अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला
सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये काल ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. आता मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यामध्ये अखिल भारतीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरु होती. 99व्या संमेलनाचे प्रतीक नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते शाहू स्टेडियम येथे सोडण्यात आले होते. 1 जानेवारी रोजी या संमेलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, धक्कादायक माहिती समोर येत आहे. संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
साहित्य संमेलनाच्या स्थळीच हा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. साताऱ्यात घडलेल्या या घटनेमुळे सर्वांना धक्का बसला आहे. या हल्ल्या मागचा नेमका हेतू काय? या संदर्भात माहिती समोर आलेली नाही. तसेच हल्ला कोणी केला या संदर्भात माहिती समोर आलेली नाही.
99व्या संमलेनात काय आहे?
सातारा येथील शाहू स्टेडियम येथे सुरु असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दीडशेहून अधिक पुस्तकांचे स्टॉल आहेत. तसेच पर्यावरण व इतर विविध विषयांवर वाचकांची वेशभूषा, संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुलाचे सुशोभीकरण, राज्यभरातील साहित्यिक, वाचक प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती, कार्यक्रमांसाठी दोन मुख्य मंडप, ग्रंथदिंडीत एकूण 52 चित्ररथांचा समावेष, कवी कट्टा, प्रकाशन मंच, गझल कट्टा आणि वाचक मंचाचे उद्धाटन होणार आहे.
कोण कोण होते उपस्थित?
99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 1 जानेवारी रोजी सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा शाहूपुरी आणि मावळ फाउंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे ध्वजारोहण अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या संमेलनाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.
