मोबदला न देता शेतात बळजबरीनं रेल्वेनं उभारलं टॉवर, आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी केली अटक

मोबदला न देता शेतात बळजबरीनं रेल्वेनं उभारलं टॉवर, आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी केली अटक

| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 5:18 PM

गोंदियात (Gondia) शहराला लागून असेलल्या लोधीटोला गावातून रेल्वे (Railway) विभागाच्या टॉवर (Tower) लाइनचे बांधकाम सुरू असून शेतकऱ्यांना हमी देऊनसुद्धा योग्य मोबदला न देता टॉवर लाइनचे बळजबरी बांधकाम सुरू आहे.

गोंदियात (Gondia) शहराला लागून असेलल्या लोधीटोला गावातून रेल्वे (Railway) विभागाच्या टॉवर (Tower) लाइनचे बांधकाम सुरू असून शेतकऱ्यांना हमी देऊनसुद्धा योग्य मोबदला न देता टॉवर लाइनचे बळजबरी बांधकाम सुरू आहे. शेतकऱ्यांनी विरोध केला असता पोलिसांनी शेतकऱ्यांचा पोलीस ठाण्यात नेल्याचा संतापजनक प्रकार गोंदियात उघडकीस आला आहे. मागील 5 वर्षांपासून गोंदिया शहराला लागून असलेल्या जवळपास 10 गावातील शेतकऱ्याच्या शेतातून हे टॉवरलाइनचे बांधकाम सुरू असून ज्या शेतकऱ्याच्या शेतातून हे टॉवर जाईल, अशा शेतकऱ्यांना प्रत्येकी 3 लक्ष रुपये दिले जातील, अशी हमीदेखील रेल्वे विभागाच्या बड्या अधिकऱ्यांनी नागपुरातील बैठकीत दिली. मात्र 3 वर्ष लोटूनही मोबदला न देता पोलीस बंदबस्तात टॉवर बांधकाम सुरुवात केली असून हे बांधकाम शेतकऱ्यांनी अडविले. त्यामुळे पोलिसांनी न्याय न देता पीडित शेतकऱ्यांनाट पोलीस ठाण्यात उचलून नेल्याचा प्रकार गोंदियात घडला आहे.