“संभाजीराजे मनात आणलं असतं तर काहीही करू शकले असते, पण…” : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहू जयंतीच्या निमित्ताने सारथी संस्थेच्या कोल्हापूरमधील उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेचं कौतुक केलंय.

संभाजीराजे मनात आणलं असतं तर काहीही करू शकले असते, पण... : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray Sambhaji Chhatrapati
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 4:28 AM

कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहू जयंतीच्या निमित्ताने सारथी संस्थेच्या कोल्हापूरमधील उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेचं कौतुक केलंय. संभाजीराजेंनी मुकमोर्चातून लाखोंच्या संख्येने उतरून ताकद दाखवून दिलीय. त्यांनी मनात आणलं असतं तर ते काहीही करू शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी मराठा समाजासाठी जे शक्य आहेत ते सर्व करण्याचं वचनही दिलं (Uddhav Thackeray praise Sambhajiraje Chhatrapati over his stand on Maratha reservation).

उद्धव ठाकरे म्हणाले, “संभाजीराजेच्या मागण्या आहेत. मराठा समाजाकरिताच्या त्या मागण्या आहेत. पण मराठा समाज खूप सामजंस्यांनी समजून घेतो आहे. ते जर का त्यांनी समजून घेतलं नसते. त्यांनी मुकमोर्चातून लाखोंच्या संख्येने उतरून ताकद दाखवली होती. मनात आलं असते तर ते काही करू शकले असते. पण नाही. आम्ही छत्रपतींचे वारसदार आहेत. हे राज्य छत्रपतींचे आहे. हे राज्य माझं आहे. आपलं सगळ्यांचे आहे. त्यामुळे आगडोंब उसळून चालणार नाही आणि संघर्ष कोणाबरोबर करायचा? सरकार आपलं ऐकते आहे. ते जर ऐकत नसते, तर संघर्षासाठी तुमच्यासोबत मीच उतरलो असतो. पण सरकार ऐकते आहे.”

“काही ठिकाणी कायद्याच्या अडथळे आहेत. ते अडथळे आपल्याला कायद्याच्या मार्गाने पार करावे लागणार आहेत. पण ते अडथळे बाजुला ठेवून. ज्या काही गोष्टी करायच्या आहेत. जसे हे उपकेंद्र, शिष्यवृत्तीच्या बाबी आहेत. ज्या सरकारच्या माध्यमातून आपण करू शकतो. त्या करायची सरकारची तयारी आहे. त्याचदृष्टीने सरकारने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. आपल्या मागण्यामधील कायद्याची अडचण काय आणि सरकारची अडचण काय, हे आपण समजून घेतलेले आहे. एक आर्थिक संकट महाराष्ट्रावरच नव्हे, तर देश आणि जगावर कोरोनाच्या रुपाने घोंघावते आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन, त्यांना मानाचा मुजरा करतो. अनेक व्यक्तिमत्त्व अशी असतात, की त्यांच्या नुसत्या आठवणी काढत बसण्याचा उपयोग नसतो. तर त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालण्याची गरज असते. मला समाधान, अभिमान आहे की छत्रपतींना वंदन करताना, त्यांना साजेशा असा नुसता कार्यक्रम नाही. तर समाजाला न्याय देण्यासाठी म्हणून पाऊल टाकत आहोत. भावना व्यक्त करताना काहीवेळा शब्द सूचत नाही. कारण कार्यक्रमात एक जिव्हाळा, ओलावा आहे. आजचा हा योगायोग किंवा चालून आलेला मुहूर्त आहे.”

“संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे कळतं तो खरा नेता”

“खासदार संभाजीराजे यांच्यासोबत गेल्या शनिवारी याबाबत बैठक झाली होती. त्यानंतर आपली या केंद्राबाबत, कार्यक्रमाबाबत चर्चा झाली. सरकारची मानसिकता नक्कीच आहे. म्हणूनच आपल्यासोबत चर्चा होऊ शकली. न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणे हा एक भाग आहे. सर्वच राजकीय पक्ष रस्त्यावर उतरतात. मी तर शिवसेना पक्षप्रमुख आहे. न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणं हे आमच्या धमन्यामध्ये भिनलेले आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू राजांनी भिनवले आहे. त्याच विचाराची आपण सर्व लेकरं आहोत. पण संघर्ष करत असताना, संघर्ष करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळतं, तो खरा नेता असतो. नुसती आदळआपट करणे याला नेतृत्व म्हणता येत नाही,” असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“सरकारमधील एक मंत्री नाही, की ज्याचं मराठा समाजाला न्याय देण्याबद्दल दुमत”

उद्धव ठाकरे म्हणाले, “समोरून मिळते आहे. तरीही आदळआपटकर, आदळआपट कर आणि मोडून टाक, हे नेतृत्वाचे, नेत्याचे लक्षण नाही. संघर्षाच्या वेळी जरूर संघर्ष केला पाहिजे. पण जेव्हा आपल्याला लक्षात येते, की सगळे आपण एकमताचे आहोत. एकमतावर ठाम आहोत. सगळ्यांच्या भावना सारख्या आहेत. तिथे संघर्ष थांबवून संवाद केला पाहिजे. तो आपण सुरु केला आहे. त्याचे आजचे हे फळ आहे. अनेकजण आजसुद्धा आदळआपण करताहेत. त्यांच्याविषयी बोलणे योग्य नाही. सगळ्यांनीच मेहनत केली आहे. सरकारमधील एक मंत्री नाही, की ज्याचं मराठा समाजाला न्याय देण्याबद्दल दुमत आहे.”

“आमच्यावर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा वारसा चावलण्याची जबाबदारी”

“ज्या छत्रपती शाहू महाराजांनी राज्य केले. छत्रपती शाहू महाराज आणि माझे आजोबांचे ऋणानुबंध-स्नेहबंध जगजाहीर आहेत. कोल्हापूरकरांनाही ते माहिती आहेत. लहान असताना छत्रपती शाहू महाराजांच्या त्या सगळ्या आठवणी मी आजोबांकडून ऐकलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या मनामध्ये एक छत्रपतीबद्दलची वेगळी प्रतिमा आहे. माणसाचे थोरपणे कशामध्ये असते, हे अनुभवले आहे. ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांसारखे दिशादर्शक दैवतं जन्माला आली. त्यांचा वारसा जर का लोकशाही पद्धतीने चालविण्याची जबाबदारी आमच्याकडे आली आहे. या जबाबदारीला आम्हाला जागावेच लागेल. म्हणूनच समाधान आहे, की सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात होते आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “सारथी म्हणजे सारथ्य करणे. रथ आहे पण रथाला सारथी नाही. रथात गर्दी आहे. पण रथ जाणार कुठे. तर ती दिशा दाखवणारी संस्था म्हणून सारथी काम करेल. त्यादृष्टीने गोरगरीबांचे कल्याण करणे, त्यांचे आयुष्य घडवणारी ही संस्था आहे. या संस्थेचे उपकेंद्र छत्रपती शाहू राजांच्या करवीरनगरीमध्ये, त्यांच्या जयंतीनिमित्त सुरु करतो आहोत. हे अवर्णनीय आहे. छत्रपती शाहूंचे राज्य हे गुणसंपदेचा मळा होता. अनेक कलाकार, विद्वान असतील, कर्मवीर भाऊराव पाटील होते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत ओळखणारा हा पहिला माणूस. त्यांनी नुसता विद्वता ओळखून ओळखत्र नाही दिले. नुसतं मानपत्र नाही दिलं. पहिला मान दिला. त्यांची विद्वता ओळखली. अशा अनेकांना त्यांनी बळ दिले.”

“संभाजीराजे पटवला जाणारा माणूस नाही, तर योग्य तेच बोलणारं नेतृत्व”

“संघर्ष आणि संवाद याचे तारतम्य पाहिजे. याचसाठी संभाजीराजे यांचे कौतुक करतो आहे. त्यांना आम्ही पटवले आहे, असे काही म्हणतात. पण तसा हा पटणारा माणूस नाही. जे योग्य तेच बोलणारं आणि करणारं असे नेतृत्व आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि बाळासाहेब यांचेही जुने ऋणानुंबध आहेत. म्हणून स्नेहबंध-ऋणानुबंध केव्हा जुळतात, जेव्हा साधारणतः स्वभाव जुळतात. भावना जुळतात, मत जुळतात आणि हेतू साफ आणि स्वच्छ असेल, तर हे ऋणानुबंध जुळतात. ओढून-ताणून जे काय होते. ते काय त्याला नातं नाही म्हणता येत,” असंही त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे :

  • संघर्षाला उतरायचे, ज्या समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरायचे, मोठ्या संख्येने त्यांना एकत्र बोलावयाचे आणि न्याय हक्कासाठी लढा द्यायचा आणि घरी जाताना जे कोरोनाचे संकट आहे. ते संकट म्हणजे कोरोनाचे संकट लोकांच्या माध्यमातून घरोघरी पोहचवायचे, हे काही नेतृत्वाचे लक्षण नाही.
  • खरा नेता तोच आहे. जो समाजाचे रक्षण चोहोबाजुंनी करतो. आर्थिक आरक्षण असेल, नोकऱ्यांमध्ये आरक्षण असेल, हा जसा न्याय हक्क आहे. तशी त्याच्या आरोग्याची चिंता वाहणारा नेता पाहिजे. गर्दी केली. ताकद दाखवली आणि नंतर साथ पसरली. तर ते योग्य नाही.
  • म्हणूनच आपण फार समजूतदारपणे प्रतिसाद देत आहात. हे आंदोलन वणव्यासारखे भडकू शकले असते. पण त्या वणव्याला सुद्धा म्हणजे अग्निचं सुद्धा वेगवेगळं रूप आहे. जर का म्हटलं तर छान समईची ज्योत, निरांजनाची ज्योत बनून ती आपल्या दैवतासमोर तेवू शकते. मशाल बनून मार्ग दाखवू शकते, नाहीतर वणवा भडकवून राख रांगोळी करू शकते. म्हणून या अग्निचा उपयोग कसा करायचा, हा फार महत्वाचा विचार नेत्यांनी करायचा असतो.
  • वचन यापुर्वीच दिले आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या साक्षीने वचन देतो, की या माझ्या समाजासाठी जे-जे काही करणे शक्य असेल, तिथे कुठेही आपले सरकार मागे राहणार नाही. तुमच्यासोबत खांद्याला-खांदा लावून, प्रत्येक पावली तुमच्यासोबत राहील.
  • जसा हा माझा मराठा समाज आहे, तसाच हा माझा ओबीसी समाज आहे. ज्याप्रमाणे शाहू महाराजांनी दिनदुबळ्याना एक ताकद दिली. ती ताकद देण्याची परंपरा हे सरकार पुढे नेत आहे. जिथे जे काही करणे आवश्यक आहे. ते करत-करत पुढे जाऊ या.
  • सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. म्हणजेच काय कायद्याची लढाई आपण सोडून दिलेली नाही. मी आणि माझ्यासोबत असलेले उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण, आम्ही तिघांनी मिळून माननीय पंतप्रधानाचीही भेट घेतली. त्यांनाही सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की आरक्षणाचा अधिकार हा आता राज्यांना नाही. केंद्राला किंवा राष्ट्रपतींना आहे. आपण त्याबाबत लवकरात लवकर पाठपुरावा करावा. आम्ही सर्वांनी एकमताने विधिमंडळामध्ये, एकही पक्ष असा नव्हता अथवा नाही. ज्याला याला विरोध केला. सर्व पक्षांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे की मराठा समाजाला आम्ही न्याय देतो आहोत. तसा कायदा केला. दुर्देवाने जे घडले ते सर्वांसमोर आहे. पण माननीय पंतप्रधांनाना आम्ही विनंती केली आहे, की लवकरात लवकर आपल्या अधिकारात हा निर्णय घ्या. या माझ्या समाजाला न्याय द्या. म्हणजेच काय, कोणतीही गोष्टी आपण सोडत नाही.
  • जिथे राज्य सरकार म्हणून जे करायचे आहे. ती जबाबदारी राज्य सरकारने घेतलेली आहे. त्याचे हे आजचे हे उपकेंद्राचा शुभारंभ हे उदाहरण आहे. एका आठवड्यामध्ये नुसती घोषणा नाही केली. तर हे उपकेंद्र सुरु होत आहे. त्याचा विशेष आनंद आहे. आपले ऋणानुबंध, आणि आपला हा समजूतदारपणा आपल्या महाराष्ट्राला आणि समाजाला दिशा दाखवणारा आहे.
  • राजर्षी शाहू छत्रपतींना जयंतीनिमित्त वंदन करतो, आणि प्रार्थना करतो की आपले आशीर्वाद आमच्यासोबत राहावेत, जेणेकरून जो पिढ्यान् पिढ्या, वर्षोनुवर्षे कष्ट करणारा हा समाज आहे, त्याला न्याय देण्याचे बळ आमच्यात आणि त्यानंतर पुढची पावले मजबुतीने टाकण्याचे बळ समाजाच्या बांधवात, माता-भगिनींमध्ये येवो असे आपले आशीर्वाद लाभावेत.

हेही वाचा :

नुसती चर्चा नाही, निर्णयही झाला, जमीनही मिळाली, ठाकरे सरकारचं जाहीर कौतुक : संभाजीराजे

मराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत

सारथी संस्थेसाठी 1 हजार कोटी मागितले, सकारात्मक चर्चा सुरु, अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर संभाजीराजे यांची माहिती

व्हिडीओ पाहा :

Uddhav Thackeray praise Sambhajiraje Chhatrapati over his stand on Maratha reservation

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....