VIDEO: GOA काय आहे हे देवेंद्र फडणवीसांना लवकरच कळेल, संजय राऊतांचा टोला

गोवा जिंकलं आता महाराष्ट्र जिंकायचा आहे, अशी गर्जना करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी डिवचलं आहे. फडणवीस गोवा जिंकून आलेत. त्यामुळे त्यांचं मनोबल वाढलं आहे.

VIDEO: GOA काय आहे हे देवेंद्र फडणवीसांना लवकरच कळेल, संजय राऊतांचा टोला
GOA काय आहे हे देवेंद्र फडणवीसांना लवकरच कळेल, संजय राऊतांचा टोलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 11:01 AM

मुंबई: गोवा जिंकलं आता महाराष्ट्र जिंकायचा आहे, अशी गर्जना करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (devendra fadnavis) यांना शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी डिवचलं आहे. फडणवीस गोवा जिंकून आलेत. त्यामुळे त्यांचं मनोबल वाढलं आहे. गोवा काय आहे हे त्यांना लवकर कळेल. गोवा काय हे पोर्तुगीजांना कळलं नव्हतं. इंग्रजांनाही कळलं नव्हतं. त्यानंतर अनेक वर्ष अनेक राजकीय पक्षांनाही गोवा कळला नाही. फडणवीसांनाही कळला नाही. त्यांना लवकरच गोवा (goa) कळेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. भाजपने शिमग्याचा अर्थ समजून घ्यावं. भाजपने. त्या पद्धतीने रंग उधळावे. महाराष्ट्राचा रंग स्वाभिमान, अखंडता आणि एकोप्याचा आहे. हे समजून घ्यावं. सध्या कशावरून काय होईल. त्याबद्दल न बोललेलं बरं. इतकं राजकारण बिघडवून ठेवलं आहे. महाराष्ट्रातील सुसंस्कृतपणा महाराष्ट्रातील राजकारणातील विनोद आणि संवेदनशील मन त्यांनी बिघडवून ठेवलं हे वातावरण कधीच नव्हतं. ते दुर्देवाने भाजपने केलं आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. भाजपला वाटत असेल केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जाईल. खोटे आरोप, चिखलफेक करून महाविकास आघाडीचे खासदार, आमदार आणि नेत्यांचं मनोबल खाली आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही मजबूत आहोत. काल शरद पवार यांनी विश्वास दिलेला आहे. घाबरू नका. मी पुन्हा महाराष्ट्रात भाजपला येऊ देणार नाही. ही पवारांची भूमिका फक्त राष्ट्रवादीची नाही, ती महाविकास आघाडीच्या वतीने त्यांनी भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते म्हणून त्यांनी तरुण आमदारांसमोर भूमिका मांडली आहे. भाजपमधील आमचे मित्रं रोज तारखा देत आहेत. रोज रंग उधळत आहेत. ते नकली रंग आहेत. अशा नकली रंगांवर केंद्रीची बंदी आहे. काल त्यांना पवारांनी उत्तर दिलं आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

राज्यपालांना चिमटा

यावेळी त्यांनी राज्यपालांवर टीका केली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली पाहिजे. कायद्याने राज्यपालांना कळवायचं असतं. पण आम्ही सौजन्य दाखवत त्यांची परवानगी घेत आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.

शेट्टींनी आंदोलन करावंच

राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. अनेक प्रश्नावर ते आंदोलन करत असतात. त्यांनी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन केलं पाहिजे. त्यांनी आंदोलन केलं तर आम्ही त्यांच्या पाठी ठामपणे उभे राहू. राजू शेट्टी यांनी आंदोलन करावं. ते झुंजार नेते आहेत, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

भाजपचा शिमगा रोज सुरू आहे, आम्ही शिमगा सुरू केला तर…; sanjay raut यांचा भाजपला इशारा

Akola | वारंवार लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या कबड्डी प्रशिक्षकाला जन्मठेप

Maharashtra News Live Update : आम्ही शिमगा केला तर महाराष्ट्रात खड्डे खूप आहेत – संजय राऊत

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.