आपला रील स्टार तर फस्सी गयो, मतदान केंद्रावर रील काढली, आता पोलीस लागले मागे

Reel Star on Raigad Election Booth : सोशल मीडियामुळे रील स्टारचे मोठे पीक आले आहेत. अनेक जण ऊठसूठ, उठता-झोपता त्यांच्या रील्स विविध समाज माध्यमांवर टाकत असतात. ज्यांना या माध्यमांच्या मर्यादा माहिती नाहीत, ते अडचणीत आल्याशिवाय राहत नाही. असाच एक रील स्टार सध्या पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे.

आपला रील स्टार तर फस्सी गयो, मतदान केंद्रावर रील काढली, आता पोलीस लागले मागे
रील स्टार वादात अडकला
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 12:14 PM

Lok Sabha Election 2024 चे देशात तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. अजून इतर टप्पे बाकी आहेत. लोकशाहीच्या या उत्सवात राजकारण्यांचा उत्साह दांडगा आहे, तर सोशल मीडियातील रील स्टारचा उत्साह पण शिगेला पोहचला आहे. पण काही जण या उत्साहात घोडचुका करताना दिसत आहे. अशीच एक मोठी चूक रायगड जिल्ह्यातील रील स्टारने केली आहे. रील तयार करण्याचे काही भान या पठ्याला उरले नाही. त्याने थेट मतदान करतानाचे रील तयार केले. इन्साग्राम व्हिडिओचा त्यासाठी वापर केला. हा व्हिडिओ व्हॉट्सॲप स्टेट्सला ठेवला. आता पोलिस त्याच्या मागावर आहे आणि रील स्टारने धूम ठोकली आहे.

कोणत्या मतदान केंद्रावरील प्रकार

रायगड जिल्ह्यात काल उत्साहात मतदान झाले. रेवदंडा येथील 12 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु होती. त्यावेळी दुपारी एक व्यक्ती मतदानासाठी आली. तिने मतदान करतानाच रील काढली. लागलीच हा व्हिडिओ या पठ्ठ्याने विविध समाज माध्यमांवर शेअर पण केला. एका अधिकाऱ्याच्या ही बाब लक्षात आली. त्याने तातडीने पोलिसांना याविषयीची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

गोंधळी याने घातला मोठा गोंधळ

  • अधिकाऱ्यांनी या मतदाराचं नाव लागलीच हुडकून काढलं. प्रसाद शरद गोंधळी याने हा मोठा गोंधळ घातल्याचे समोर आले. त्याने मतदान करताना खिशातून मोबाईल काढला. त्याच्या आवडीच्या उमेदवाराला मतदान करतानाचा व्हिडिओ तयार केला. त्याची एक रील तयार केली. मतदान करतानाच त्याने हा प्रकार केला. रील तयार झाल्यावर लागलीच ती इन्स्टाग्रामवर शेअर केली. त्यानंतर हा व्हिडिओ व्हॉट्सॲप स्टेट्सला ठेवला.
  • मतदान प्रक्रियेत गोपनियता पाळणे आवश्यक असते. गोंधळी याने गोपनियतेचा भंग केला. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्याच्या तक्रारीवरुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर पुढील प्रक्रिया सुरु आहे. एका रीलच्या चक्करमध्ये त्याने मनस्ताप मात्र करुन घेतला.
  • मध्यप्रदेशात पण असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी मतदान प्रक्रियेचा भंग केल्याने एका भाजप नेत्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी मतदान करताना मोबाईलवरुन व्हिडिओ काढला आणि तो समाज माध्यमांवर शेअर केला.
Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.