तर पाचव्या अणि सहाव्या रेल्वे रुळांचे काम थांबवू; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

रेतीबंदर पादचारी पुलाच्या कामा अभावी होणाऱ्या अपघातांवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. रेतीबंदर येथील पादचारी पुलाच्या बाबतीत रेल्वेकडून जी भूमिका घेतली जात आहे ती बेजबाबदारपणाची आहे.

तर पाचव्या अणि सहाव्या रेल्वे रुळांचे काम थांबवू; जितेंद्र आव्हाड यांचा इशारा
jitendra awhad

ठाणे: रेतीबंदर पादचारी पुलाच्या कामा अभावी होणाऱ्या अपघातांवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. रेतीबंदर येथील पादचारी पुलाच्या बाबतीत रेल्वेकडून जी भूमिका घेतली जात आहे ती बेजबाबदारपणाची आहे. रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळेच 50 जणांचे जीव गेले आहेत. त्यामुळे जर त्वरीत रेतीबंदर पादचारी पुलाचे काम सुरु केले नाही तर, पाचव्या- सहाव्या मार्गाचे कामच होऊ देणार नाही, असा इशारा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

पादचारी पुलाचे भूमिपुजन झाल्यानंतर पाच वर्षे उलटली आहेत. मात्र, अद्यापही पादचारी पुलाचे काम सुरु होत नाही. त्यामुळे अपघात होऊन अनेक नागरिकांचे प्राण जात आहेत. त्या विरोधात आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रेतीबंदर येथे गेल्या पाच वर्षात 50 जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झालेला आहे. रेल्वेने पादचारी पुलाच्या कामाचे भूमिपुजन केले होते. त्यानंतर लगेचच या पुलाचे काम थांबविण्यात आले होते. त्यामुळेच गेल्या पाच वर्षात जे 50 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्याची जबाबदारी मध्य रेल्वेला घ्यावीच लागेल. त्यामुळे त्वरीत पादचारी पुलाचे काम सुरु करावे; अन्यथा, पुढील 8 दिवसात आम्हाला रेल्वे बंद करावी लागेल. अतिशय उग्र आंदोलन रेल्वेच्या विरोधात होईल. एवढेच नाही तर रेल्वेने जे पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरु केले आहे. ते कामही आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

अपघातात 50 जणांचा मृत्यू

रेल्वेने पादचारी पुलाच्या जागेत बदल केला असल्याचा खुलासा केला आहे. याबाबत विचारले असता, रेल्वेकडून शंभर टक्के खोटे बोलले जात आहे. अशा पद्धतीचा कोणताही बदल करण्यात आलेला नाही; त्यामुळेच आपण पुन्हा एकदा ठामपणे म्हणत आहोत की रेतीबंदर परिसरात जे 50 लोक अपघातात मृत्यमुखी पडले आहेत. त्यास मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसीच जबाबदार आहे. ठामपाशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले जात आहे. गेले पाच वर्ष चर्चाच सुरु आहे का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

उल्हासनगरात ‘करेक्ट कार्यक्रम’

दरम्यान, उल्हासनगर शहरात काल मोठी राजकीय उलथापालथ झाली. माजी आमदार पप्पू कलानी यांच्या सूनबाई आणि उल्हासनगर महापालिकेच्या माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यानंतर टीम कलानीच्या 22 नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश झाला. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उल्हासनगरचा दौरा केला होता. भाजपचे अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील असा सुतोवाच त्यांनी केले होते. त्यानंतर आव्हाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाल्याने मंत्री जयंत पाटील आले आणि ‘करेक्ट कार्यक्रम’ करून गेले अशी चर्चा उल्हासनगर शहराच्या राजकिय वर्तुळात सुरू आहे.

 

संबंधित बातम्या:

उल्हासनगरात राजकीय भूकंप, पप्पू कलानींच्या सुनेसह 22 नगरसेवकांच्या हाती ‘घड्याळ’

VIDEO : कल्याण पाठोपाठ आता भिवंडीत महिला चोरांचा सुळसुळाट, ज्वेलर्स मालकाची नजर चुकवत बांगड्या लांबविल्या

राष्ट्रवादीत प्रवेश न करणाऱ्या नगरसेवकांची नावंही यादीत, टीम ओमी कलानीवर नामुष्की

(jitendra awhad reaction on Fifth-sixth line between Diva-Thane)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI