Maharashtra News LIVE 15th June 2025 : पुण्याच्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू
Maharashtra News LIVE in Marathi : आज 14 जून 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

अहमदाबादहून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळल्याने तब्बल २६५ लोकांचा मृत्यू झाला होता. या भीषण घटनेला दोन दिवस उलटत नाहीत, तोच आता उत्तराखंडमधील केदारनाथ येथे एक मोठा हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. या अपघातात पायलटसह ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या असल्या तरी खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. तर दुसरीकडे मुंबईसह उपनगरात आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार आणि पालघर परिसरात पाऊस सुरू असून, पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. सुदैवाने, सध्या पडणाऱ्या पावसाचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. तिन्ही मार्गावरील लोकल सेवा तसेच शहरातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन यासह सर्व क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान येथील विश्वगंगा नदीत बुडून दोघींचा मृत्यू
नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान येथील विश्र्वागंगा नदीत बुडून दोघींचा मृत्यू झाला. खामगाव येथील मायलेकीचा विश्वगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. देवदर्शनासाठी गेले असता नदीत पाय घसरून पडल्याने दोघी बुडाल्या. मलकापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले असून माहिती घेतली. एकाच कुटुंबातील 7 ते 8 जण नदीत पोहण्यासाठी उतरले होते. मृतक महिलेचे नाव पूनम मयूर जामोदे 32 वर्ष , तिची मुलगी आरोही मयूर जामोदे वय 5 वर्ष असून दोघेही खामगावच्या आहेत.
-
इंद्रायणी पूल दुर्घटनेतून 38 जणांना वाचवण्यात यश
पुण्यातील मावळमध्ये कुंडमळ्यात पूल कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. तर 38 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तसेच 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. यंत्रणेकडून बचाव कार्य सुरू आहे.
-
-
पुणे पूल दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पूल कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. एनडीआरएफची टीम बचाव कार्यात गुंतली आहे. लोकांना वाचवले जात आहे. जिल्हा मुख्यालयातील अनेक बचाव पथके देखील घटनास्थळी पोहोचली आहेत. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
-
क्रेनच्या सहाय्याने पूल वर उचलण्याचा प्रयत्न, एनडीआरएफकडून प्रयत्न
पुण्याच्या कुंडमळ्याजवळील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. अजून काही लोकं पुलाखाली अडकल्याची भीती आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचलेत.
-
मुंबईतील अमेरिकन दूतावासाला बॉम्बची धमकी
मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासात बॉम्ब टाकण्याची धमकी देण्यात आली होती. ही धमकी एका फोनद्वारे देण्यात आली होती. धमकीनंतर मुंबईच्या बीकेसी पोलिस स्टेशनला तात्काळ कळवण्यात आले. माहिती मिळताच बीकेसी पोलिस आणि बॉम्ब शोध पथक घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण ठिकाणी शोध घेतला, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
-
-
पुण्याच्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू
पुण्याच्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणीवरील पूल कोसळल्याने 20 ते 25 जण वाहून गेले आहेत. यापैकी 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
-
राज ठाकरेंचं वादळी व्यक्तीमत्त्व; भाजप मंत्री चंद्रकांत पाटलांकडून कौतुक
भाजप मंत्री चंद्रकांत पाटलांकडून राज ठाकरेंचे कौतुक करण्यात आले आहे. “राज ठाकरेंचं वादळी व्यक्तीमत्त्व आहे. वादळाचा जसा थांगपत्ता लागत नाही तसंच काहीस राज ठाकरेंचं आहे.” असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
-
गोगावलेंना माहिती कुठून मिळाली माहित नाही त्यांना फोन करून माहिती घेतो; रश्मी ठाकरेंवर केलेल्या वक्तव्यावर सामंतांची प्रतिक्रिया
बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला पटला नाही असं खोचक वक्तव्य गोगावलेंनी केलं आहे. रश्मी ठाकरेंचा पडद्यामागून हस्तक्षेप होता असा आरोपही गोगावलेंनी केला आहे. यावर आता उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ” मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोडले तर आम्हाला कोणालाही महायुतीवर बोलण्याचा अधिकार नाही. पण गोगावलेंना माहिती कुठून मिळाली माहित नाही. गोगावलेंना संपर्क करतो आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतो” असं उदय सामंतांनी म्हटलं आहे.
-
रश्मी ठाकरेंचा पडद्यामागून हस्तक्षेप होता, बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार पटला नाही : भरत गोगावले
बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला पटला नाही असं खोचक वक्तव्य गोगावलेंनी केलं आहे. रश्मी ठाकरेंचा पडद्यामागून हस्तक्षेप होता असा आरोपही गोगावलेंनी केला आहे. तसेच शिंदेंना आघाडीत सीएम बनवलं असतं तर वेगळं चित्र असतं असंही ते म्हणाले.
-
रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट; मुंबईसह विदर्भात यलो अलर्ट
रत्नागिरीतील पावसमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुसळधार पावसामुळे नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्याने दुकांनासोबतच घरांमध्येहीपाणी शिरलं. रत्नागिरीला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
-
नाशिक- सुधाकर बडगुजर आणि गणेश गीतेंच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त
नाशिक- सुधाकर बडगुजर आणि गणेश गीतेंच्या भाजप प्रवेशाला मुहूर्त लागणार आहे. भाजप वरिष्ठांच्या सूचनेनंतर स्थानिक भाजपचा विरोध मावळला आहे. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी बडगुजर आणि गीतेंच्या प्रवेशावर स्पष्टीकरण दिलं. इतर पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना प्रवेश न दिल्यास ते दुसऱ्या पक्षात जातील. स्थानिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप होत असतात पण पक्षवाढीसाठी प्रदेश पातळीवर निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल, असं शहराध्यक्ष म्हणाले.
-
पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांकडून एन्काऊंटर
पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला असून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली. शाहरुख ऊर्फ अट्टी रहीम शेख असं या सराईत गुंडाचं नाव आहे. पहाटे साडेतीन वाजता पोलीस आणि आरोपीमध्ये चकमक झाली.
-
मी गोगावलेंसारख्या उडाणटप्पू लोकांना उत्तर देत नाही- भास्कर जाधव
“भरत गोगावले काय बोलले हे मी ऐकलं नाही. पण मी गोगावलेंसारख्या उडाणटप्पू लोकांना उत्तर देत नाही,” अशी प्रतिक्रिया चंद्रपूरमध्ये आढावा बैठकीसाठी आलेले शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दिली.
-
केदारनाथमधील हेलिकॉप्टर अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट
केदारनाथमधील हेलिकॉप्टर अपघाताबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलंय. ‘‘केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरला गौरीकुंड इथं अपघात होऊन यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबातील तिघा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती यवतमाळच्या आपत्ती निवारण कक्षाकडून मिळाली. ही दुर्घटना दुर्दैवी आणि दुःखद असून या कुटुंबास आवश्यक ते सर्व साह्य करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेस दिल्या आहेत. जयस्वाल कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी असून शासन आपल्या पाठीशी आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना विनम्र श्रद्धांजली,” असं त्यांनी लिहिलंय. -
नंदुरबार- म्हसावद परिसरात वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड
नंदुरबार- शहादा तालुक्यातील म्हसावद परिसरात रात्री आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली आहे. काल सायंकाळी आलेल्या वादळामुळे तब्बल २०० घरांचं नुकसान झालंय. म्हसावद परिसरासह राज्यमार्ग क्रमांक एकवर १०० हून अधिक झाडं उन्मळून पडली आहेत. विद्युत खांबवर झाड पडल्याने बऱ्याच काळापासून वीजपुरवठा खंडित आहे.
-
शहादा तालुक्यातील म्हसावद परिसरात रात्री आलेल्या वादळ वाऱ्यामुळे घरांची पडझड मोठ्या प्रमाणावर…
शनिवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे तब्बल २०० घरांचे नुकसान… म्हसावद परिसरासह राज्यमार्ग क्रमांक एकवर १०० हून अधिक झाडे पडली उल्मळून..विद्युत खांबवर झाड पडल्याने गेल्या अनेज तासांपासून वीजपुरवठा खंडित… गेल्या दोन दिवसात १०० मिमी पावसाची जिल्ह्यात नोंद… शेतीसह व्यापारांचा प्रचंड नुकसान अनेक दुकानदारांना बसला फटका…
-
नाशिकमध्ये अतिक्रमण मोहिमेस सुरुवात
मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी मनपाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर दुसऱ्या दिवशीच कारवाईला सुरुवात… अतिक्रमण मोहिमेदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात… महापालिका आणि पोलिसांचे संयुक्तरीत्या कारवाई… नाशिक शहराचा मुख्य चौक असलेल्या द्वारका सर्कल परिसरात अतिक्रमणाची मोहीम… शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अतिक्रमण मोहीम
-
मोदी गरीब घरात जन्मले, सोन्याचा चमचा घेऊन आले नाही – पंकजा मुंडे
त्यामुळे गरीबाची जाणीव म्हणून उज्वला गॅस योजना राबविली… बेटी बचाव बेटी पढाओ योजना, स्वच्छता अभियान असे विविध योजना राबविली गेली… संकल्प ते सिद्धी तक ही संकल्पना हे मोदी सरकारचे संकल्प आम्ही राबवितो आहे…. पर्यावरण दिनी जनजागृती मोठ्या प्रमाणात केली… सर्वांनी प्लास्टिक मुक्ती केली पाहिजे.., मोबाईल टॉवरमुळे पक्षाच्या जीवावर बेततो त्यामुळे याकडे देखील उपाय योजना करण्यात येतील… असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
-
पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी केला इन्काउंटर
घटनास्थळावर पोलीसांची फॉरेन्सिक टीम दाखल झालीय… सोलापुरातल्या लांबोटी गावाजवळील चंदन नगर येथे पुणे गुन्हे शाखेची कारवाई.. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वय 23 असे या सराईत गुंडाचे नाव… शाहरुख उर्फ अट्टी शेख याच्यावर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत… पहाटे साडेतीन वाजता पोलीस आणि आरोपीमध्ये चकमक झालीय… पुणे क्राईम ब्रांचच्या टीमने आरोपी शाहरुखला सरेंडर करण्यास सांगितल्यानंतर आरोपी शाहरुखने फायर केल्याचा पोलिसांचा दावा… त्यानंतर पोलिसांनी पायासह एकूण 4 गोळ्या फायर केल्या त्यामध्येच तो जखमी… दरम्यान घरनेवेळी आरोपी शाहरुख सोबत त्याची पत्नी आणि दोन मुळे होती… सध्या सोलापूर ग्रामीण पोलीस, पुणे क्राईम ब्रांच, फॉरेन्सिक टीम, बिडडीएसची टीम घटनास्थळी दाखल झालीय…
-
दुबार पेरणीचे संकट
गडचिरोली जिल्ह्यात कापूस मिरची व भात शेतीच्या शेतकर्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. मोठा पाऊस ना आल्यास दुबारा पेरणी करण्याचे शेतकर्यांच्या मनात भीती आहे. शेतकऱ्यांनी कापसाची पेरणीला सुरुवात केली असून गडचिरोली जिल्ह्यात फक्त रिमझिम पावसाने हजेरी लावली होती
-
एकनाथ खडसे यांना महाजनांकडून धक्का
मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड मुक्ताईनगर मधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश युवक सचिव विजय चौधरी, काही सरपंच शेकडो कार्यकर्त्यांसह यांनी महाजनांच्या उपस्थिती भाजपात प्रवेश केला.
-
शनिवारवाडा परिसरातील नागरिकांचे घंटा नाद आंदोलन
शनिवार वाड्याच्या शंभर फुटापर्यंत बांधकामाला परवानगी मिळावी यासाठी घंटा नाद आंदोलन करण्यात आले. शनिवार वाडा परिसर हेरिटेज ग्रस्त समितीच्या वतीने शनिवार वाडा समोर आंदोलन करण्यात आले. ऐतिहासिक वास्तुच्या परिसरात राहत आहोत हा आमचा गुन्हा आहे का असा सवाल नागरिकांनी विचारला.
-
स्मार्ट मीटरला विरोध
कल्याण मध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने केली स्मार्ट मीटर लावण्यास गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली.
-
पुण्यातील सराईत गुंडाचा एन्काऊंटर
पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरात पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. शाहरूख नावाच्या गुंडावर पुण्यासह परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. तो सोलापूरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
-
जनता आता सावध
विधानसभा निवडणूक आपण लांड्या लबाड्या करून जिंकलात महानगरपालिकेच्या दृष्टीने आपण तेच तयारी करतात पण या वेळेला जनता अत्यंत सावध आहे असे राऊत म्हणाले. तुम्हाला येणारा काळ दाखवून देईल काय करायचा आहे ते असे ते म्हणाले.
-
ठाकरे ब्रँड अपराजित आणि अजिंक्य
महाराष्ट्रात ठाकरे हा जो ब्रँड आहे तो अपराजित आहे अजिंक्य आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी ठाकरे कुटुंबाने जे केला आहे संघर्ष केला आहे त्या केला आहे एक स्वाभिमानी महाराष्ट्र मराठी माणूस घडविला त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही
-
गिरीश महाजन यांच्याकडून खडसेंना धक्का
मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड मुक्ताईनगरमधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश युवक सचिव विजय चौधरी, काही सरपंच शेकडो कार्यकर्त्यांसह यांनी गिरीश महाजनांच्या उपस्थिती भाजपात प्रवेश केला.
-
4 नक्षलवाद्यांचा खात्मा
मध्य प्रदेशातील नक्षलग्रस्त बालाघाट जिल्ह्यात नक्षल निर्मूलनासाठी तैनात असलेल्या जवानांना पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. काल शनिवारी दुपारी रूपझर पोलिस ठाण्याच्या बिथली पोलिस चौकीच्या पचामा दादर भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत जवानांनी 4 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
-
बांधकामामुळे पर्यायी रस्ता वाहून गेला
जळगावच्या जामनेरमध्ये वाकी गावात पुलाच्या बांधकामामुळे तयार केलेला पर्यायी मातीचा रस्ता मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे. पुलाचे बांधकाम तसेच पर्यायी मातीचा रस्ता वाहून गेल्याने तब्बल पाच ते सहा एकर शेतामध्ये पावसाचं पाणी शिरल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
-
वीज पडून एकाचा मृत्यू
मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड गावात आज 44 वर्षीय शेतकरी शांताराम शंकर कठोरे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत होते. वातावरण ढगाळ असले तरी नियमित काम सुरू होतं. पण अचानक जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि काही क्षणातच त्यांच्या अंगावर वीज कोसळली.
-
मुंबईसह आसपासच्या परिसरात पावसाची संततधार, ढगाळ वातावरणामुळे सर्वत्र काळोख
मुंबई आणि आसपासच्या परिसरात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरणामुळे सर्वत्र काळोख पसरला आहे. हवामान खात्याने कोकण, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या तरी शहरात सखल भागांत पाणी साचलेले दिसत नाही. महानगरपालिका अलर्ट मोडवर असून, पालिकेने सखल भागांसाठी सक्शन पंपांची तयारी केली आहे. मध्य रेल्वेच्या द्रुतगती मार्गावर सध्या तरी पावसाचा कोणताही परिणाम जाणवत नाही, मात्र महामार्गांवर वाहने धीम्या गतीने धावताना दिसत आहेत.
-
पुण्यातील सराईत गुंड शाहरुखचा सोलापुरात एन्काउंटर
पुण्यातील सराईत गुंड शाहरुख ऊर्फ अट्टी रहीम शेख याचा सोलापुरात पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावाजवळ पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली. शाहरुख ऊर्फ अट्टी शेख याच्यावर पुणे पोलिसांत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो गेल्या काही दिवसांपासून सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपून बसल्याची माहिती पुणे गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुणे गुन्हे शाखेचे पथक काल मध्यरात्री लांबोटी येथे त्याला अटक करण्यासाठी दाखल झाले. पोलिसांनी शाहरुख लपलेल्या घरावर छापा टाकला असता, आरोपी शाहरुख शेखने पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शाहरुख ऊर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
-
राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून महापालिकेतील महिला कर्मचाऱ्याला त्रास, लवकरच सुनावणी
पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला कर्मचाऱ्याला राजकीय पक्षाच्या नेत्याकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याच्या प्रकरणाची महापालिकेच्या अंतर्गत समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी ५ जून रोजी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर, आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ६ जून रोजी आयुक्तांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. यानंतर, संबंधित राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला महापालिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणाची अंतर्गत समितीसमोर सुनावणी झाली असून, कागदपत्रांची तपासणी आणि काही विभागांकडून अहवाल प्राप्त करून घेतल्यानंतर पुढील आठवड्यात पुन्हा सुनावणी होणार आहे. या सुनावणीचा आणि पुढील कार्यवाहीचा अहवाल त्यानंतर राज्य महिला आयोगाला सादर केला जाईल, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
Published On - Jun 15,2025 9:09 AM
