Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये जाणार… उद्धव ठाकरे यांचे काय? शरद पवार यांनी दिले उत्तर

Sharad Pawar interview: देशात आता 1977 परिस्थिती होऊ शकते. त्यावेळी जनता पक्षासोबत विविध पक्ष एकत्र आले. त्यांनी सरकार स्थापन केले. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. तेव्हाही आताच्या प्रमाणे विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मोरारजी देसाई यांची नंतर पंतप्रधान म्हणून निवड झाली.

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये जाणार... उद्धव ठाकरे यांचे काय? शरद पवार यांनी दिले उत्तर
sharad pawar and uddhav thackeray
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 4:27 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष पुन्हा चर्चेत आले आहेत. शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लोकसभा निवडणुकीनंतरची भविष्यवाणी केली आहे. या मुलाखतीत शरद पवार यांनी काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. आम्ही वैचारिकदृष्ट्या गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांची विचारसरणी आमच्यासारखीच आहे. ते समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहे. मी त्यांची विचारसरणी पाहिली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यावर अजून शिवसेना उबाठाकडून प्रतिक्रिया आलेली नाही.

बारामतीमध्ये आमचा विजय निश्चित

मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाविरुद्ध “अंडरकरंट” जाणवत आहे. तसेच 2019 आणि 2024 च्या निवडणुकीत फरक आहे. अनेक जण भाजपऐवजी विरोधीपक्षांसोबत येत आहे. एका मोठ्या वर्गाला भाजप आणि (नरेंद्र) मोदी आवडत नाहीत. बारामतीत मंगळवारी मतदान झाले. त्यासंदर्भात शरद पवार यांनी विजयाचा दावा केला.

1977 सारखी परिस्थिती होणार

शरद पवार म्हणाले की, देशात आता 1977 परिस्थिती होऊ शकते. त्यावेळी जनता पक्षासोबत विविध पक्ष एकत्र आले. त्यांनी सरकार स्थापन केले. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. तेव्हाही आताच्या प्रमाणे विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मोरारजी देसाई यांची नंतर पंतप्रधान म्हणून निवड झाली. आता मोरारजी देसाई यांच्यापेक्षा राहुल गांधी जास्त लोकप्रिय आहे. त्यांचा स्वीकार केला जात आहे. त्यांच्या पक्षाला मोठा पाठिंबा आहे. त्यांचे सर्व प्रादेशिक पक्षांमध्ये संबंध निर्माण होत आहेत.

हे सुद्धा वाचा

गेल्या दोन वर्षात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा संदर्भ देत पवार म्हणाले की, जे लोक भाजप आणि मोदींसोबत गेले आहेत, त्यांना लोक पसंत करत नाही. शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, काँग्रेस पक्ष आणि आमच्यात काही फरक मला दिसत नाही. या दोन्ही पक्षांची विचारसरणी गांधी आणि नेहरू यांच्या विचाराची आहे. परंतु यावर मी सहकाऱ्यांच्या सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही. परंतु वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत.

हे ही वाचा

राजकारणातील मोठी बातमी, निवडणुकीनंतर शरद पवारांचा पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये? काय केला मोठा गौप्यस्फोट

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.