AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवरायांचे आठवावे रूप… छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यास, या किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी अधिक संधी उपलब्ध होतील. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि सांस्कृतिक वारशाचे जतन योग्य प्रकराे केले जाईल, असे ॲड. आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

शिवरायांचे आठवावे रूप... छत्रपती शिवाजी महाराजांच्या या 12 गड-किल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळणार
chhatrapati-shivaji-maharaj
| Updated on: Feb 25, 2025 | 3:06 PM
Share

हिंदूस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड आणि किल्ल्यांना जतन केले जाण्याची मागणी नेहमीच केली जात असते. जगाच्या इतिहासात एकमेक अशा महान राजाचा हा वारसा जतन करण्यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या संदर्भात महाराजाच्या १२ गड आणि किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सह्याद्री कडेकपारीतील जिता जागता इतिहास असलेल्या मावळप्रांतातील जु्न्रर येथील शिवरायांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्यापासून ते स्वराज्याची पहिली आणि दुसरी राजधानी असलेल्या राजगड आणि रायगड किल्ल्यांसह १२ किल्लांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळावे यासाठी आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल झाले असून वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांना हे शिष्टमंडळ रविवारी भेटले आहे.

महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असलेल्या विशाल यांच्यासह, केंद्र सरकारच्या प्रयत्नाने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने आपल्या राजे शिव छत्रपतींच्या १२ गड किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाले आहे असे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले आहे.मात्र, त्यावर संपूर्णपणे निर्णय होणे बाकी आहे, त्याबद्दलचे सादरीकरण आणि यासंबंधित पुढील टप्प्यातील तयारीसाठी आज शिष्टमंडळासोबत आम्ही येऊन चर्चा केली, असेही ॲड. शेलार यांनी सांगितले. यावेळी शिष्टमंडळ सदस्य म्हणून अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन उपस्थित होत्या.

शेलार पॅरीसमध्ये

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मराठा लष्करी भूप्रदेश’  ( Maratha Military Landscape of India ) या संकल्पनेअंतर्गत प्रस्ताव सादर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हे शिष्टमंडळ पॅरीसला गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचा राज्य सरकारचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनेस्कोकडे पाठवला त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी जाण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मंत्रीॲड. शेलार यांनी आभार मानले आहेत.

या किल्ल्यांचा समावेश वारसा यादीत होणार

या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. हा प्रस्ताव घेऊन महाराष्ट्र शासनाचे चार सदस्यांचे शिष्टमंडळ २२ ते २६ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे गेले आहे. या शिष्टमंडळाचे नेतृत्व सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार करीत आहे. इतर सदस्यांमध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उप संचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद श्रीमती शिखा जैन यांचा समावेश आहे.

या शिष्टमंडळाच्या पॅरिस दौऱ्याद्वारे, या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि राजनैतिक सादरीकरण करण्यात येईल. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होणार आहे. आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसाचा जतन आणि त्याचे महत्त्व वाढून त्याचे ऐतिहासिक पर्यटन देखील होण्यास मदत होई असे म्हटले जात आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.