AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप हा बापच असतो, पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नको; विनायक राऊतांनी नितेश राणेंना डिवचले

केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची माहिती देऊन या सोहळ्याला मुख्यमंत्री असावेच असं काही नाही, असं म्हटलं होतं. (vinayak raut taunt narayan rane and nitesh rane over chipi airport)

बाप हा बापच असतो, पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नको; विनायक राऊतांनी नितेश राणेंना डिवचले
vinayak raut
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 12:39 PM
Share

रत्नागिरी: केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची माहिती देऊन या सोहळ्याला मुख्यमंत्री असावेच असं काही नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बाप असावा तर असा असं विधान केलं होतं. त्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पलटवार केला आहे. बाप हा बापच असतो. पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नसावा, असा हल्ला विनायक राऊत यांनी चढवला आहे. (vinayak raut taunt narayan rane and nitesh rane over chipi airport)

विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राणे पितापुत्रांवर जोरदार हल्ला चढवला. आम्ही चिपी विनातळासाठी काय प्रयत्न केले आणि संबंधित विभागाने आमच्याशी काय पत्रव्यवहार केला हे काही अज्ञान माणसाला कळत नाही. त्यांना इंग्रजी समजत नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. हा एअरपोर्ट एमएमआयडीसीचा आहे. पीपीपी मॉडेलवरील आहे. तो महाराष्ट्राचाच आहे. केंद्राने केवळ लायसन्स दिलं आहे. हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्राचाच आहे, असं सांगतानाच आता जे बडेजाव मारतात, फुशारकी मारतात ते म्हणतात मुख्यमंत्र्यांना बोलवण्याची गरज नाही. तुम्ही कोण सांगणारे? तुम्हाला कोणी अधिकार दिला? काही माहीत नसेल तर चार लोकांना विचारा. सोयीसाठी अमित शहांना विचारा. तुम्हाला काय अधिकार? काल टिंगूमिंगू सांगत होते बाप असावा तर असा. असावा. पण तो आयत्याबिळावरचा नागोबा नसावा, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

हे तर ट्रेनवर पोस्टर लावून फिरणारे

राणेंनी 1990 मध्ये या विमानतळाचं भूमिपूजन केलं. त्यानंतर ते 22 वर्ष गायब होते. केवढं मोठं कर्तृत्व. चार वर्षे खासदार होते. या चार वर्षात फिरकले नाही, कधी संसंदेत आवाज उठवला नाही, अशी टीका करतानाच तुम्हाला याचं श्रेय घेता येणार नाही. मी आणि वैभव नाईक यांनी पाहणी केली. 2014मध्ये आम्ही एमआयडीसीकडे विमानतळाचा स्टेट्स मागितला. तेव्हा त्यांनी अहवाल दिला. फक्त 14 टक्के काम झालं होतं. माती काढून खोदून ठेवली होती. मी, वैभव नाईक आणि दीपक केसरकर यांनी सातत्याने प्रयत्न केला. केसरकरांनी डीपीसीतून निधी दिला. मी स्ट्रिट लाईटसाठी निधी दिला. सुभाष देसाईंनीही निधी दिला. 100 सुरक्षा पोलीस दिले. शंभुराजे देसाईंशी मिटिंग केली. आम्हाला श्रेय घ्यायचं नाही. पण श्रेयाची फुशारकी मिरवणाऱ्या राणेंनी तर अजिबात श्रेय घेऊ नये. बाप बाप म्हणणाऱ्या नितेश राणेंनालाही अधिकार नाही. हे ट्रेनवर पोस्टर लावून फिरणारे आहेत, असा हल्लाही त्यांनी चढवला.

चार नागरी उड्डाण मंत्र्यांशी मी स्वत: चर्चा केल्या

चिपी विमानतळ व्हावं म्हणून मी चार वेगवेगळ्या बैठका घेतल्या. केंद्रीय मंत्री गजपती राजू, कॅप्टन पुरी त्या आधी सुरेश प्रभू आणि ज्योतिरादित्य शिंदे अशा चार हवाई वाहतू मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या. गेल्या सहा वर्षापासून एव्हिएशन कमिटीत हा मुद्दा लावून धरला होता. या सर्व प्रयत्नांना अखेर यश आलं. या एअरपोर्टवरून नियमितपणे हवाई वाहतूक करण्याचं निश्चित झालं, असं त्यांनी सांगितली. ज्योतिरादित्य माझ्याशी स्वत: बोलले

उद्घाटनाची तारीख मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच

माझं ज्योतिरादित्य यांच्याशी बोलणं झालं. ते माझ्याशी मराठीतच बोलतात. मला म्हणाले. विनायकभाऊ, मी स्वत: येणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत येणार आहे. तिथून नवी मुंबईत जाणार आहे, असं ज्योतिदारित्य यांनी सांगितलं. कालच उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदें यांच्यात सकाळी 11 वाजता चर्चा झाली. यावेळी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा दिवस ठरला. दोघांनी चर्चा करून दिवस ठरवला, असं सांगतानाच काल 11 वाजता ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी बोलणं झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी मला 12 वाजता फोन करून सांगितलं की, आम्ही 9 तारीख फिक्स केली. मी त्यांना सांगितलं तुमच्या सोयीनुसार तारीख ठरवा, अशी माहितीही त्यांनी दिली. (vinayak raut taunt narayan rane and nitesh rane over chipi airport)

संबंधित बातम्या:

Chipi Airport : चिपी विमानतळाचं उदघाटन नेमकं कधी? शिवसेना म्हणते 7 ऑक्टोबर, राणेंची तारीखही जाहीर

उद्घाटनाला मुख्यमंत्रीच हवा असं काही नाही, राणेंनी डिवचलं; चिपी विमानतळाच्या श्रेयावरून राणे आणि शिवसेनेत जुंपणार?

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली, कोरोनाबळींतही वाढ सुरुच

(vinayak raut taunt narayan rane and nitesh rane over chipi airport)

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.