AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी! पुण्याच्या ग्रामीण भागातील कोरोना निर्बंध शिथील

Pune Coronavirus | सरकारी निकषांनुसार या परिसरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, मद्यालये, व्यापारी संकुले रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

आनंदाची बातमी! पुण्याच्या ग्रामीण भागातील कोरोना निर्बंध शिथील
कोरोना व्हायरस
| Edited By: | Updated on: Aug 17, 2021 | 7:22 AM
Share

पुणे: काही दिवसांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील परिस्थिती आता झपाट्याने सुधारताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्हीट रेट पाच टक्क्यांहून कमी झाला आहे. त्यामुळे सरकारी निकषांनुसार या परिसरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, मद्यालये, व्यापारी संकुले रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील करोनाबाधितांचा दर कमी झाल्याने या दोन्ही शहरांतील निर्बंधांमध्ये यापूर्वीच शिथिलता देण्यात आली होती.

पिंपरी-चिंचवडमध्ये लसीकरणाचा 12 लाखांचा टप्पा पूर्ण

पिंपरी-चिंचवडमध्ये लसीकरणाचा 12 लाखांचा टप्पा नुकताच पूर्ण झाला होता. शुक्रवारी रात्रीपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये आतापर्यंत 12 लाख 3 हजार 660 जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले होते. यामध्ये 8 लाख 88 हजार 555 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 3 लाख 15 हजार 105 नागरिकांचा दुसराही डोस झाला आहे. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांचे सरासरी प्रमाण 30 टक्के इतके आहे.

झिकाच्या भीतीमुळे बेलसर ग्रामपंचायतने वाटले निरोध

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने सतर्क होत विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पुरुषांच्या विर्यात झिकाचे विषाणू आढळत असल्याने गर्भधारणा टाळण्यासाठी व सुरक्षित संभोग व्हावा यासाठी बेलसर गावात पुरुषांना निरोधचे वाटप करण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या वतीने भोंगागाडीच्या माध्यमातून दारोदारी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. गावात सर्व ठिकाणी धूर फवारणी केली जात आहे.

गावातल्या 24 गरोदर महिलांना मच्छरदाणी आणि डास प्रतिबंधक मलम देण्यात आले आहेत. महिलांच्या रक्ताचे नमुनेही तपासले असून त्यात कोणीही झिका ग्रस्त आढळलेले नाही असे डॉ. भरत शितोळे यांनी सांगितले. गावांमध्ये विविध पद्धतीच्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असून ग्रामपंचायतच्या वतीने सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे गावचे उपसरपंच धीरज जगताप यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

सीरमचे पुनावाला म्हणतात, राजकारणी थापा मारतायत, मिक्स डोसच्याही विरोधात, वाचा आणखी काय बोलले?

सीरमचे पुनावाला मोदी सरकारवर संतप्त, पुण्यासाठी लिहिलेल्या पत्राला उत्तर नसल्याचा दावा, वाचा नेमकं काय घडलं?

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.