब्यात

    ताब्यात घेतल्यानंतरही भाजपचे आंदोलन सुरूच

    भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरूच

  • 26 Jun 2021 11:37 AM (IST)

    भाजपचा रस्ता रोको, नागपूर-औरंगाबाद एक्सप्रेस हायवेची वाहतूक ठप्प

    अमरावती :

    ओबीसीचे राजकीय आरक्षण टिकवण्याच्या मागनीसाठी आज राज्यभर भाजपाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे

    तर अमरावती जिल्ह्यातील देवगाव येथे भाजपने रास्ता रोको आंदोलन केले आहे

    त्यामुळे नागपूर औरंगाबाद एक्सप्रेस हायवेची वाहतूक ठप्प झाली आहे

  • 26 Jun 2021 11:32 AM (IST)

    नागपुरच्या व्हेरायटी चौकात युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक, रोखली बस वाहतूक

    नागपूर -

    व्हेरायटी चौकात युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक

    इंटर्निटी मॉल समोर रोखली बस

    मोठ्या प्रमाणात सरकार विरोधात घोषणा देत रोखली बस वाहतूक

  • 26 Jun 2021 11:31 AM (IST)

    खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या OBC नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? रोहिणी खडसेंचा सवाल

  • 26 Jun 2021 11:30 AM (IST)

    नवी मुंबईत भाजपच चक्काजाम आंदोलन सुरू

    नवी मुंबई ब्रेकिंग

    -नवी मुंबईत भाजपच चक्काजाम आंदोलन सुरू

    -वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चवकात आंदोलन सुरू

    -नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू

  • 26 Jun 2021 11:28 AM (IST)

    ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकार आणि ओबीसी संघटना लवकरंच सर्वोच्च न्यायालयात जाणार - भुजबळ

    छगन भुजबळ -

    - ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं म्हणून राज्य सरकार आणि ओबीसी संघटना लवकरंच सर्वोच्च न्यायालयात जाणार

    - केंद्र सरकारकडे ओबीसींच्या इंम्पेरीकल डेटाची मागणी आम्ही करतोय

    - भाजपचं आजचं आंदोलन राजकारणापोटी आहे. त्यांना दाखवायचं आहे की आम्ही ओबीसोबत आहोत

    - देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्त्व करावं आणि केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरीयल डेटा मागावा

    - गेल्या १५ महिन्यात कोरोनामुळे कुणी कुणाच्या घरी जाऊ शकत नव्हतं, म्हणून इंम्पेरीकल डेटा गोळा करणं शक्य झालं नाही

    - कोरोना संपेपर्यंत इंम्पेरीकल डेटा गोळा करणं शक्य नाही

    - … तर ओबीसींचं नेतृत्त्व देवेंद्र फडणवीस यांनी करावं

  • 26 Jun 2021 11:18 AM (IST)

    कोल्हापुरात चंद्रकांत पाटील आंदोलनाच्या ठिकाणी आले

    कोल्हापूर

    ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात भाजपच्या रास्ता आंदोलनाला सुरुवात

    आंदोलनात माजी खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमोल महाडीक सहभागी

    चंद्रकांत पाटील आंदोलनाच्या ठिकाणी आले

    राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आंदोलनात सहभागी होणार

  • 26 Jun 2021 11:14 AM (IST)

    मावळमध्ये भाजपचे चक्काजाम आंदोलन सुरु

    पुणे

    मावळ

    - मावळमध्ये भाजपचे चक्काजाम आंदोलन सुरु

    - मावळ मधील पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गा उर्से येथे बंद

    - माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू

    - वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत

  • 26 Jun 2021 11:12 AM (IST)

    आरक्षणाच्या विषयावर सरकारला ओबीसी समाजाच्या संतापाला सामोरं जावं लागेल - प्रविण दरेकर

    आरक्षणाच्या विषयावर सरकारला ओबीसी समाजाच्या संतापाला सामोरं जावं लागेल - प्रविण दरेकर

  • 26 Jun 2021 11:11 AM (IST)

    डोंबिवली येथील टाटा नाका चौकात भाजपच्या चक्काजाम आंदोलन सुरु

    डोंबिवली येथील टाटा नाका चौकात भाजपच्या चक्काजाम आंदोलन सुरु

    डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू

  • 26 Jun 2021 11:11 AM (IST)

    ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात भाजपच्या रास्ता आंदोलनाला सुरुवात

    कोल्हापूर

    ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरात भाजपच्या रास्ता आंदोलनाला सुरुवात

    आंदोलनात माजी खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमोल महाडीक सहभागी

    प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील थोड्याच वेळात आंदोलनस्थळी येणार

  • 26 Jun 2021 11:10 AM (IST)

    नाशकात भाजप आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले यांच्यासह अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

    नाशिक - आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

    भाजप आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले यांच्यासह अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

    मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी

  • 26 Jun 2021 11:09 AM (IST)

    भाजप नेत्यांचे फोटो असलेले फलक, जरा याद करो कुर्बानी म्हणच युवक काँग्रेसचे नागपुरात लावले,

    नागपूर -

    भाजपच्या ओबीसी आरक्षणाच्या आंदोलन ठिकाणी लागलेल्या भाजपच्या फलकावर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपातील ओबीसी नेत्यांचे फोटो लावून जरा याद करो कुर्बानी म्हणून लावले फलक

    भाजपचे नेते पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडेचे फोटो लावून जरा याद करो कुर्बानी असा मजकूर लिहत केले युवक काँग्रेस ने फलक आंदोलन

  • 26 Jun 2021 11:04 AM (IST)

    ठाकरे सरकारच्या विरोधात वसईत भाजपाच्या चक्का जाम आंदोलनाला सुरुवात

    वसई -

    ठाकरे सरकारच्या विरोधात वसईत भाजपाच्या चक्का जाम आंदोलनाला सुरवात झाली आहे

    भाजपा आ प्रसाद लाड, वसई विरार शहर जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली वसई पश्चिम डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात शेकडो भाजपा कार्यकर्त्यानी चक्का जाम केला आहे

    ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी भाजपाने हा एल्गार पुकारला आहे

    राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला अडल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे

    वसई शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चक्का जाम आंदोलन सुरू असल्याने वसई फाटा आणि वसई गावात जाणारी सर्व वाहतूक ठप्प झाली असून, पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

  • 26 Jun 2021 11:02 AM (IST)

    वर्ध्यात ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे चक्का जाम आंदोलनाला सुरुवात

    वर्धा -

    ओबीसी आरक्षणासाठी भाजपच चक्का जाम आंदोलनाला सुरुवात

    शहरातील बजाज चौकात रास्ता रोको करून आंदोलन

    खासदार रामदास तडस , जिल्हाध्यक्ष शिरीष गोडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते रास्ता रोको मध्ये सहभागी

    रास्ता रोको मुळे चौकात वाहतूक विस्कळीत

  • 26 Jun 2021 10:56 AM (IST)

    नाशकात भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलनाला सुरुवात

    नाशिक- भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलनाला सुरुवात

    ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक

    मुंबई आग्रा महामार्गावर भाजपाचा ठिय्या

    सरकार विरोधात घोषणाबाजी

  • 26 Jun 2021 10:55 AM (IST)

    मुंबईच्या मुलूंड चेकनाका परिसराला छावणीचं स्वरूप, शेकडो पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात

    - मुंबईच्या मुलूंड चेकनाका परिसराला छावणीचं स्वरूप, शेकडो पोलीस रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात, ठिकठिकाणी बॅरिकेटींग

    - ओबीसी आरक्षणासाठी मुंबईत ठिकठिकाणी आंदोलनला काही वेळात सुरुवात

    - मुलुंड इथे हजारोच्या संख्येनं भाजप कार्यकर्ते ऊतरले रस्त्यावर

    - खासदार मनोज कोटक, आमदार श्री.आशिष शेलार, आमदार मिहीर कोटेचा, आमदार पराग शाह, भालचंद्र शिरसाट यांच्या नैतृत्वात चक्काजाम आंदोलन होणार

  • 26 Jun 2021 10:54 AM (IST)

    नागपुरात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात चक्का जाम आंदोलन

    नागपूर -

    ओबीसी आरक्षणच्या मुद्द्या वरून भाजप च चक्का जाम आंदोलन काही वेळात सुरू होणार

    विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार चक्का जाम आंदोलन

    कार्यकर्ते आणि नेते आंदोलन स्थळी पोहचायला झाली सुरवात

    आंदोलन स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला

    आंदोलन स्थळाला छावणी च रूप आलं

  • 26 Jun 2021 10:52 AM (IST)

    अहमदनगरात राम शिंदे, सुजय विखेंसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्ये पोलिसांच्या ताब्यात

    अहमदनगर

    ओबीसी आरक्षणासाठी भाजपच चक्का जाम आंदोलनाला सुरुवात...

    शहरातील शक्कर चौकात रास्ता रोको करून आंदोलन...

    माजी मंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे, शिवाजी कर्डिले यांच्यासह भाजप कार्यकर्ते रास्ता रोको मध्ये सहभागी...

    रास्ता रोको मुळे चौकात ट्रॅफिक जॅम....

    माजी मंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

  • 26 Jun 2021 10:51 AM (IST)

    कोल्हापुरातील दाभोळकर इथं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन

    कोल्हापूर :

    ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी आज भाजपचं राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन

    कोल्हापुरातील दाभोळकर इथं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात होणार आंदोलन

    आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाभोळकर कॉर्नर चौकात मोठा पोलिस फौजफाटा

    भाजप कार्यकर्ते आंदोलनाच्या ठिकाणी जमायला सुरुवात

  • 26 Jun 2021 10:50 AM (IST)

    ओबीसी आरक्षणसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत आंदोलन

    सांगली -

    ओबीसी आरक्षणसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीतील पुष्पराज चौक येथे भाजपाचा चक्का जाम कार्यकर्ते येनेस सुरवात

    आंदोलनत अठरा पगड जाती धर्माची लोक आपल्या पारंपारिक वाद्यांसह आंदोलनात सामिल

  • 26 Jun 2021 10:48 AM (IST)

    आजचे भाजपाचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद - रोहिणी खडसे

    मुक्ताईनगर

    रोहिणी खडसे -

    आजचे भाजपाचे ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद हे आंदोलन फक्त राजकारण करण्यापुरताचं एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे खेवलकर यांचं भाजपवर टीकास्त्र

    ओबीसी आरक्षण ओबीसी समाजाला मिळायलाच हवा यात कोणाचेही दुमत नाही फक्त यात राजकारण करू नका...

  • 26 Jun 2021 10:42 AM (IST)

    ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी आज भाजपचं राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन

    कोल्हापूर -

    ओबीसी आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी आज भाजपचं राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन

    कोल्हापुरातील दाभोळकर इथं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात होणार आंदोलन

    आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाभोळकर कॉर्नर चौकात मोठा पोलिस फौजफाटा

    भाजप कार्यकर्ते आंदोलनाच्या ठिकाणी जमायला सुरुवात

  • 26 Jun 2021 10:39 AM (IST)

    ओबीसी आरक्षणासाठी ठाण्यात भाजपचं चक्काजाम आंदोलन

    ओबीसी आरक्षणासाठी ठाण्यात भाजपचं चक्काजाम आंदोलन

    विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर करणार नेतृत्व

    काही वेळातच आंदोलनाला सुरुवात होणार

  • 26 Jun 2021 10:33 AM (IST)

    औरंगाबादेत भाजपचे चक्क जाम आंदोलन

    औरंगाबाद -

    औरंगाबादेत भाजपचे चक्क जाम आंदोलन

    आंदोलनासाठी भाजपचे शेकडो कार्यकर्ते जमा

    जालना रोडवरील आकाशवाणी चौकात शेकडो कार्यकर्ते जमले

    आंदोलन स्थळी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त

  • 26 Jun 2021 09:51 AM (IST)

    सोलापुरात ओबीसी आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

    सोलापूर -

    ओबीसी आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

    कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भाजपकडून करण्यात येणार आहे रास्ता रोको

    शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी करण्यात येणार आहे भाजपच्यावतीने ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन

    त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

  • 26 Jun 2021 09:14 AM (IST)

    नागपुरात आज ओबीसीसाठी भाजपचं रास्ता रोको आंदोलन, तर काँग्रेसचे ब्लॉक स्तरावर केंद्र सरकार विरोधात आंदोलन

    नागपूर -

    नागपुरात आज ओबीसीसाठी भाजपचं रास्ता रोको आंदोलन, तर काँग्रेसचे ब्लॉक स्तरावर केंद्र सरकार विरोधात आंदोलन

    भाजप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करणार चक्का चक्का जाम आंदोलन

    नागपूर च्या व्हेरायटी चौकात केलं जाणार आंदोलन

  • 26 Jun 2021 09:08 AM (IST)

    लोणावळ्यात ओबीसी चिंतन बैठकीला पोलिसांची नोटीस

    - ओबीसी चिंतन बैठकीला पोलिसांची नोटीस

    - लोनावळा पोलीसांनी बजावली नोटीस

    - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांनी बजावली नोटीस

    - बैठकीत विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे राहणार उपस्थितीत

    - आज ११ वाजता ओबीसी चिंतन बैठक सुरु होणार

Published On - Jun 26,2021 9:05 AM

Follow us
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.