AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: पुण्यात ‘म्हाडा’च्या 2,890 घरांसाठी लॉटरी; अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

स्वत:च्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाधिक जणांनी 'पुणे म्हाडा’च्या लॉटरी योजनेत अर्ज करा | MHADA lottery homes

मोठी बातमी: पुण्यात 'म्हाडा'च्या 2,890 घरांसाठी लॉटरी; अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
| Updated on: Apr 13, 2021 | 1:34 PM
Share

पुणे: सामान्य लोकांना परवडेल अशा दरात पुण्यातील 2,890 घरांसाठी ‘म्हाडा’कडून सोडत (Mhada lottery) जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे उद्घाटन केले. (MHADA affordable houses in Pune lottery process begins from gudi padwa 2021)

‘सर्वांसाठी घरं’ हे शासनाचं धोरण असून ‘पुणे म्हाडा’ने आणलेली 2 हजार 890 घरांची लॉटरी हे त्या दिशेनं पडलेलं आश्वासक पाऊल आहे. ‘म्हाडा’ची लॉटरी योजना पूर्णपणे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून कुणाच्याही खोट्या आश्वासनाला व फसवणुकीला बळी पडू नका. स्वत:च्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाधिक जणांनी ‘पुणे म्हाडा’च्या लॉटरी योजनेत अर्ज करा, असं आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

या ऑनलाईन कार्यक्रमाला गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर (सर्वजण ऑनलाईन पध्दतीने) आदी मान्यवर उपस्थित होते.

29 मे रोजी लॉटरी निघणार

ऑनलाईन अर्ज नोंदणी 13 मे, 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत करता येणार आहे. त्यानंतर 29 मे रोजी लॉटरी काढली जाईल. यामध्ये पुणे जिल्हयात म्हाळूंगे येथे 209, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे 432 अशा एकूण 641 सदनिकांचा समावेश आहे. या सर्व सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत.

‘म्हाडाच्या लॉटरी प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका’

‘म्हाडा’च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना माफक दरात दर्जेदार व हक्काची घरे मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. ‘म्हाडा’ची सोडत प्रक्रिया पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त आहे. त्यामुळे कुठल्याही आमिषाला किंवा फसवणुकीला बळी पडू नये. जर कुणी असा प्रयत्न केला तर त्याच्याविरुद्ध तक्रार करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या, मराठी नववर्षाच्या तसेच उद्यापासून सुरु होत असलेल्या रमजान महिन्याच्याही शुभेच्छा दिल्या. राज्यावरील कोरोनाचं संकट लक्षात घेता सामजिक अंतर राखणे, हात वारंवार धुणे आणि मास्क वापरणे या त्रिसुत्रीचं तसेच ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केलं.

संबंधित बातम्या:

Jitendra Awhad | मुंबईकरांसाठी खूशखबर, म्हाडाची 300 घरांसाठी लॉटरी निघणार : जितेंद्र आव्हाड

एका व्यक्तीला एकच घर, सरकार नवे गृहनिर्माण धोरण आणण्याच्या तयारीत

एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरं विकता येतील : जितेंद्र आव्हाड

(MHADA affordable houses in Pune lottery process begins from gudi padwa 2021)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.