मनोज जरांगे पाटील यांचा शिंदे समितीच्या अहवालाबाबत सर्वात मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?

"मराठा आणि कुणबी एक आहेत हे सिद्ध होऊ द्यायचे नाही, असा अहवाल द्या, असे समितीला कोणी म्हणाले म्हणून असा अहवाल दिला आहे. तुमची इच्छाशक्ती असेल तर मराठ्यांच्या नोंदीसह मराठा हा कुणबी असल्याचे सिद्ध होते", असंदेखील मोठं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

मनोज जरांगे पाटील यांचा शिंदे समितीच्या अहवालाबाबत सर्वात मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 5:39 PM

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपलं काम पूर्ण करत कामाचा अहवाल सरकारकडे सुपूर्द केला आहे. या समितीला जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त मराठा कुणबी जुने दस्ताऐवज सापडले आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अधिकार हा समितीचा नसून राज्य मागासवर्ग आयोगाचा आहे, असं शिंदे समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. या अहवालावर आता मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायची राजकीय इच्छाशक्ती असेल तर ती मिळेल, असं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. तसेच समितीला मराठा आणि कुणबी एक आहेत हे सिद्ध होऊ द्यायचे नाही असं अहवाल देण्यास सांगितलं असेल, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

“राज्य मागासवर्ग आयोग पण अस्तित्वात आहे ना? शिंदे समिती, सुक्रे समिती, तीन-चारही न्यायमूर्ती सोबत आहेत. त्याला काय लागतं तर राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. तुमच्या मनात असेल तर त्याला काही लागत नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत, यासाठी तुमच्याकडे 57 लाख नोंदी आहेत, तो आधार घ्यायचा. मागासवर्ग आयोगाकडे द्यायचे असेल तर ती समिती अस्तित्वात आहे, आणि शिंदे समितीकडे द्यायचे ती समिती पण अस्तित्वात आहे, आणि हे एका दिवसात काय, एका घंट्यात होऊ शकते”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“तसे पाहिले तर 83 क्रमांकावर मराठा आणि कुणबी एकच आहेत, आणि फक्त शासननिर्णय करण्याची आवश्यकता आहे. एका ओळीचे काम आहे, काशाची गरज नाही ही फक्त बहानेबाजी आहे. पण मराठ्यांशी धोका, दगा फटका झाला तर याचे फळ भोगावे लागणार”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

हे सुद्धा वाचा

मनोज जरांगे यांचा समितीबाबत मोठा दावा

“तुम्हाला किचकट प्रक्रियेत घुसायचे असेल तर तुम्ही घुसणारच, तुम्हाला काय करायचे, काय नाही करायचे हे तुम्ही ठरवूनच गेले असाल. मग त्याला प्रक्रिया सोपी केली आणि अवघड केली तरी सर्व तुमच्या हातातच आहे. नोंदी शोधणे तुमच्या हातात आहे, आणि त्या द्यायच्या का नाही, हेही तुमच्या हातात आहे. आणि तुम्ही त्या सध्या द्यायच्या बंद केलेल्या आहेत. त्यामुळे समितीने जो अहवाल दिला, तो सरकारच्या म्हणण्याप्रमाणे, आणि मताप्रमाणे दिला असे आम्हाला वाटते”, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. “मराठा आणि कुणबी एक आहेत हे सिद्ध होऊ द्यायचे नाही, असा अहवाल द्या, असे समितीला कोणी म्हणाले म्हणून असा अहवाल दिला आहे. तुमची इच्छाशक्ती असेल तर मराठ्यांच्या नोंदीसह मराठा हा कुणबी असल्याचे सिद्ध होते”, असंदेखील मोठं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

‘संस्थानमधील सर्व पुरावे खोटे आहेत का?’

“तुम्ही कशाला दस्तऐवज मानता? ज्या नोंदी देवस्थानकडे, त्या समितीकडे दिल्या, आणि त्या समितीकडे द्यायचे असतात, आणि समिती त्याला कायद्याचा आधार देत असते. समिती त्याला नोंदी असलेला मूळ आधार देत असते. देवस्थानाकडे असलेले पुरावे सर्व समितीने घ्यायचे आणि समितीने ते अधिकृत मानायचे. कारण ते हजारो वर्षांपूर्वीचे आहे. मग ते जर खोटे असेल तर, त्या ठिकाणी अस्तित्वात असलेले संस्थानमधील सर्व खोटे आहे असे तुम्हाला म्हणायचे का?”, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला.

‘मराठ्यांचे कल्याण होऊ द्यायचे नाही, हे त्यांचे स्वप्न’

“तिथे असणारा डेटा तुम्हाला खोटा वाटत असेल तर, तिथे असणाऱ्या हजारो वर्षांपूर्वीच्या वास्तू तुम्हाला खोट्या आहेत म्हणायचे का? हजारो वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड तुम्ही ग्राह्य धरत नसाल, तर मग समित्या कशाला आहेत? आयोग कशाला आहेत मग? एखादी समिती चौकशीसाठी गठीत करतो ती कशासाठी असते? सिद्ध करण्यासाठी असते ना! हे सत्य आहे आणि हे अधिकृत माणण्यासाठी असते ना? मराठ्यांचे कल्याण होऊ द्यायचे नाही, हे त्यांचे स्वप्न आहे”, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा
'डुप्लिकेट...येवल्याचा नेता आता कुठे गेला?',जरांगेंचा भुजबळांवर निशाणा.
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र
चलो भगवान भक्तीगड, मुंडे बंधू-भगिनी पहिल्यांदा दसरा मेळाव्यासाठी एकत्र.
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय
फक्त एक SMS अन् तुम्हाला घरबसल्या कळणार मंत्रिमंडळाचे निर्णय.
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्....
रतन टाटांना भरपावसात बाईकवर एका कुटुंबातील ४ जण जातांना दिसले अन्.....
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?
रतन टाटांचं आसाम दिब्रुगढमधील शेवटचं भाषण ऐकलंत, का होतंय व्हायरल?.
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक
'श्रीमंत योगी... एक मित्र गमावला', राज ठाकरे टाटांच्या निधनानं भावनिक.
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव
टाटांचे सचिन तेंडुलकरकडून श्रद्धांजली; NCPA त अंत्यदर्शनासाठी पार्थिव.
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती
टाटांना मोदींची श्रद्धांजली, दूरदर्शी बिझनेस लीडर अन् विलक्षण व्यक्ती.
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास
टाटा समुहाचं 'रत्न' हरपलं, वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास.
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....