Baba Adhav Cancer | वय वर्ष 92 सुरु, हाडे ठिसूळ, मणकाही त्रास देतोय, भावंडांनो मला कॅन्सरची लागण : बाबा आढाव

महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी सत्यशोधक चळवळीतील झुंजार नेतृत्व असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना कॅन्सरची लागण झालीय. एका निवेदनाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.

Baba Adhav Cancer | वय वर्ष 92 सुरु, हाडे ठिसूळ, मणकाही त्रास देतोय, भावंडांनो मला कॅन्सरची लागण : बाबा आढाव
बाबा आढाव, ज्येष्ठ समाजसेवक
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 11:18 AM

पुणे : महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी सत्यशोधक चळवळीतील झुंजार नेतृत्व असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना कॅन्सरची लागण झालीय. वय वर्ष 92 सुरु आहे, हाडे ठिसूळ झालीत, मणकाही त्रास देतोय, निसर्ग नियमाप्रमाणे वाढत्या वयाबरोबर काही व्याधी मागे लागल्या आहेत, असं सांगत कॅन्सरची लागण झाल्याचं एका निवेदनातून बाबा आढाव यांनी सांगितलं आहे. तसंच लवकर मी या आजारावर मात करेन, असा विश्वासही बाबा आढाव यांनी व्यक्त केला आहे.

दोन महिन्यांपूर्वी बाबांना कॅन्सरची लागण झालीय. डॉ. अभिजीत वैद्य आणि डॉ. राजेंद्र कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हाचलाचींवर मर्यादा आलीय. पण लवकरच आजारावर मात करुन पुन्हा रुटीन सुरु करेन, असा विश्वास बाबांनी व्यक्त केलाय. त्यांनी एक निवेदन काढून त्यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. तसंच कुणीही चिंता करु नये, भेटण्याची घाई करु नये, असं आवाहनही त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून केलं आहे.

भावंडांनो मला कॅन्सरची लागण, पण काळजी करु नका, लवकरच मी आजारावर मात करेन

माझ्या भावंडांनो, सध्या मी घरीच आहे. त्याचं कारण मी थोडा आजारी आहे. आजाराचं कारण जे आहे ते तुम्हाला कळावं त्यासाठी माझं हे छोटेसे निवेदन तुम्हा सर्वांच्या माहितीकरिता. सध्या मला ब्याण्णव वर्षे चालू आहे. तरीसुद्धा माझी तब्येत अत्यंत सुदृढ आहे. परंतु निसर्ग नियमाप्रमाणे वाढत्या वयाबरोबर काही व्याधीही मागे लागल्या आहेत. हाडे ठिसूळ झाली आहेत आणि अश्या ठिसूळ झालेल्या पाठीचा मणका त्रास देतोय. त्याची योग्य ती आधुनिक तपासणी झाली आहे. तपासणीत हाडांच्या ठिसूळपणा बरोबरच काहीशी कॅन्सर सारख्या व्याधीची लागण झाल्याचे उजेडात आले आहे.

लवकरच आजारावर मात करुन रुटीन सुरु करेन

ब्याण्ण्व्या वर्षात उपचाराला मर्यादा आहेत. अभिजीत वैद्य हे माझे कुटुंब डॉक्टर आहेत. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे तसेच डॉ.राजेंद्र कोठारी, डॉ. विजय रमणम या सर्वांनी उपचाराची शर्थ चालवलेली आहे. माझ्या मते हे सगळं निसर्ग नियमाप्रमाणे घडतंय, त्यासाठी आगळं वेगळं काही करण्याची गरज नाहीये. त्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. मात्र माझ्या हालचालीवर मर्यादा आलेल्या आहेत. माझी खात्री आहे की मी यातून बाहेर पडेल व माझं रुटीन सुरू राहील.

भेटायला येण्याची घाई करु नका, तब्येतीची अपडेट कळवत राहिन, चिंता नसावी

कृपया आपण कोणीही चिंता बाळगू नये व मला भेटण्याची घाई करू नये. कारण या आजारामुळे व त्यावरील औषधोपचारामुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होत जाते. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारचे इनफेक्शन होणं माझ्या तब्येतीला धोकादायक ठरु शकते. बसल्या जागेवरुन जे काय सहकार्य तुम्हाला करता येईल ते ऑनलाईन करेन. वेळोवेळी मी तुम्हाला तब्येतीची खुशाली कळवत राहीलच.

(Baba Adhav Diagnosed Cancer Treatment has been Started in Pune hospital)

हे ही वाचा :

राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची यात अडकले, त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही : बाबा आढाव

मनुवादी व्यवस्था आणि संविधान एकाच वेळी वाटचाल करू शकणार नाही : डॉ. बाबा आढाव

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.