नांदेडच्या नम्रता जाधवचं उत्तुंग यश, एअर फोर्समध्ये अधिकारी पदाला गवसणी, बहुमान मिळवणारी मराठवाड्यातील पहिलीचं तरुणी

एअर फोर्समध्ये अधिकारी पदाला गवसणी घालणारी मराठवाड्यातील नम्रता जाधव पहिलीच तरुणी आहे. नम्रता जाधवनं मिळवलेल्या यशाबद्दल राणसुगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं तिचा आणि तिच्या कुटुंबीयांचा सत्कार केला.  

नांदेडच्या नम्रता जाधवचं उत्तुंग यश, एअर फोर्समध्ये अधिकारी पदाला गवसणी, बहुमान मिळवणारी मराठवाड्यातील पहिलीचं तरुणी
नम्रता जाधव


नांदेड : नांदेड जिल्ह्यातील नायगांव तालुक्यातील राणसुगाव येथील नम्रता जाधव या तरुणीनं गावासह जिल्ह्याचं नाव उंचावलं आहे. नम्रता जाधव हिची एअर फोर्समध्ये निवड झाली आहे. इंडियन एअर फोर्समध्ये उड्डाण अधिकारी म्हणून निवड झाल्यानं तिच्या कुटुंबीयासंह गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. नांदेडच्या नम्रता जाधवनं मिळवलेलं उत्तुंग यश इतरासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. एअर फोर्समध्ये अधिकारी पदाला गवसणी घालणारी मराठवाड्यातील नम्रता जाधव पहिलीच तरुणी आहे. नम्रता जाधवनं मिळवलेल्या यशाबद्दल राणसुगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं तिचा आणि तिच्या कुटुंबीयांचा सत्कार केला.

एअरफोर्समध्ये निवड

नांदेडच्या नायगांव तालुक्यातील राणसुगाव गावातील तरुणीची भारतीय वायू सेनेत उड्डाण अधिकारी म्हणून निवड झालीय. नम्रता जाधव या तरुणीने मराठवाड्यात प्रथमच असा बहुमान मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होतेय.नम्रता जाधव हिला यापूर्वी देखील राष्ट्रीय छात्र सेनेचा बेस्ट कॅडेटचा पुरस्कार मिळाला होता.

वडिलांकडून प्रेरणा

नम्रता जाधवला तिच्या वडिलांकडून सैन्यदलाचा वारसा मिळाला. नम्रताचे वडील हे सेवानिवृत्त सैनिक असून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन नम्रताने हे यश मिळवलंय. तिनं इलेक्ट्रिक आणि टेलिकम्युनिशेनमधून पदवी मिळवलेली आहे. नम्रताला 2017 साली एनसीसीच्या 17 लाख विद्यार्थ्यातुन बेस्ट कॅडेटचा अवार्ड मिळवला होता.

आपल्या स्वत:च्या पायावर उभं राहायचं

नम्रता जाधव हिनं विद्यार्थ्यांनी शिक्षणात खंडू पडू देऊ नये. विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं. अभ्याससाशिवाय प्रगतीला कोणताही पर्याय नाही. शेतात आणि इतर ठिकाणी काम केलं तरी अभ्यास सुटू द्यायचा नाही. दहावी, बारावी आणि पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर अभ्यासाच्या जोरावर स्वत:च्या पायावर उभं राहायचं, असं नम्रता जाधव म्हणाली. राणसूगाव ग्रामपंचायतीकडून सत्कार करण्यात आल्यानंतर नम्रता जाधव हिनं गावातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी तिनं अभ्यासाला पर्याय नसल्याचं सांगितलं.

ग्रामस्थांकडून कौतुक

नम्रता जाधव हिनं मिळवलेल्या यशाबद्दल राणसुगावच्या ग्रामंपचायतीकडून सत्कार करण्यात आला. गावकऱ्यांनी नम्रता जाधव हिनं मिळवलेल्या यशाबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील एका खेडेगावात राहून नम्रता जाधवनं मिळवलेलं यश इतरांसाठी नक्कीचं प्रेरणादायी ठरेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. नम्रता जाधव हिनं मिळवलेल्या यशामुळे तिचे कुटुंबीय देखील खूप खूश आहेत. नम्रतानं हे यश मिळवून कुटुंबाचं, गावासह जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव उंचावल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

इतर बातम्या:

Maharashtra Corona Update : ‘या’ देशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक

6 लाख कोटींच्या विक्रीसाठी मोदी सरकारची यादी तयार, जाणून घ्या काय काय विकणार?

हेही पाहा


Nanded Ransugaon Namrata Jadhav selected in Indian Air Force

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI