ताई आम्हाला विश्वासात घेत नाहीत; महिला नेत्या विरोधात नाराजीचा सूर

Shivsena Uddhav Thackray Group Leaders Displeased on Congress Leader Praniti Shinde : ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नाराजीचा सूर; महिला नेत्यावर पदाधिकाऱ्यांची नाराजी... नेमकं काय घडलं? का आहे या नेत्यांची नाराजी? नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

ताई आम्हाला विश्वासात घेत नाहीत; महिला नेत्या विरोधात नाराजीचा सूर
Follow us
| Updated on: Mar 23, 2024 | 3:54 PM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी काँग्रेसच्या महिला नेत्यावर आपली नाराजी बोलून दाखवली आहे. काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे या सोलापूरमधून उमदेवार असणार आहेत. पण त्यांच्या उमेदवारीवर शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नाराजीचा सूर पाहायला मिळाला. प्रणिती शिंदे या आम्हाला विश्वासात घेत नाहीत, असं या पराधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. याबाबत ‘मातोश्री’वर अर्थात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही कळवल्याची माहिती आहे.

स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी

प्रणिती शिंदे यांच्याविरोधातील नाराजी मातोश्रीवर कळवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली आहे. जोपर्यंत मातोश्रीवरून आदेश येत नाही, तोपर्यंत ठाकरे गट लोकसभा उमेदवाराचे काम करणार नसल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका तसेच पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत जोवर जागांची बोलणी ठरत नाही तोवर ठाकरे गट प्रचारात सहभागी होणार नसल्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मातोश्रीवर याबाबत आपले मत मांडण्याचा निर्णय ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत घेतला आहे.

प्रणिती शिंदेंचा मतदारसंघाचा दौरा

दरम्यान, प्रणिती शिंदे या सध्या सोलापूर मतदारसंघाचा दौरा करत आहेत. अशात भाजप खासदारांवर त्यांनी टीका केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गीत बोलताना त्यांनी सोलापूरचे विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींवर टीका केलीय. सोलापूरचे खासदार निष्क्रिय असून ते पार्लमेंटमध्ये कितीवेळा बोलले आहेत?, असा सवाल प्रणिती शिंदे यांनी विचारला आहे.

भाजपवर टीका करताना काय म्हणाल्या?

सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यासाठी आर्मी बोलावण्यात आली होती. आगामी लोकसभेच्या अनुषंगाने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी कॉर्नर सभांचा धडाका लावला आहे. मागच्या दहा वर्षात भाजपने काय केलं..? एक योजना जरी सांगितली तरी मी खाली बसेन. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी ही वैयक्तिक राजकारणामुळे पाडण्यात आली आहे. ती चिमणी एवढ्या अर्जंटली पाडली की जणू कांही दुसऱ्या दिवशी विमानसेवा सुरु करण्यात येणार होती. त्यावळेस चिमणी पाडण्यासाठी तिथे आर्मी बोलावण्यात आली आणि त्या गावाला छावणीच रूप प्राप्त झालं होतं. त्यामुळे मी चॅलेंज करते आणखी 6 महिने जातील तरीदेखील हे लोक विमानसेवा सुरु करणार नाहीत. पंतप्रधान, खासदार, मंत्री सर्व त्यांचेच असूनही एक छोटी विमानसेवा सोलापूरलां देऊ नाही शकले, असं प्रणिती यावेळी म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.