AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karad Dog Attack : कराडमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू, नागरिकांमध्ये संताप

कराडच्या वाखाण भागात आज दुपारी मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संबंधित जखमी मुलास वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Karad Dog Attack : कराडमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू, नागरिकांमध्ये संताप
गोंदियात नाल्यात चार जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 12:46 AM

कराड : मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांच्या हल्ल्या (Dog Attack) त तीन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना कराडमध्ये घडली आहे. कराड शहराच्या ग्रामीण भागातील जगताप वस्तीवर ही घटना घडली आहे. राजवीर ओव्हळ (3) असे कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. कराड पालिकेने या मोकाट कुत्र्यां (Stray Dog)चा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मुलाच्या मृत्यूमुळे ओव्हळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

खेळत असताना कुत्र्यांनी हल्ला केला

कराडच्या वाखाण भागात आज दुपारी मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संबंधित जखमी मुलास वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ओव्हाळ कुटुंबीय मोलमजुरी करण्यासाठी वाखाण परिसरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करीत आहेत. आई-वडील कामावर गेल्यानंतर राजवीर हा त्यांचा मुलगा इतर मुलांच्या व त्याच्या बहिणी सोबत खेळत होता. यावेळी आमराईबन परिसरात मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यास कॉटेज हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्री त्रास देत असल्याचे या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितले. (A three year old boy was killed in an attack by stray dogs in Karad)

हे सुद्धा वाचा

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....