AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निकालापूर्वीच राष्ट्रपती राजवटीचा चर्चा जोरात; घटना तज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगीतला ‘तो’ पेच

President Rule Ulhas Bapat : राष्ट्रपती राजवटी संदर्भात निकालापूर्वीच चर्चा रंगली आहे. अनेक जणांचा एक्झिट पोलवर विश्वास नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीत आतापासूनच ताना ताणी दिसत आहे. त्यातच घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी हा पेच सांगीतला आहे.

विधानसभा निकालापूर्वीच राष्ट्रपती राजवटीचा चर्चा जोरात; घटना तज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगीतला 'तो' पेच
उल्हाट बापट यांनी सांगीतला तो पेच
| Updated on: Nov 21, 2024 | 2:34 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागणार आहे. मतदान संपतानाच राज्यात विविध संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले. त्यावरून राज्यात महायुतीला बहुमताचा आकडा गाठता येईल असे दिसत असले तरी महाविकास आघाडी टफ फाईट देईल असा दावा करण्यात येत आहे. अपक्ष आणि बंडखोरांच्या टेकूशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही असा पण एक दावा आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीत आतापासूनच ताना ताणी दिसत आहे. त्यातच घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी हा पेच सांगीतला आहे.

राज्यपालांची भूमिका महत्त्वाची

निकालानंतर जर स्पष्ट बहुमत मिळाले नाही. अथवा त्रिशंकुची परिस्थिती उद्धभवल्यास काय होईल, यावर घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या मते, 23 तारखेच्या निकालानंतर राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. ज्या गटाकडे बहुमत असणार त्यांना बहुमताचे पत्र राज्यपालांना द्यावे लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पण हा आहे पेच

घटनेनुसार सिंगल लार्जेस पार्टी म्हणून राज्यपालांना बोलवता येत नाही, असे बापट यांनी सांगीतले. 26 तारखेच्या आत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. अन्यथा राज्यपाल राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करू शकतात. विधानसभेला मुदत वाढ देता येत नाही. तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी लागते. फुटलेले दोन पक्ष जर एकत्र आले तर तो एक पक्ष न होता तो एक गट असतो, असे ते म्हणाले.

घटनेतील तरतूद काय?

राज्याच्या 14 व्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यानुसार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी भारतीय लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 63 नुसार विधानसभा गठीत करण्यासाठी अधिसूचनेचा मसुदा राज्यपालांकडे सादर करतील. राज्यपाल त्यावर राजपत्र जारी करण्यास परवानगी देतील. त्यानुसार 15 वी विधानसभा गठित होईल. ही प्रक्रिया या 26 नोव्हेंबरपूर्वी करणे आवश्यक आहे. त्यानंतर महायुती, महाविकास आघाडी अथवा बहुमत ज्याच्याकडे आहे, ते राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा दाखल करतील.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...