Pre-Monsoon : मान्सूनपूर्व पाऊस दाखल, कोकण, गोवा अन् विदर्भातून होणार ‘श्रीगणेशा’

Pre-Monsoon : मान्सूनपूर्व पाऊस दाखल, कोकण, गोवा अन् विदर्भातून होणार 'श्रीगणेशा'
पावसाची शक्यता
Image Credit source: TV9 Marathi

मान्सूनपूर्व पावसाने कोकणात हजेरी लावलेली आहे. याच दरम्यान यंदा लवकर आगमन होणार हे स्पष्ट झाले होते. शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावासाच्या सरी बरसल्या होत्या. पावसाबाबत शुभ संकेत मिळताच शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यात रिमझिम पाऊस पडला आहे.

राजेंद्र खराडे

|

May 23, 2022 | 3:26 PM

मुंबई : राज्यात (Monsoon) मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले असून काही भागामध्ये (Pre-Monsoon) मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या आहेत. यंदा सर्वकाही हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे होत असून आता पुढील 3 दिवसांमध्ये कोकण, गोवा आणि विदर्भात पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज (met department) हवामान विभागाने वर्तवला आहे. दोन दिवसापूर्वी  कोकणात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे फळबागांचे नुकसान झाले होते तर आता पुन्हा याच भागात पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. यंदा मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आला होता. त्यानुसार वातावरणात बदलही दिसून येत आहेत. मध्यंतरी कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाने हजेरी लावली होती.

तीन दिवस तीन विभागात पावसाचा अंदाज

मान्सूनपूर्व पावसाने कोकणात हजेरी लावलेली आहे. याच दरम्यान यंदा लवकर आगमन होणार हे स्पष्ट झाले होते. शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावासाच्या सरी बरसल्या होत्या. पावसाबाबत शुभ संकेत मिळताच शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यात रिमझिम पाऊस पडला आहे. तसेच सोमवारपासूनच तीन दिवसांपर्यंत कोकण, गोवा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

कोकण वगळता राज्यात कोरडे वातावरण

मध्यंतरी दोन दिवस अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सर्वकाही बदलून गेले होते. यानंतर आता तीन दिवस कोकण वगळता राज्यात इतरत्र कोरडे वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. मध्यंतरी विदर्भात 40 अंश सेल्सिअस तापमान असतानाही काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र वातावरण कोरड आहे. शिवाय पुढील काही दिवस हे ऊन-पावसाचे राहणार असल्याचा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

मराठवाड्यातही पावसाची हजेरी

मध्यंतरी अचानक वातावरणात बदल आणि वादळी वऱ्यासह मराठवाड्यातील लातूर, निलंगा, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली होती. पण हा अवकाळी पाऊस असल्याचे सांगितले आहे. मात्र, विजेच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे शेती कामाला वेग तर आलाच पण अनेक ठिकाणच्या दुर्घटनेत जनावरे दगावली होती. सोमवार पासून तीन दिवसात विदर्भात आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें