बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले वारकरी वेशात पंढरीला रवाना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अनोखं साकडं

बिग बॉस फेम अभिनेते आणि कवी अभिजीत बिचुकले वारकरी वेशात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे त्यांनी विशेष मागणी केलीय.

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले वारकरी वेशात पंढरीला रवाना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अनोखं साकडं
अभिजीत बिचुकले

सातारा : बिग बॉस फेम अभिनेते आणि कवी अभिजीत बिचुकले वारकरी वेशात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिक म्हणून अभिजीत बिचुकले यांना पुजेसाठी सोबत घ्यावं, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. अभिजीत बिचुकले चार चाकी वाहनानं पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.

कोरोनामुळे वारीवर निर्बंध

कोरोनाचा देशभरात प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे पिढ्यानपिढ्या सुरू असलेल्या अनेक परंपरा खंडित पडल्या आहेत. यापैकीच एक म्हणजे पंढरपूरची आषाढी वारी या वारीला दरवर्षी पायी चालत लाखो वारकरी पंढरपूरला जात असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गेल्या दोन वर्षापासून पंढरपूरच्या वारीवर निर्बंध आणले आहेत. मात्र , साताऱ्याचे बिग बॉस फेम अभिजित बीचुकले हे विठ्ठलाचे भक्त असल्याने यावर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला ते पंढरपूरला रवाना झाले आहेत.

अभिजीत बिचुकले वारकरी वेशात पंढरपूरकडे रवाना

अभिजीत बिचुकले यांनी वारकऱ्याच्या वेश धारण केला आहे. वारकऱ्यांचा वेश परिधान करून ते विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत, अशी माहिती आहे. उद्या सकाळी होणाऱ्या विठ्ठल पुजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य वर्गातील अभिजीत बिचुकले यांना सोबत घेऊन पूजा करावी, अशी विनंती बिचुकले यांनी केली आहे.

अभिजीत बिचुकलेंची पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत उमदेवारी

साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कवी मनाचे नेते म्हणून अभिजीत बिचुकले यांची ओळख आहे. सातारा जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा, विधानपरिषद निवडणूक असो ते निवडणुकीला उभे राहतात. अभिजीत बिचुकले यांनी गेल्या वर्षी झालेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात देखील अर्ज दाखल केला होता. पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निंधनानंतर पंढरपूर-मंगळवेढ्याची जागा रिक्त झाली होती. त्या जागेची एप्रिल महिन्यात पोटनिवडणूक पार पडली. त्या पोटनिवडणुकीत देखील अभिजीत बिचुकले यांनी अर्ज दाखल केला होता. अभिजीत बिचुकले यांचा समावेश बिग बॉसमध्ये झाल्यानंतर त्यांचा चाहता वर्ग देखील वाढला होता.

विणेकरी शिवदास कोलते यांना महापूजेचा मान

आषाढी वारीच्या महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71.) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) महापूजा करतील. केशव कोलते 20 वर्षा पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. त्या सेवेचं त्यांना महापुजेच्या निमित्तांन फळ मिळाल्याचं म्हणावं लागेल. महापूजेचा मान मिळाला आहे कष्टाचं फळ मिळालं आहे. 2000 मध्ये पंढरपूरला आलो. पांडुरंगाकडे कोरोना नष्ट व्हावं, असं मागणं असल्याचं केशव कोलते यांनी सांगितलं. 1972 पासून वारी करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

इतर बातम्या: 

Pandharpur | आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील 9 गावांमध्ये संचारबंदी लागू

मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज, सोमवारी पंढरपूरकडे रवाना होणार: अनिल परब

Big Boss fem Abhijeet Bichukle went to Pandharpur for Aashadhi Ekadashi 2021 special appeal for Uddhav Thackeray