Parambir Singh : परमबीर सिंह यांच्या अडचणीत मोठी वाढ! ठाणे न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

न्यायालयाने ठाणे पोलिसांना परमबीर सिंह यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे नगर पोलिस ठाण्यात सिंह यांच्याविरोधात दाखल असलेल्या खंडणी आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या गुन्ह्यात ठाणे न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

Parambir Singh : परमबीर सिंह यांच्या अडचणीत मोठी वाढ! ठाणे न्यायालयाकडून अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
परमबीर सिंग
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Oct 28, 2021 | 6:31 PM

ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेकत. कारण सिंह यांच्याविरोधात ठाणे न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. न्यायालयाने ठाणे पोलिसांना परमबीर सिंह यांना अटक करुन न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे नगर पोलिस ठाण्यात सिंह यांच्याविरोधात दाखल असलेल्या खंडणी आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या गुन्ह्यात ठाणे न्यायालयाने हा आदेश दिला आहे. केतन तन्ना आणि सोनू जलान यांनी सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. (Thane court issues non-bailable arrest warrant against Parambir Singh)

मुंबईतील अँटिलिया स्फोटकं प्रकरणात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यात 100 कोटी वसुलीचं टार्गेट पोलिसांना दिलं जात असल्याच्या गंभीर आरोपाचा समावेश होता. देशमुख यांच्यावर वसुलीबाबतचे आरोप झाल्यानंतर परमबीर सिंह यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठाणे आणि मुंबईत सिंह यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सिंह यांना अटकेपासून संरक्षण देण्यास राज्य सरकारचा नकार

परमबीर सिंह यांच्यावर अॅट्ऱॉसिटी आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात तपासादरम्यान त्यांना वारंवार समन्स बजावूनही ते कुठे आहेत? याचा पत्ता राज्य सरकारला लागू शकलेला नाही. त्यामुळे आता परमबीर सिंह यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार नाही असा शब्द आम्ही देणार नाही, असं राज्य सरकारनं 20 ऑक्टोबर रोजी हायकोर्टात म्हटलं होतं. अॅट्रॉसिटी प्रकरणात दोन वेळा समन्स बजावण्यात आलं होतं त्याला सिंह यांनी उत्तर दिलं होतं, अशी माहिती सिंह यांचे वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात दिली आहे. मात्र, यापूर्वी परमवीर सिंह यांच्यावर कठोर कारवाई किंवा त्यांना अटक करणार नाही असं राज्य सराकरनं कोर्टात म्हटलं होतं. पण आजच्या सुनावणीवेळी हा शब्द आम्ही पुढे नेऊ शकणार नाही, कारण ते कुठे आहेत याचा पत्ता आम्हाला लागलेला नाही. ते कुठल्याही समन्सला उत्तर देत नाहीत, असं राज्य सरकारनं म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

खोट्या एफआयआरच्या माध्यमातून माझी प्रचंड छळवणूक केली असा आरोप करत पोलिस अधिकाऱ्यानेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. या प्रकरणात सिंह यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून असलेला दिलासा 21 ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात आला होता.

‘परमबीर सिंह हे ठाण्याते पोलिस आयुक्त असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्याच्या त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही. म्हणून माझ्याच विरोधात अनेक खोटे एफआयआर दाखल करायला लावून त्यांनी माझी प्रचंड छळवणूक केली. शिवाय अंतिमत: न्यायालयाच्या निकालाने माझी निर्दोष मुक्तता झालेल्या एका प्रकरणात मला नाहक 14 महिने तुरुंगवास भोगावा लागला’ असा आरोप करत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

इतर बातम्या :

‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’, आर्यन खानच्या जामीनानंतर नवाब मलिकांचा समीर वानखेडेंना इशारा

जामीन आज मिळाला पण आर्यन खान जेलच्या बाहेर कधी येणार? वकिल रोहतगीनं दिवस, तारीख सांगितली

Thane court issues non-bailable arrest warrant against Parambir Singh

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें