AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीवरून खडाजंगी, संजय राऊत यांनी दमच भरला; म्हणाले, तर तुमची महाराष्ट्रात कोंडी…

या मतदारसंघात 2014मध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला. दादांच्या नातावाचा पराभव होतो कसा? या विचाराने आम्ही अस्वस्थ झालो. काँग्रेस 2019ची निवडणूक लढलीच नाही. दहा वर्ष काहीच संबंध नाही. तुम्ही दहा वर्ष मागे राहिलात, त्यामुळे आम्ही लढू. राज्यातील मुस्लिम बांधवही ठाकरेंच्या सोबत आहे. तुम्ही वसंतदादांचे वारसदार आहात, तुमचं विमान भरकटलेलं चालेल का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

सांगलीवरून खडाजंगी, संजय राऊत यांनी दमच भरला; म्हणाले, तर तुमची महाराष्ट्रात कोंडी...
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 06, 2024 | 5:19 PM
Share

उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ही काळ्या दगडावरची शाई आहे. त्यामुळे तुम्ही आलात तर तुमच्या सोबत, नाही आला तर तुमच्याशिवाय आम्ही ही निवडणूक लढवून दाखवू, असं सांगतानाच सांगलीत कोंडी केली तर तुमची महाराष्ट्रात कोंडी करू, असा इशाराच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवार गटाला हा इशारा दिला आहे. त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडी दुभंगल्याचं स्पष्ट झालं आहे.

खासदार संजय राऊत हे सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचे चांगलेच कान उपटले. सांगलीतील आमदारकी, खासदारकी आमच्याकडे राहिली पाहिजे, विशिष्ट घराण्यात राहिली पाहिजे. ज्यांच्या हातात बँका, कारखाने, शैक्षिणक संस्था आहेत अशांच्या हाती राहिली पाहिजे, असा काही लोकांचा अट्टाहास आहे. सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला संसद आणि विधानसभेत जाण्याचे दरवाजे बंद करायचे आणि त्यांनी गुलाम म्हणून राहायचे यासाठी लोकशाही देशात आली नाही. सामान्य माणूस पालिकेपासून संसदेत गेला पाहिजे. तो मंत्री, मुख्यमंत्री झाला पाहिजे अन् पंतप्रधान झाला पाहिजे यासाठी लोकशाही आहे, असं संजय राऊत यांनी आघाडीच्या नेत्यांना सुनावलं.

मग आम्ही थांबणार नाही

जोपर्यंत घराणे आहेत, घराण्यात सत्ता आहे, म्हणून लोकशाही का? या मक्तेदारीला आव्हान देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने केलं आहे. शिवसेनेने सामान्य माणसाला सत्तेत बसवलं. आधी चंद्रहार समोर आला. मग आम्ही ठरवलं सांगितलं सांगली लढायची. आधी लोकसभा सीट घेतली आणि नंतर चंद्रहारला बोलावलं असं नाही. त्यामुळे चंद्रहारच्या उमेदवारीला पाठिंबा दिला पाहिजे. आज कोणी वेगळ्या मार्गाने राजकारण करून सामान्य शेतकऱ्याच्या मुलाची कोंडी करत असेल तर ही कोंडी फोडण्याची ताकद शिवसेनेत आहे. मग आम्ही थांबणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रात कोंडी होईल, असा दमच राऊत यांनी भरला.

भाजपला मदत करायचीय

ज्यांना अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करायची आहे, ज्यांना काही करून भाजपचा खासदार निवडून आणायचा आहे, त्यासाठी हे प्रकार सुरू आहे. पण सांगलीत जोपर्यंत चंद्रहार आहेत, तोपर्यंत भाजपचा खासदार निवडून येणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

चंद्रहार यांचा मान वाढवा

चंद्रहार पाटीलला उमेदवारी जाहिर केली तेव्हा अनेकांच्या पायाखालच्या सतरंज्या सरकल्या. त्यांच्याकडे साखर कारखाना नाही, सुतगिरण्या नाहीत. आज विशीष्ट लोक चंद्रहार पाटील यांच्या विरोधात भूमिका घेत आहेत. पण सांगलीतील 99 टक्के जनतेला शिवसेनेची भूमिका पटली आहे. चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी आहेत. त्यांचा मान वाढवा, असं आवाहन त्यांनी केलं.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.