डीजेवर देहभान विसरून नाचला… काही क्षण बाजूला थांबला अन् क्षणात कोसळला… सोलापुरातील काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वच हळहळले
Solapur News : सोलापूरमधून एक धक्कादायक अशी घटना पुढे येतंय. चक्क डीजेच्या तालावर नाचत असताना तरुणासोबत धक्कादायक घटना घडलीये. अभिषेक बिराजदार असे तरूणाचे नाव आहे. सोलापूरच्या या घटनेने विविध चर्चांना उधाण आलंय.

सोलापूरमधून एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे येतंय. चक्क डीजेच्या तालावर नाचत असताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झालाय. अभिषेक बिराजदार असे हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सदर घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मृत्यूच्या काही क्षणा अगोदर आनंदात डीजेच्या तालावर नाचतानाचा अभिषेक बिराजदारचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मस्त तो डीजेच्या तालावर ठेका धरून नाचताना व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
डीजेच्या तालावर नाचत असताना तो थांबला आणि…
डीजेवर नाचून थकल्यानंतर काही मिनिटांसाठी तरुण बाजूला जाऊन थांबला असता तो थेट मृत्युमुखी पडला. अभिषेक जमिनीवर पडल्यानंतर त्याला लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. ज्यावेळी अभिषेक डीजेच्या तालावर नाचत होता, त्यावेळी कोणीही असा विचारही केला नाही की, पुढच्या क्षणी काय होईल.
अभिषेकचा शेवटच्या क्षणाचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अभिषेकचा शेवटच्या क्षणाचा डीजेवर नाचतानाचा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. अभिषेकलाही कदाचित वाटले नसेल की, हा डीजे डान्स आपल्या आयुष्यातील शेवटचा ठरणार आहे. बेभान होऊन तो आनंदात नाचत होता आणि थकल्यासारखे झाल्याने तो फक्त काही मिनिटांसाठी बाजूला येऊन उभा राहिला आणि त्याच्यासोबत ही घटना घडली. अभिषेकचा व्हायरल होणारा व्हिडओ पाहून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
डान्स करत असताना तो बाजूला गेला आणि जमिनीवर कोसळला
अभिषेक हा नाचून बाजूला येऊन थांबल्यानंतर क्षणामध्ये असे काही घडले की, त्याला वाचवणे देखील शक्य झाले नाही. यानिमित्ताने कर्णकरकश्य डीजेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. बऱ्याचदा रस्त्याने जात असताना डीजे सुरू असला तरीही कान काहीवेळासाठी बंद झाल्यासारखी वाटतात, त्यामध्येच अभिषेक डीजेवर डान्स करत होता. अभिषेकच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
