पुणे- दौंड येथे पावसाचे थैमान, अनेक घरे पाण्याखाली,लोकांना सुरक्षित स्थळी हलवले..
पुण्याच्या दौंड तालुक्यात पावसाच्या माऱ्याने मोठी हानी झाली आहे. या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात पावसाचा धुमाकुळ सुरु झाला आहे. पुणे सातारा आणि आजूबाजूच्या भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. अवकाळी पावसाचा मोठा फटका औंध तालुक्याला भागाला बसला आहे. औंध तालुक्यातील पावसाने पुणे – सोलापूर महामार्गावर पाटस येथे ढगफूटी सदृश्य पाऊस झाला आहे. स्वामी चिंचोली भागातील १० घरे पाण्याखाली गेल्याने पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे. पुणे- सातारा महामार्गावर माती खचून क्रॅक पडल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Published on: May 25, 2025 08:31 PM
