घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये ते 10 रुपयात जेवण आणि नाश्ता! ठाकरेंचा शब्द काय? वचननाम्यात काय काय? वाचा
आज शिवशक्ती एकत्र आली आहे. सेना, मनसे आणि राष्ट्रवादीचा संयुक्त वचननामा प्रकाशित करण्यात आला आहे. या वचननाम्यात ठाकरेंनी काय शब्द दिले आहेत ते वाचा...

आज जवळपास 20 वर्षांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनात एकत्र आले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे, उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या शिवशक्तीचा वचननामा या ठिकाणी जाहिर करण्यात आला. या वचननाम्यात काय काय सांगितले आहे चला जाणून घेऊया…
वचननाम्यात काय आहेत आश्वासने?
* घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये स्वाभिमान निधी
* 10 रुपयात जेवण आणि नाश्ता
* नोकरदार पालक तसेच कष्टकरी महिलांना सांभाळणारी पाळणाघरे
* पाळीव प्राण्यासाठी दवाखाना
* बाळासाहेब ठाकरे स्वयं रोजगार अर्थसाह्य योजना
* मुंबई पालिकेतील अत्यावश्यक रिक्त पद भरणार
* प्रत्येक वार्डात आजी आजोबा मैदान
* 700 चौ फुटापर्यत मालमत्ता कर माफ
* कचरा कर रद्द
* महापालिकेच्या शाळा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही
* दहावीनंतर महापालिका शाळेत बारावीपर्यत ज्युनियर कॉलेज
* मुंबई पब्लिक स्कुलचा दर्जा अत्याधुनिक करणार
* मराठी शाळेत बोलतो मराठी हा हसत खेळत मराठी शिकवणारा डिजिटल उपक्रम सुरु करणार
* मुंबई महानगर पालिकेतर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सर्वात मोठं ग्रंथालय
* मुंबईचं सुपर स्पेशालिस्ट कॅन्सर रुग्णालय
* रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंट ऍम्ब्युलन्स सेवा
* उत्तम दर्जाचे रस्ते बनवले जातील कंत्राटदाराकडून रस्त्याची 15 वर्षाची हमी घेतली जाईल
* सांडपाणी प्रक्रिया करणारे मल निसारण प्रकल्प उभारणार
* पाण्याला दर स्थिर ठेवून मुंबईकरांना पाणी उपलब्ध करून देणार
* फुटपाथ आणि मोकळ्या जागा
* खिशाला परवडणारा बेस्ट प्रवास
* महिला आणि विध्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास
* महापालिकेच्या पार्किंगमध्ये मोफत पार्किंग व्यवस्था
* प्रत्येक वार्डात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
* समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात रूपांतर करून वापरण्यायोग्य करणार
* मुंबईतील नालेसफाई 12 महिने प्रक्रिया राबवणार
* मुंबईतील नागरिकांना 100 युनिटपर्यत वीज मोफत
20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात
राज ठाकरे २० वर्षानंतर सेनाभवनात एकत्र आले आहेत. हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली असं आहे. संयुक्त सभा, संयुक्त पत्रकार परिषदा, संयुक्त मुलाखत आणि संयुक्त वचननामा. सर्व काही संयुक्त होत आहे. आज शिवशक्ती एकत्र आली आहे. सेना, मनसे आणि राष्ट्रवादीचा संयुक्त वचननामा प्रकाशित होत आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी या सभागृहात दोन दिवसांपूर्वी वचननाम्यावर चर्चा करून माहिती दिली आहे. आज अधिकृत प्रकाशन होणार आहे असे संजय राऊत म्हणाले.
