औरंगाबादेत शाळेची घंटा वाजली, तब्बल दीड वर्षानंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाट

औरंगाबादेत शाळेची घंटा वाजली, तब्बल दीड वर्षानंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाट
राज्यांतल्या अनेक भागांत शाळा सुरु...

औरंगाबाद जिल्ह्यातील 919 गावं सध्या कोरोना मुक्त झाली आहेत. या गावात आता पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली आहे (Auranagabad School restart) . तब्बल दीड वर्षानंतर शाळेत पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळाला.

दत्ता कानवटे

| Edited By: Akshay Adhav

Jul 15, 2021 | 10:11 AM

औरंगाबाद : मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करणं शक्य नव्हतं. या दरम्यान मुलं ऑनलाईन शिक्षण घेत होती. आता कोरोनामुक्त असलेल्या गावात आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार 15 जुलै पासून शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील 919 गावं सध्या कोरोना मुक्त झाली आहेत. या गावात आता पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली आहे (Auranagabad School restart) . तब्बल दीड वर्षानंतर शाळेत पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळाला.

जिल्ह्यातील शाळांच्या घंटा वाजल्या, पहिला मान गणेशवाडीचा!

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना मुक्त गावात शाळांची घंटा वाजण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सर्वात आधी गणेशवाडी शाळेने विद्यार्थ्यांसाठी शाळेचं दार उघडलं. कालपासून गणेशवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची घंटा वाजलीय.

दीड वर्षानंतर शाळेत पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट!

तब्बल दीड वर्षानंतर शाळेत पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झालाय. शिक्षकांकडूनही वर्गात अध्यापनाचे काम सुरु झालंय. शाळा सुरु करण्याला गावकऱ्यांनी दुजोरा दिला होता. ऑनलाईनला विद्यार्थी कंटाळले होते तर मोबाईलवर शिकवून शिक्षक कंटाळले होते. आता शाळा सुरु झाल्याने शिक्षकांना थेट विद्यार्थ्यांना धडे देता येणार आहेत.

‘स्कूल चले हम…!’

राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये आजपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. आवश्यक त्या खबरदारी घेऊन शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी जवळपास 81 टक्के पालकांनी होकार दर्शविला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शाळा सुरू केल्या जाणार आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी ही माहिती टीव्ही 9 मराठीला दिली.

81 टक्के पालकांचा शाळा सुरु करण्याकडं कल

कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीच्या वर्गाबरोबरच अन्य वर्ग सुरू करण्यासाठी 81 टक्के पालकांनी होकार दर्शवला आहे. आवश्यक त्या खबरदारी घेऊन शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याला जवळपास 5 लाख 60 हजार 819 पालकांनी सहमती दर्शवली असल्याचं दिनकर टेमकर यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर समोर आली आहे.

नियमांचं पालन करणं आवश्यक

कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. शासनानं जारी केलेल्या कार्यपद्धतीचं काटेकोरपणानं पालन करावं. एका बाकावर एक विद्यार्थी, दोन बाकांमध्ये 6 फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे, लगेच कोरोना चाचणी करुन घेणे या नियमांचं पालन करण्यात यावं, असं शासनानं शासन निर्णयात सांगण्यात आलं आहे.

(Auranagabad Shool restart From today 15 July)

हे ही वाचा :

शाळा सुरु करा, राज्यातील बहुतांश पालकांचं मत, शालेय शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण सुरु

राज्याच्या ग्रामीण भागात उद्यापासून स्कूल चले हम,5 लाखांहून अधिक पालकांचा 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याकडे कौल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें