AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आरोपीचा एन्काऊंटर करा, त्याला फाशी द्या’; कल्याणमध्ये महिला संतापल्या

कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अपहरण, अत्याचार आणि हत्येने स्थानिक महिलांमध्ये तीव्र संताप आहे. या घटनेवर स्थानिक महिलांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.

'आरोपीचा एन्काऊंटर करा, त्याला फाशी द्या'; कल्याणमध्ये महिला संतापल्या
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: Chetan Patil | Updated on: Dec 25, 2024 | 8:45 PM
Share

कल्याण पूर्वेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे स्थानिक महिला या अतिशय आक्रमक झाल्या आहेत. या घटनेनंतर स्थानिक महिला संतप्त झाल्या असून, महिला आणि लहान मुलींच्या मनात भीतीचे वातावरण आहे. स्थानिक महिलांनी आरोपीच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “जर सहा महिन्यांनी आरोपी सुटून येतो आणि अशा प्रकारचं कृत्य करतो, आम्ही आमच्या मुलींना बाहेर सोडायचं की नाही? अशी भीती आम्हाला वाटत आहे. त्याचबरोबर आम्ही इकडे राहायचं की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. घरातून बाहेर मुलांना पाठवायला भीती वाटत आहे”, असं स्थानिक महिला म्हणाल्या आहेत.

“तो दर तीन ते चार महिन्यानंतर सुटून येतो. त्याला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे हे पाहिलं पाहिजे. आम्हालाच कळत नाही तो कसा सुटून येतो? आरोपीचा एन्काऊंटर करा किंवा त्याला फाशी द्या, हीच आमची मागणी आहे. आरोपीची दहशत सगळीकडे आहे. आता पण भीती वाटते, त्याचे मित्र येऊन आम्हाला मारतील का? अशी भीती आमच्या मनात आहे. पोलीस त्याला पैसे घेऊन सोडतात. त्याला पोलिसांच्या ताब्यात नाही, सर्वसाधारण लोकांच्या हातात द्या. आम्हाला काय करायचे ते करू”, अशा शब्दांत महिलांनी संताप व्यक्त केला.

सुलभा गायकवाड यांनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट

दरम्यान, भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “पीडितेच्या कुटुंबियांना आम्ही भेटलो. तिची आई रडत आहे. त्यांच्या मोठा आक्रोश मनात आहे. घरात मुलीला आवाज देत आहे. तिचा आक्रोश बघवत नाही. तिचं एकच म्हणणं आहे की, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिले आहे की, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळेल. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल. राजकीय दबाव असल्याचं जे कोणी सांगतात त्याप्रमाणे चौकशी व्हावी. मात्र एका मुलीची हत्या झाली आहे. या वेळेला राजकारण करू नये”, अशी प्रतिक्रिया सुलभा गायकवाड यांनी दिली.

Follow Us
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?