AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र कल्याण गमवणार की राखणार ? राष्ट्रवादी भाजपच्या नाराजगीत होणार मोठा गेम !

कल्याण लोकसभेत महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसला तरी कल्याण लोकसभा एकहाती जिंकण्यासाठी आणि हॅट्ट्रिक करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन घडवून आणावे लागणार आहे, तसेच मनसे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही जवळ करावे लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र कल्याण गमवणार की राखणार ? राष्ट्रवादी भाजपच्या नाराजगीत होणार मोठा गेम !
| Edited By: | Updated on: Mar 23, 2024 | 8:56 AM
Share

कल्याण लोकसभेत महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसला तरी कल्याण लोकसभा एकहाती जिंकण्यासाठी आणि हॅट्ट्रिक करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन घडवून आणावे लागेल.  तसेच मनसे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही जवळ करावे लागणार आहे.

दिवा भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. यात कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी, यावर एकमत झाले. यानंतर दिवा शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कल्याण लोकसभेचा मतदारसंघ हा भाजपसाठी पोषक वातावरण असलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजपच्या आमदारांची संख्या आणि नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन, त्याचबरोबर येथील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन येथील निवडणूक कमळ चिन्हावर लढवावी अशी आग्रही मागणी या पत्रात दिवा शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आणि कल्याण लोकसभेत एकच खळबळ माजली.यानंतर कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीत भाजप पदाधिकारी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात एक बैठक आणि मेळावा पार पडला. यात भाजप कार्यकर्त्यांचा आणि श्रीकांत शिंदे यांचा संवाद होऊन कार्यकर्त्यांचा राग शांत करण्यात आला

लोकसभेच्या तीन निवडणुका धनुष्यबाण चिन्हावर जिंकल्या, आगामी निवडणूकही धनुष्यबाणावर जिंकू

तर दुसरीकडे दिव्यातील भाजप पदाधिकारी यांना युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी शिवसेना स्टाईलने उत्तर देत टोला हाणत सांगितले की आमची इच्छा आहे की गेल्या तीन लोकसभेच्या निवडणुका धनुष्यबाण चिन्हावर जिंकल्या आहेत. येती निवडणूकही धनुष्यबाण चिन्हावर लढवली जाईल आणि जिंकलीही जाईल. प्रत्येक कार्यकर्त्याला मागण्या करण्याचा अधिकार असतो, पण ती पूर्ण होतेच असे नाही. काही लोकांची सवय आहे, पोकळ प्रसिद्धीसाठी अशीच पत्र देत असतात. त्या पत्राला महत्त्व द्यायची गरज नाही, असेही म्हात्रे म्हणाले.

कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ श्रीकांत शिंदे हे एकमेव उमेदवार

दरम्यान मंत्री चव्हाण यांनी पुढाकार घेत शिंदे यांची बाजू भक्कमपणे मांडत सांगितले, की कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ श्रीकांत शिंदे हे एकमेव एनडीएचे उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना काम सुरू करण्यास सांगण्यासाठी ही बैठक घेतल्याचे त्यांनी सांगितले. श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत. निवडणुकीच्या कामाला सुरुवात करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह आणि त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना सुद्धा हॅट्ट्रिक खासदार करण्यात सगळ्यांना फार आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण पूर्वेत गणपत गायकवाडांचा विरोध …

दरम्यान मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीसारखी बैठक उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये सुद्धा घेतली. मात्र कल्याण पूर्व मतदारसंघात अशी बैठक झाली नाही, त्यामुळे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक आणि कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी खासदार शिंदे यांना मदत करत नसल्याचे स्पष्ट होत आहे. कल्याण पूर्वेत भाजप आमदार गायकवाड यांच्या बॅनरवर शिंदेंचा फोटो लावला जात नसल्याचे वारंवार समोर आले आहे. भाजप आमदार गायकवाड यांच्या पत्नी या कल्याण पूर्व मतदारसंघात अॅक्टिव्ह झाल्या आहेत. त्यामुळे खा. शिंदेंपुढे त्यांचेही आव्हान असू शकते. तर दुसरीकडे महायुतीमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बारामती मधील जागेसाठी इच्छुक असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी विरोधात भूमिका मांडत अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणुकीत उभा राहण्याचा आवाहन केलं यानंतर संतप्त अजित पवार गटाने ठाणे आणि कल्याण लोकसभेत क्षेत्र वेगळ्या असेल असा इशारा देत ज्या प्रकारे स्थान दिले पाहिजे तसे दिले जात नाही,असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या बोलण्यावरुन सिद्ध झाल्याने राष्ट्रवादी पवार घटा करून मी यावेळेस श्रीकांत शिंदे यांच्यात विरोधाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे

मनसेची क्रेझ…निवडून यायचं असेल तर त्यांनी सावरून घ्यायला पाहिजे – राजू पाटील यांचा सल्ला

दरम्यान राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग कल्याण लोकसभेत आहे. तर मनसे एकमेव आमदार राजू पाटील हे लोकसभेतील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आले आहेत. या सर्व घडामोडी पाहता खा. शिंदे यांना मनसेला जवळ करावे लागणार आहे. याच घडामोडींवरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी एक सल्ला देत सांगितले की कोणी कितीही आटापिटा केला तरी, यावेळी कल्याण लोकसभेतील कोणत्याही उमेदवाराने मतदारसंघात मोठ्या मताधिक्याची भाषा करू नये. या मतदारसंघातील उमेदवार हा काठावरच पास होणार आहे, तर निवडून यायचं असेल तर त्यांनी सावरून घ्यायला पाहिजे, असा सल्ला नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला होता.

एकीकडे महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नसला तरी कल्याण लोकसभा एकहाती जिंकण्यासाठी आणि हॅट्ट्रिक करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि मनसेला सोबत घेऊनच मोठा विजय होऊ शकतो असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे खासदार शिंदे आणि महायुती हे कसे हॅन्डल करणार हे पहावे लागणार आहे

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.