मोठी बातमी! मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचा नेता अडचणीत, महिलेला मारहाण अन् विनयभंग केल्याचा आरोप
आता आमशा पाडवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आरोप करणारी महिला आणि तिचा भाऊ हे भाजपचे कार्यकर्ते आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे नवनियुक्त आमदार आमशा पाडवी यांच्यावर महिलेला मारहाण आणि तिचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आला. त्यामुळे आता आमशा पाडवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आरोप करणारी महिला आणि तिचा भाऊ हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार ज्या महिलेनं आरोप केला आहे, तिचा भाऊ भजपचा पंचायत समिती सदस्य आहे. दरम्यान या आरोपांमुळे आता पाडवी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
ग्रामपंचायत निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत पाडवी यांच्या विरोधात काम केल्याच्या रागातून परिवारातील सदस्य आणि महिलेला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात आमदार पाडवी यांचा मुलगा जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी, मुलगी सोरापाडा सरपंच अंजू पाडवी, यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान दुसरीकडे या प्रकरणात आमदार पाडवी यांच्या मुलीनेही भाजपा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे, भाजप नेते नागेश पाडवी, भाजपा तालुका अध्यक्ष नितेश वळवी यांच्यासह आरोप करणारी महिला आणि त्यांच्या भावाच्या विरोधात अक्कलकुवा पोलीस स्टेनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे महायुतीमधील दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील संघर्ष समोर आला आहे.
आमशा पाडवी यांच्या अडचणीत वाढ
आमशा पाडवी हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला. मात्र त्यानंतर आता त्यांच्यावर महिलेकडून मारहाण आणि विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.