Pune Crime | पुणे पोलिसांनी कधी डिलेव्हरी बॉय, तर कधी गॅरेज मेकॅनिकचे वेषांतर करत दोन गुंडांवर केली कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून या दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत होते. पोलीस त्यांच्या शोधात असताना आरोपी शुभम पवळे व आकाश सासवडे हे दोघेही लोहगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचत दोघांना अटक केली.

पुणे – शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी साततत्याने पावले उचलत आहेत. मागील 11 महिन्यांपासून खुनाचा प्रयत्न केल्यानंतर मोक्का (Mocca)कारवाई झालेले दोघे सराईत गुंड पोलिसांना (Police) चकवा देता होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी अनके ठिकाणी शोध घेण्याचाप्रयत्न केला मात्र त्याला यश येत नव्हते. या गुंडाच्या शोधासाठी पोलिसांनी कधी डिलेव्हरी बॉय, कधी गॅरेज मॅकेनिक तर कधी दुधवालाचे वेषांतर करुन त्याचा शोध घेतला, मात्र गुंड क पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी होत होते. अखेर पोलिसांच्या पथकाने या दोन्ही गुंडांना लोहगाव (Lohgaon)परिसरातून अटक करण्यात यश आले आहे. शुभम दीपक पवळे आणि आकाश ऊर्फ स्काय मंगेश सासवडे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
अशी केली करवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून या दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत होते. पोलीस त्यांच्या शोधात असताना आरोपी शुभम पवळे व आकाश सासवडे हे दोघेही लोहगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचत दोघांना अटक केली. न्यायालयाने या दोघांना 10 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. हे दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संबंधीत गुन्ह्यात त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या 5 साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र दोघे गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना गुंगारा देत होते. फरार कालावधीत दोघे परराज्यात देखील वास्तव्यास होते.
IND vs SL : दीपक चाहरपाठोपाठ विस्फोटक फलंदाज संघाबाहेर, टीम इंडिया अडचणीत
नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?
