Sanjay Raut : कोट घालता, टाय लावता म्हणून लोक ऐकत नाहीत, जरा वयाचं भान राखा – राऊतांनी राणेंना पुन्हा सुनावलं
शिवसेना ठाकरे गटाने आणि मनसेने आयोजित केलेल्या विजयी मेळाव्याआधी, नारायण राणेंच्या टीकेला संजय राऊतांनी तीव्र प्रत्युत्तर दिले. ठाकरे बंधूंच्या एकतेचा बचाव करत, राऊतांनी राणेंच्या राजकीय बदलांवर आणि महाराष्ट्र विषयीच्या विधानांवर निशाणा साधला. राणेंना वयाचे भान ठेवण्याचाही सल्ला राऊतांनी दिला.

राज्यातील शाळांत पहिलीपासूनहिंदी शिकवण्याच्या सक्तीचा जीआर फडणवीस सरकारने रद्द केल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतर्फे येत्या 5 तारखेला विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने उद्धव व राज ठाकरे हे दोन्ही बंधू पहिल्यांदाच राजकीय मंचावर एकत्र दिसणार असून त्याची बरीच चर्चा सुरू आहे. मात्र दोन भआऊ एकत्र आल्याने तसा काही विशेष फक पडणार नाही, असं भाजप नेते म्हणत आहेत. एवढंच नव्हे तर काल नारायण राणेंनीही याच वाक्याची पुनरावृत्ती केली. ठाकरे बंधू एकत्र आल्याने फारसा फरक पडणार नाही, 20 + 0 हेच त्यांचं समीकरण आहे, अशी टीका नारायण राणेंनी केली. मात्र त्यावर आता शिवसना नेते, खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर देत राणेंना सुनाववं आहे. राणेंना महाराष्ट्र फार गांभीर्याने घेत नाही, राणेंनी भाजपात जाऊन कोकणातील मराठी माणसाचं नुकसान केलं आहे. तुम्ही तुमच्या वयाचं भान राखा, कोट घालता, टाय लावता म्हणून लोक तुमचं ऐकत नाहीत, अशा शबदांत संजय राऊतांनी राणेंवर आगपाखड केली आहे.
त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहात नाही
नारायण राणेंनी काय बोलावं आणि काय बोलू नये हे त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहात नाही. ज्या व्यक्तीने दोन तीन वेळा पक्ष बदलला, जी व्यक्ती स्वत:चा पक्ष चालवू शकला नाही. ते काँग्रेसमध्ये गेले, मग त्यांनी त्याच पक्षाला शिव्या घातल्या. भाजपमध्येही गेले, तरी त्यांचं सुरुवातीपासून नीट जमत नाही. शिवसेनेतही शेवटी शेवटी गोंधळ घातला. अशा व्यक्तींबद्दल तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्र फार फार गांभीर्याने घेतो का यांना? असा सवाल राऊतांनी विचारला.
तुमच्या वयाचं भान राखा, राऊतांचा टोला
त्यांना महाराष्ट्र अजिबात गांभीर्याने घेत नाही. भाजपमध्ये गेलेला प्रत्येक माणूस हा महाराष्ट्राचा शत्रू आहे. त्यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणूस याच्यावर प्रवचनं झोडण्याचा कोणालाही अधिकार नाही. राणेंनी भाजपात जाऊन कोकणातील मराठी माणसाचं नुकसानच केलं आहे, अशी टीका राऊतांनी केली. नारायण राणे, सगळे गुलाम नसतात, सर्व आपली चामडी वाचवायला पक्ष बदलत नाही. काही स्वाभिमानी लोक आजही आहेत. ती लोक शेवटपर्यंत राहतील, म्हणून हा महाराष्ट्र टिकलेला आहे. तुम्ही आहात म्हणून महाराष्ट्र नाही. आणि भाजपा आहे म्हणून महाराष्ट्र नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या वयाचं भान राखा, कोट घालता, टाय लावता म्हणून लोक तुमचं ऐकत नाही. भविष्यात कळेल कोण काय आहे ते अशा थेट शब्दांत संजय राऊत यांनी नारायण राणेंना सुनावत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
