AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गट, अजितदादा गटाला कमी मते मिळूनही सर्वाधिक आमदार निवडून कसे आले?; शरद पवार यांची आकडेवारी देत पोलखोल

विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांकडून सातत्यानं ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत बोलताना आत शरद पवारांनी थेट मतांची आकडेवारी सादर करत सवाल केला आहे.

शिंदे गट, अजितदादा गटाला कमी मते मिळूनही सर्वाधिक आमदार निवडून कसे आले?; शरद पवार यांची आकडेवारी देत पोलखोल
| Updated on: Dec 07, 2024 | 6:14 PM
Share

विधानसभा निवडणुकीत विरोधकांना पराभवाचा मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीच्या राज्यात केवळ 50 जागा आल्या तर दुसरीकडे महायुतीने राज्यात तब्बल 231 जागा जिंकल्या. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी आकडेवारी सादर करत महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार? 

महाराष्ट्रात निवडणुका झाल्यावर उत्साहाचं वातावरण असतं. मला महाराष्ट्रात तसं वातावरण दिसत नाही. पण उगीच आरोप करणं योग्य नाही. कारण माझ्याकडे पुरावा नाही. प्रत्येक राजकीय पक्षांना एकंदरीत मतं किती पडली आणि लोक किती निवडून आले याची आकडेवारी काढली. काँग्रेसला राज्यात ८० लाख मते आहेत. आणि काँग्रेसचे १५ लोक निवडून आले. आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांना ७९ लाख मते मिळाली. काँग्रेसपेक्षा एक लाख मते कमी पडली. त्यांचे ५७ लोक निवडून आले. म्हणजे ८० लाख वाल्यांचे १५ आणि ७९ लाख वाल्यांचे ५७.  शरद पवार गटाचे ७२ लाख मते आहेत. आमचे उमेदवार निवडून आले १०. अजित पवार गटाचे ५८ लाख मते आहेत त्यांचे उमेदवार निवडून आले ४१. ७२ लाखांचे १० आणि ५८ लाखवाल्यांचे ४१. हे काही तरी आहे. आम्ही प्रत्येक पक्षाला किती मते मिळाली आणि किती उमेदवार निवडून आले याची आकडेवारी काढली. पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही. तोपर्यंत भाष्य करणं योग्य नाही. पण मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, आज मी विधानसभेतून थोडी माहिती घेतली, त्यंचां म्हणंण एकच होतं की लोकसभेच्या निवडणुकीवेळी ईव्हीएमची तक्रार नव्हती. मग तुम्ही आताच कशी करता? पण आमचं निरीक्षण असं आहे की, चार निवडणुका झाला. हरियाणात झाली. मी स्वत: तीथे गेलो होतो. तिथे भाजपची अवस्था कठिण होती. पण भाजप सत्तेवर आली. पण त्याचवेळी जम्मू काश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला आले. महाराष्ट्रात भाजपला यश आलं. त्याचवेळी झारखंडला भाजपचा पराभव झाला. याचा अर्थ छोटी राज्य तीथे आम्ही आणि जिथे मोठी राज्य तिथे भाजप असं दिसतं, असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले,
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख...
रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक