Ambadas Danve : ठाकरे गटाचा आता ‘या’ मतदानावर डोळा, छत्रपती संभाजीनगरसाठी अंबादास दानवे यांचे आदेश काय?

Ambadas Danve : मराठवाड्यात उद्धव सेनेला गड आला पण सिंह गेला असा अनुभव या लोकसभा निवडणुकीत आला. महाविकास आघाडीने मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागा खिशात घातल्या. पण छत्रपती संभाजीनगर मध्ये पराभवाचे तोंड बघावे लागले. विधानसभेत चित्र बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Ambadas Danve : ठाकरे गटाचा आता 'या' मतदानावर डोळा, छत्रपती संभाजीनगरसाठी अंबादास दानवे यांचे आदेश काय?
Ambadas Danve
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 11:58 AM

मराठवाडा हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला. शिवसेनेच्या दुफळीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मराठवाड्यात दमदार कामगिरी दाखवली. आठपैकी सात लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिलेदार निवडून आले. तर उद्धव सेनेला छत्रपती संभाजीनगरची जागा शुअर सीट वाटत होती, ती मात्र हातची गेली. या पराभवाचे चिंतन-मंथन झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत हे चित्र पालटण्याचा प्रयत्न होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभेत ठाकरे गटाचा पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाकडून संभाजीनगर येथे आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीला पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे, नेते अंबादास दानवे, संभाजीनगर चे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर उपस्थित होते.

हे मतदान आणणार खेचून

हे सुद्धा वाचा

शिवसेना पक्षाला मानणार मतदान आपल्याला लोकसभेत झालं इतर कोणत मतदान झालं नाही, मुस्लिम दलित मतदान संभाजीनगर लोकसभेत झालं नाही. येणाऱ्या विधानसभेत बाकी मतदान घ्या आणि विधानसभेत करिष्मा करून दाखवा असे आवाहन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी इच्छुक उमेदवारांना केले.

फिनिक्सप्रमाणे भरारी घ्या

जे झालं ते सोडून जिथं जिथं कमी राहिलो, ज्या कमतरता, आपला सर्कल प्रमुख गावोगांव गेला का? जी तुटकी फुटकी साधन होती त्यातून प्रचार आपण केला. केवळ आपल्या पक्षाला मानणार मतदान आपल्याला पडलेलं आहे, शिवसेनेच बेसिक मतदान पडल आहे, आपण म्हणतो मुसलमान दलित मी कोणत्या जातीपातीवर मी बोलणार नाही पक्षाला मानणार बेसिक मतदान झालं आहे. आपला लोकसभेत पराभव झाला पण आपला विश्वास मजबूत ठेवण्याची आवश्यकता आहे या मोठ्या पराभवातून फिनिक्स सारखी भरारी घ्यावी लागेल असे अंबादास दानवे म्हणाले.

गोड बोलणाऱ्या नेत्यांना कानपिचक्या

छत्रपती संभाजीनगर येथील ही विधानसभा आपण लढली नव्हती. पण इथले उमेदवार हे शिवसेनेच्या मदतीने निवडून आलेत हे खरं आहे. येणाऱ्या काळात आपल्याला इथं लढाईची आहे. घोसाळकर यांनी इच्छुक उमेदवारांची नावे घेतली. काही लोक तोंडावर गोड बोलतात. पक्षाचा उमेदवार जो देईल तो आम्ही निवडून देऊ असं तस काही बोलत असतात, केवळ एका बैठकीत उमेदवार ठरत नाही तर उद्धव ठाकरे हे वेगवेगळ्या यंत्रणामार्फत डेटा घेतात नंतर प्लॅन ठरला जातो, असा चिमटा त्यांनी गोड बोलणाऱ्या नेत्यांना काढला.

Non Stop LIVE Update
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ
'15 मिनिटांचं एकच उत्तर 100 टक्के..', संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी अन् खळबळ.
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन
'भाजपचे हाल कुत्र्यासारखे...', ठाकरे गटाच्या नेत्याचं पटोलेंना समर्थन.
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण..
पवारांचा पलटवार, राज ठाकरेंच्या टीकेवर म्हणाले, त्यांना दुर्लक्ष करण...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले...
दानवेंची कार्यकर्त्याला लाथ अन् पवारांसह राऊतांचा निशाणा; म्हणाले....
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन
ठाकरेंच्या या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विजयी करा, मौलानाचं आवाहन.
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी
उद्धव ठाकरे गटाला महायुतीनं डिवचलं, 'मातोश्री'बाहेर महायुतीची बॅनरबाजी.
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल
रावसाहेब दानवेंनी घातली कार्यकर्त्याला लाथ, व्हिडीओ होतोय व्हायरल.