शर्मिलाताई, बोलताना थोडं तारतम्य पाळा, अन्यथा… रुपाली ठोंबरे यांचा अजितदादांच्या वहिनींना इशारा काय?

कार्यकर्त्यांना कार्यक्रमाला जावू नका म्हणून सांगितलं जात आहे. पोलिसांचे फोन येत आहेत. कार्यकर्त्यांना धमकावलं जात आहे. कार्यक्रमाला जाऊ नका म्हणून सांगितलं जात आहे. एवढी धमकी दिली जाते आहे, दबाव टाकला जातोय तरी लोकं आमच्या कार्यक्रमाला येत आहेत, असा दावा शर्मिला पवार यांनी केला आहे. शर्मिला पवार या मीडियाशी संवाद साधत होत्या.

शर्मिलाताई, बोलताना थोडं तारतम्य पाळा, अन्यथा... रुपाली ठोंबरे यांचा अजितदादांच्या वहिनींना इशारा काय?
rupali thombreImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 25, 2024 | 7:49 PM

बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातच लढत होत असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. एकीकडे सुप्रिया सुळे यांना कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा वाढत असून कुटुंबातील सदस्य सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे अजितदादा यांची चांगलीच कोंडी झाली आहे. अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी तर अख्खा इंदापूर पिंजून काढत सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी शर्मिला पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे. त्यांचा हा घाव अजितदादा गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

शर्मिला पवार यांनी अजितदादांवर टीका केल्यानंतर अजितदादा गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी शर्मिला पवार यांच्यावर हल्ला चढवला आहे. सुनेत्रा वहिनींचा विजय निश्चित झाल्यापासून घरची आणि बाहेरची उंदरं गरळ ओकायला लागली आहेत. आधी अजित पवार यांच्या बंधूने गरळ ओकली. आता शर्मिला पवार गरळ ओकत आहेत. आपली जाऊ खासदार होणार असल्याचा त्रास त्यांना होत आहे. त्यांना द्वेष वाटत आहे. शर्मिलाताईंना विनंती आहे की, त्यांनी बोलताना थोडं तारतम्य पाळावं, अन्यथा तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल, असा इशाराच रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे.

शिवतारेंना पवार कुटुंबातून बळ

अजित पवार यांनी स्वतःच्या कामाने स्वत:ला सिद्ध केलं आहे. तुमच्या पोटातील विष आता बाहेर पडत आहे. बाहेरचा उंदीर विजय शिवतारे गरळ ओकत आहे. त्यांना नक्कीच पवारांच्या घरातून कुणाचं तरी पाठबळ आहे. अन्यथा त्या शिवतारेंची एवढी हिम्मत होणार नाही. शिवतारेंना सुद्धा जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही रुपाली ठोंबरे यांनी दिला आहे.

शर्मिला पवार काय म्हणाल्या होत्या?

दरम्यान, शर्मिला पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार सुरू केला आहे. त्यांनी आज संपूर्ण इंदापूर पालथा घातला. यावेळी त्यांनी मीडियाशी संवादही साधला. हा संवाद साधताना शर्मिला पवार यांनी अजितदादांवर जोरदार टीकाही केली. सुप्रिया या माझी भावजय आहेत. त्या या मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यामुळे त्यांना माझी साथ राहणारच. एक तीळ सात जणांनी वाटून खायचा असतो. मलिदा गँगचा भाग व्हायचं नसतं. आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडली पाहिजे. पण कोणत्याही गोष्टीसाठी आईवडील सोडू नये, असा टोला शर्मिला पवार यांनी अजितदादांना नाव न घेता लगावला होता. त्यामुळेच रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

त्याला घेराव म्हणत नाहीत

सुप्रिया सुळे यांचा मी प्रचार कधीच सुरू केला आहे. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. देव आमच्या पाठिशी आहे. आम्ही देवाचे आभार मानतो, असं त्या म्हणाल्या. रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना घेराव घालण्यात आला होता. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. सर्व माहौल राजकीय आहे. दोन लोक येतात त्याला घेराव म्हणता येणार नाही. रोहित आणि युगेंद्र हे आव्हानाला तोंड द्यायला खंबीर आहेत. त्यांना आजोबांची चांगली शिकवण आहे. घेराव घालणाऱ्यांना त्यांची चूक कळली आहे. विरोधकांकडे मुद्देच राहिले नाही. त्यामुळे ते अशा गोष्टी करत आहेत, असं शर्मिला पवार म्हणाल्या.

शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता...
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता....
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात.
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'.
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ.
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी.
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या.
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे.
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत.