धक्कादायक! गौरीपाडा तलावाच्या काठावर एकाच वेळी अनेक कासवांचा मृत्यू, नागरिकांमध्ये खळबळ

धक्कादायक! गौरीपाडा तलावाच्या काठावर एकाच वेळी अनेक कासवांचा मृत्यू, नागरिकांमध्ये खळबळ

कल्याण पश्चिममधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलावाच्या काठावर अनेक कासवं ही मृतावस्थेत आढळून आली आहेत. या तलावाच्या काठावर मोठ्या संख्येने कासवांचा मृत्यू झाल्याने प्राणी प्रेमिंकडून हळहळ व्यक्त होत आहे.

अमजद खान

| Edited By: अजय देशपांडे

Jan 22, 2022 | 9:31 PM

कल्याण : कल्याण (Kalyan) पश्चिममधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलावाच्या काठावर अनेक कासवं ही मृतावस्थेत (Turtles, Death) आढळून आली आहेत. या तलावाच्या काठावर मोठ्या संख्येने कासवांचा मृत्यू झाल्याने प्राणी प्रेमिंकडून हळहळ व्यक्त होत आहे. या कासवांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गौरीपाडा तलावाचे काही वर्षापूर्वी सुशोभिकरण करण्यात आले होते. या तलावात स्थानिक लोक मासेमारीही करतात. दोन दिवसापूर्वी काही कासव मेलेल्या स्थितीत आढळून आले होते. आज पुन्हा एकदा अनेक कासंव मृतावस्थेमध्ये आढळून आले आहेत. हा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती भाजपाचे माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी दिली. माहिती मिळताच दया गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित घटनेची माहिती महापालिका प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळास कळवली.

कासवांचा शेजारच्या गावात आश्रय

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, या तलावात स्थानिक लोक मासेमारी देखील करतात. दोन दिवसांपूर्वी परिसरामध्ये काही कासवं हे मृतावस्थेमध्ये आढळून आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा या तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात कासवे मृतावस्थेत आढळून आली आहेत. स्थानिकांनी याबाबत दया गायकवाड यांना माहिती दिली, दया गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. तसेच याबाबत त्यांनी कल्याण महापालिका आणि प्रदूष नियंत्रण मंडळास माहिती दिली. विशेष म्हणजे यातील काही कासवांनी तर शेजारच्या गावात आश्रय घेतल्याचे आढळून आले आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात अशीच एक घटना घडली होती. या परिसरात अनेक पक्षी मृतावस्थेमध्ये आढळून आले होते. त्यानंतर आता कासवांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

85 कासवांचा मृत्यू झाल्याचा दावा

दरम्यान कासवाचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र तलावात मासेमारी करताना माशांना काही खायला टाकण्यात आले असावे. तेच खाद्य कासवांनीही खाल्ले असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच तलावाच्या पाण्यात काही मिसळले गेले असल्याने प्रदूषित पाण्यामुळे कासवांचा मृत्यू झाला असावा अशा विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. कासव हा उभयचर आणि दीर्घायुषी प्राणी आहे. या परिसरामध्ये जवळपास 85 च्या आसपास कासवांचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

संबंधित बातम्या

Thane : ठाण्यात डबक्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू, दीड महिन्यात चार बालकांचा मृत्यू

Kalyan Crime : कल्याण आठवडा बाजारात फेरीवाल्यांकडून हफ्ता वसुली, माजी नगरसेवकावर आरोप

Jitendra Awhad : ’10 बाय 10च्या घरात राहलोय, सार्वजनिक संडास मी पण वापरलाय’ असं जितेंद्र आव्हाड कुणाला म्हणाले?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें