शिवतारेंनी अजित पवारांना ललकारलं, राऊत म्हणाले, त्यांना भेटा, आम्ही तुमच्या पाठिशी!

पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढणार, असं सांगत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ललकारले. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तुम्ही अजितदादांना भेटा. (shivsena leader sanjay raut suggest vijay shivtare to meet ajit pawar)

शिवतारेंनी अजित पवारांना ललकारलं, राऊत म्हणाले, त्यांना भेटा, आम्ही तुमच्या पाठिशी!
सकाळच्या सभेत म्हणाले मुख्यमंत्री दिल्लीत गेलेलेच आहेत


पुणे: पुरंदरची खुमखुमी पुणे महापालिकेत काढणार, असं सांगत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ललकारले. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तुम्ही अजितदादांना भेटा. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असं सांगून शिवतारे यांना बळ दिलं आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी नाही झाली तर शिवतारे आणि अजितदादा यांच्यातील कलगीतुरा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (shivsena leader sanjay raut suggest vijay shivtare to meet ajit pawar)

संजय राऊत आज पुण्यात आहेत. पुण्यात आयोजित सभेला संबोधित करताना राऊत यांनी शिवसैनिकांना बळ देण्याचं काम केलं. यावेळी त्यांनी शिवतारे आणि अजितदादा वादावरही भाष्य केलं. उपमुख्य मंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध आहेत. पहाटेची घटना विसरली आहेत. तुम्हीही विसरून जा. साखर झोपेतील घटना विसरा. अजितदादांना भेटा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. अजितदादा आपली कामं करतील, असं राऊत म्हणाले.

बारामतीही जिंकू शकतो

बारामतीही आपली आहे. तिकडेही लोक आहेत. पुरंदर जिंकले की बारामतीही आपण जिंकू शकतो. भले बारामतीत आपल्या जागा निवडून येणार नाहीत. पण आपली ताकद तर वाढेल. त्यामुळे आपण आपली ताकद वाढवू शकतो ही सकारात्मकता राहिली पाहिजे, असंही ते म्हणाले.

शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका

शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका, शिवसेना ही आग आहे. एकच सांगतो. उद्धव ठाकरे देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनले आहेत. तसा पक्षही पहिल्या क्रमांकाचा व्हावा, ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांना संघटनेत स्थान द्या. कोणतंही पद न स्वीकारता बाळासाहेब ठाकरे हे सत्ताधीश होते. मंत्री, आमदार, खासदार हे काही महत्त्वाचं नाही. पण पक्ष महत्त्वाचा आहे. मंत्रीपद येते आणि जाते. पण मग मला माजी म्हणू नका असं म्हणतात. आम्हाला कुणी माजी म्हणणार नाही, असं ते म्हणाले.

शिवसेना का वाढली?

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटल्यानंतर झालेल्या चर्चेचा तपशीलही सांगितला. राहुल गांधी भेटले. मला विचारलं शिवसेना कशी चालते. त्यांनी मला हिंदीत विचारले बताये, कैसे चलती है शिवसेना. मी म्हणालो, हमारा जनम सडक पर हुआ है. हम सडक पर आंदोलन करते है. हम फटे लेकीन कभी हटे नाही, इसलिये शिवसेना की ताकद बढी, असं त्यांना मी सांगितलं, असं राऊत म्हणाले.

शिवतारे काय म्हणाले?

पुरंदरची खुमखुमी मी पुणे महापालिकेत काढणार आहे. मावळमध्ये मी पार्थ पवार यांना पाडलं म्हणून पुरंदरमध्ये मला आव्हान देऊन पाडलं. मावळमध्ये मी श्रीरंग बारणेच्या प्रचारासाठी जनरल डायरसारखा लढलो. मात्र माझ्यावेळी माझ्यामागे कुणी उभं राहीलं नाही, अशी खंत विजय शिवतारेंनी व्यक्त केली होती. (shivsena leader sanjay raut suggest vijay shivtare to meet ajit pawar)

 

संबंधित बातम्या:

वर सत्तेत एकत्र असलो तरी खाली कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नाही; विजय शिवतारेंची जाहीर कबुली

महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही, भाजपच्या केंद्रीय नेत्याचं मोठं विधान

यूपीएससी परीक्षेत बार्टीचा झेंडा, 9 विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या खास शुभेच्छा

(shivsena leader sanjay raut suggest vijay shivtare to meet ajit pawar)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI