AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 15th May 2025 : भारत पाकिस्तान तणावामुळे चारधाम यात्रेवर परिणाम

| Edited By: | Updated on: May 16, 2025 | 8:05 AM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 15 मे 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 15th May 2025 :  भारत पाकिस्तान तणावामुळे चारधाम यात्रेवर परिणाम

प्रथमच भारतातून मुंबई येथून दुबई आणि आखाती देशात थेट कांदा वाहतूक. गेल्या आठ दिवसात तीनशे कंटेनरची पाच जहाजातून वाहतूक. तीनशे कंटेनर मधून नऊ हजार मेट्रिक टन कांदा निर्यात. पाकिस्तानच्या कराची येथील कासिम पोर्टवरून वाहतूक बंदीमुळे दोन दिवस अगोदरच कांदा पोहचला. केंद्र सरकारने या निर्णयात बदल करू नये कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांची मागणी. पाकिस्तानच्या कराची येथील कासिम पोर्टवरून वाहतूक बंदीचे व्यापाऱ्यांकडून स्वागत. पुण्यात पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मॉक ड्रील. आदेशाची वाट न पाहता सर्व वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरण्याच्या सूचना. पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आतापासून तयारी सुरु करावी. आठवडाभरात महापालिका, अग्निशमन दल यांच्याशी समन्वय साधून मॉक ड्रिल करावी. पावसाळ्यात वाहतूक कोंडी झाल्यास आदेशाची वाट न पाहता सर्व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रस्त्यावर उतरावे असे स्पष्ट आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 May 2025 04:59 PM (IST)

    खेड तालुक्यातील कडूस येथे गारपिटीसह अवकाळी पाऊस

    पुण्याच्या खेड तालुक्यातील कडूस येथे गारपिटीसह अवकाळी पावसाने वीट भट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  • 15 May 2025 04:47 PM (IST)

    भारत पाकिस्तान तणावाचा चारधाम यात्रेवर परिणाम

    भारत पाकिस्तान तणावाचा चारधाम यात्रेवर परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. चारधाम यात्रेकरूंची संख्या 31 टक्क्यांनी घटली.

  • 15 May 2025 04:42 PM (IST)

    इगतपुरीत अवकाळी पावसाचा धुमाकूळ, कांदा आणि भाजीपाला पिकांना फटका

    इगतपुरीत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. सलग आठव्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे  उन्हाळी कांदा, बाजरी आणि भाजीपाला या पिकांना फटका बसला आहे.

  • 15 May 2025 04:25 PM (IST)

    पश्चिम बंगाल: भाजपला मोठा धक्का, माजी मंत्री जॉन बारला तृणमूल काँग्रेसमध्ये

    पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जॉन बारला हे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. जॉन बारला यांनी पक्षाध्यक्ष सुब्रत बॉक्सी आणि अरुप बिस्वास यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

  • 15 May 2025 04:05 PM (IST)

    आम्ही अधिकाऱ्यांना तुरुंगातही पाठवू शकतो: सर्वोच्च न्यायालय

    हैदराबादच्या कांचा गचीबोवली जंगलात झाडे तोडल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणाच्या अधिकाऱ्यांना तुरुंगवासाची ताकीद दिली आहे. सरन्यायाधीश बीआर गवई म्हणाले की, जर तुम्हाला मुख्य सचिव आणि अर्धा डझन अधिकाऱ्यांना तात्पुरत्या तुरुंगात जायचे असेल तर आम्ही ते करू शकतो. आम्ही नेहमीच शाश्वत विकासाच्या बाजूने राहिलो आहोत. तथापि, तेलंगणा सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली आहे आणि उन्हाळी सुट्टीनंतरची तारीख मागितली आहे.

  • 15 May 2025 04:03 PM (IST)

    मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी एमआयएमची बैठक

    मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी एमआयएमची बैठक

    महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली बैठक

    महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक

  • 15 May 2025 03:44 PM (IST)

    पुण्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसानं झोडपलं

    पुण्याच्या शिरूर तालुक्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले असून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली ,सकाळपासून वातावरणात चांगलाच उकडा जाणवत होता, अवकाळी पाऊस पडल्याने नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाली आहे.

  • 15 May 2025 03:18 PM (IST)

    अमळनेरमध्ये रल्वेचा अपघात, मालगाडी रुळावरून घसरली

    अमळनेरमध्ये रल्वेचा अपघात, मालगाडी रुळावरून घसरली

    सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प, दुरुस्तीचं कार्य वेगानं सुरू

    भुसावळकडून नंदुरबारकडे जाणारी मालगाडी रुळावरून घसरली

    दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली घटना

    सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, रेल्वेचे लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित

  • 15 May 2025 02:25 PM (IST)

    राजनाथ सिंह श्रीनगरमध्ये दाखल; एअर बेसवर घेतली सैनिकांची भेट

    केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे श्रीनगर येथे दाखल झाले असून त्यांनी एअर बेसवर सैनिकांची भेट घेतली.त्यांनी बराच वेळ सैनिकांशी चर्चा केली अन् सर्व आढावा घेण्याचा प्रयत्न केला.

  • 15 May 2025 02:08 PM (IST)

    तुर्कीबाबतचा व्यापाऱ्यांनी जो निर्णय घेतला त्याचं फडणवीसांकडून कौतुक

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुर्कीबाबतचा व्यापाऱ्यांनी जो निर्णय घेतला त्याचं अभिनंदन केलं आहे. नेशन फस्ट भूमिका घेणाऱ्या व्यापाऱ्यांचं स्वागत असं म्हणत फडणवीसांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे.

  • 15 May 2025 01:49 PM (IST)

    वॉशिंग्टन पोस्टने पाकला तोंडावर पाडलं, पाकिस्तानी हवाई दलाची क्षमता दुबळी

    भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी हवाई दलाची क्षमता दुबळी झाली आहे. पाक एअरबेसचे 3 हँगर,2 धावपट्ट्या, 2 इमारतींचे नुकसान झाले आहे.सॅटेलाईट इमेजच्या आधारे वॉशिंग्टन पोस्टने पाकला तोंडावर पाडलं आहे. तसेच नूर खान एअर बेसवर पाकिस्तानची 2 नियंत्रण केंद्रे नष्ट झाली आहेत.

  • 15 May 2025 01:25 PM (IST)

    सोफिया कुरैशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी विजय शाहवर गुन्हा दाखल

    सोफिया कुरैशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी विजय शाहवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय शाहविरोधातील FIR वरून एमपी हायकोर्टाने पोलिसांना फटकारलंही आहे. पोलिसांनी असा FIR ड्राफ्ट तयार केला आहे जो रद्द केला जाऊ शकतो असं एमपी हायकोर्टाने म्हटलं आहे.

  • 15 May 2025 01:11 PM (IST)

    भारताच्या हल्ल्यात पाकचे लॉन्चपॅड बेचिराख, नवा व्हिडीओ समोर

    ऑपरेशन सिंदूर सुरुच असून. पुन्हा एकदा भारताच्या हल्ल्यासमोर पाकचा निकाल लागला नाही. भारताच्या हल्ल्यात पाकचे लॉन्चपॅड बेचिराख झालं आहे. त्याचा एक नवा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

  • 15 May 2025 12:59 PM (IST)

    ऑपरेशन सिंदूरआधी पंतप्रधान मोदींच्या 45 गुप्त बैठका

    ऑपरेशन सिंदूरआधी पंतप्रधान मोदींच्या NSA, CDS, लष्करी अधिकाऱ्यांसोबत 45 गुप्त बैठका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहलगाम हल्ल्याचं उत्तर देण्याचा, सौदी दौऱ्यावर असतानाच मोदींनी घेतला होता निर्णय.

  • 15 May 2025 12:37 PM (IST)

    पुलवामामधील त्रालमध्ये ‘जैश’च्या 3 दहशतवाद्यांना खात्मा

    पुलवामामधील त्रालमध्ये ‘जैश’च्या 3 दहशतवाद्यांना खात्मा करण्यात आला आहे.  सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीच सुरक्षा दलांनी कारवाई करत तिघांना कंठस्नान घातलं.

  • 15 May 2025 12:36 PM (IST)

    महाड – खाऊला पैसे देण्याच्या बहाण्याने सलूनमध्ये बोलावून 5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार

    अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची एक दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यातील महाड MIDC पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. खाऊसाठी पैसे देण्याचं आमिष दाखवत सलूनमध्ये बोलावत 48 वर्षांच्या नराधमाने 5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. महाड MIDC पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॉ

  • 15 May 2025 12:16 PM (IST)

    दहशतवाद्यांचं कर्म पाहून त्यांचा खात्मा केला हाच आपला धर्म – राजनाथ सिंह 

    दहशतवाद्यांचं कर्म पाहून त्यांचा खात्मा केला हाच आपला धर्म. आपल्या सैन्याचा अचूक निशाणा हे जगाला माहीत आहे – राजनाथ सिंह

  • 15 May 2025 12:10 PM (IST)

    संपूर्ण देशाला सैनिकांचा गर्व वाटतोय, हाच संदेश घेऊन मी इथे आलोय – राजनाथ सिंह

    संपूर्ण देशाचा संदेश घेऊन पोस्टमन म्हणून मी इथे आलो आहे.  संपूर्ण देशाला सैनिकांचा गर्व वाटतोय, हाच संदेश घेऊन मी इथे आलोय, असे राजनाथ सिंह म्हणाले.

  • 15 May 2025 12:07 PM (IST)

    ऑपरेशन सिंदूरवर, सैनिकांनी केलेल्या कामगिरीवर देशाला गर्व आहे – राजनाथ सिंह

    जम्मू- काश्मीर : शहीद झालेल्या सैनिकांना नमन करतो. ऑपरेशन सिंदूरवर,  सैनिकांनी केलेल्या कामगिरीवर देशाला गर्व आहे – राजनाथ सिंह

  • 15 May 2025 11:59 AM (IST)

    इंदूताई तुमच्या उत्साहाला सलाम

    वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील ६८ वर्षाच्या इंदूताई बोरकर दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. वयाच्या ६८ व्या वर्षी ५१ टक्के गुण मिळवत आजीने यश मिळवले.सतरा नंबरचा फॉर्म भरून त्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

  • 15 May 2025 11:50 AM (IST)

    मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय

    मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना याचिकांवर जलद सुनावणीसाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे निर्देश दिले. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी हा महत्त्वपूर्ण आदेश दिला.

  • 15 May 2025 11:40 AM (IST)

    फेर प्रभाग रचनेचा आदेश

    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने फेर प्रभाग रचना करा असा आदेश निवडणूक आयोगाने सरकारला दिला आहे. ओबीसी आरक्षणाप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिल्यानंतर आता निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

  • 15 May 2025 11:30 AM (IST)

    अवकाळीचा राज्यात थयथयाट

    केवळ मुंबईच नव्हे तर कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विशेषतः नागपूर, बीड, नांदेड, सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग यांसारख्या जिल्ह्यांना अवकाळीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

  • 15 May 2025 11:20 AM (IST)

    तुर्कस्तान मुर्दाबादच्या पुण्यात घोषणा

    तुर्की सफरचंद बॉयकॉट करणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्याला आता थेट पाकिस्तानातून धमकीचे फोन येत आहेत. पाकड्यांच्या या पोकळ धमक्यांचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंद रस्त्यावर फोडली आणि पाकिस्तान तुर्कस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

  • 15 May 2025 11:10 AM (IST)

    ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “भारत पाकिस्तान युद्ध थांबलं नाही, युद्धविराम हे केवळ पत्रकारितेतले शब्द आहे. ॲापरेशन सिंदूर’ थांबलं नाही, पुढेही सुरु राहणार. भारत – पाकिस्तान या दोन्ही देशात युद्धविराम नाही, स्वल्पविराम आहे. कारवाई सुरु राहणार”, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

  • 15 May 2025 11:00 AM (IST)

    १८ लाख रेशन कार्ड रद्द

    या मोहिमेत आतापर्यंत राज्यात १८ लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहे. दीड कोटींहून अधिक कार्डधारकांची ई-केवायसी प्रलंबित आहे. आधार लिंकसाठी केंद्र सरकारच्या ई-केवायसी मोहिमेत राज्यातील १७.९५ लाख रेशन कार्ड रद्द झाल्याचे आकेडवारीत समोर आले आहे.

  • 15 May 2025 10:55 AM (IST)

    तुर्की सफरचंद बॉयकॉट करणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्याला आता थेट पाकिस्तानातून धमकीचे फोन येऊ लागलेत…

    पाकड्यांच्या या पोकळ धमक्यांचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी तुर्की सफरचंद रस्त्यावर फोडून टाकलीत आणि पाकिस्तान तुर्कस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्यात… तुर्कीचे सफरचंद घेणार नाही यावरती टाकला होता व्यापाऱ्यांनी बहिष्कार… व्यापाऱ्यांनाही धमकीचे फोन

  • 15 May 2025 10:42 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यातील कोतपल्ली गावात महिलेची हत्या

    गडचिरोली जिल्ह्यातील कोतपल्ली गावात महिलेची हत्या झाली आहे. रंजीचा मोर्ला नावाच्या महिलेचा मृतदेह गावाबाहेर सापडला आहे.

  • 15 May 2025 10:30 AM (IST)

    ‘मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या’

    ‘मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तात्काळ निर्णय घ्या’ सनन्यायाधीश भूषण गवईंचे पहिल्याच दिवशी आदेश… नव्याने खंडपीठ स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश… राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित…

  • 15 May 2025 10:10 AM (IST)

    रियाज भाटी यांची खंडणी प्रकरणातून निर्दोष मुक्तता

    रियाज भाटी यांची खंडणी प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली आहे. दाऊदशी संबंध असल्याचा आरोपही फेटाळण्यात आला आहे. पुरावे कमकुवत असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

  • 15 May 2025 09:59 AM (IST)

    सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका, मोहोळ तालुक्यातील केळी बागांचे मोठे नुकसान

    सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे मोहोळ तालुक्यातील केळी बागांचे मोठे नुकसान झालं आहे. मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा पूर्णपणे जमीनदोस्त केळी बागांसोबतच ऊस, आंबा, पेरू, चिकू अशा पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

  • 15 May 2025 09:43 AM (IST)

    राज्यात 18 लाख रेशन कार्ड रद्द, कारण काय?

    राज्यात 18 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. तसेच दीड कोटींहून अधिक कार्डधारकांची ई-केवायसी प्रलंबित आहे. आधार लिंकसाठी केंद्र सरकारच्या ई-केवायसी मोहिमेनुसार राज्यातील 17.95 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आलेत. मुंबईत सर्वाधिक 4.80 लाख तर ठाण्यातील 1.35 लाख रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. तसेच राज्यातील एकूण 6.85 कोटी कार्डपैकी 5.20 कोटींचे ई-केवायसी पूर्ण झालं आहेत. तर 1.65 कोटी रेशन कार्ड धारकांकडून ईकेवायसी करणं अजूनही बाकी आहे. अंतिम मुदत संपली असली तरी शासन निर्देश येईपर्यंत केवायसी सुरू राहणार आहे. त्यामुळे शिधाधारकांना लाभ मिळत राहणार आहे.

  • 15 May 2025 09:22 AM (IST)

    भाडेवाढीने बेस्टच्या उत्पन्नात वाढ; मात्र 3 दिवसांत 4 हजार प्रवासी घटले

    बेस्टकडून 9 मे पासून तिकीट दरवाढ करण्यात आली. त्यामुळे बेस्टच्या उत्पन्नात वाढ झाली. मात्र अवघ्या 3 दिवसांत 4 हजार प्रवासी घटले आहेत. बेस्टने किमान भाड्यात दुप्पच वाढ केली. त्यामुळे सामन्य प्रवाशांना 5 ऐवजी 10 रुपये मोजावे लागत आहेत. तर एसी बससाठी 6 रुपयांऐवजी 12 रुपये खर्च करावे लागत आहेत. या भाडेवाढीमुळे बेस्टच्या तिजोरीत वाढ झालीय. भाडेवाढीनंतर बेस्टला 13 मे रोजी 2.80 कोटींचा महसूल मिळाला. मात्र प्रवासीसंख्येत घट झाली. बेस्ट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही 8 मे पूर्वी 31.5 लाख होती. तोच आकडा 9-13 मे दरम्यान सरासरी 20 लाखांवर आलाय. फक्त 3 दिवसांत तब्बल 4 हजारहून अधिक प्रवासी कमी झाले.

  • 15 May 2025 09:02 AM (IST)

    टीएमटी बस गाड्यांची पावसाळ्यापूर्वी होणार डागडुजी

    टीएमटी बस गाड्यांची पावसाळ्यापूर्वी डागडुजी केली जाणार आहे. तसेच जुन्या झालेल्या 51 बस गाड्या भंगारात काढण्यात येणार आहेत. यंदा अवकाळी पावसामुळे गाड्यांमध्ये छताची गळती, गाड्या रस्त्यामध्येच बंद पडणे ,विद्युत यंत्रणात बिघाड अशा अनेक समस्या समोर आल्या. असे प्रकार टाळण्यासाठी प्रशासने पावसाळ्यापूर्वीच तांत्रिक दुरुस्ती इंजिन तपासणी ,छताची डागडुजी अशा कामांना सुरुवात केली आहे.

  • 15 May 2025 08:59 AM (IST)

    बेघर निराधारांसाठी ज्ञानगंगा पुन्हा दारी

    ठाणे जिल्ह्यात फिरती शाळा उपक्रम सुरू शासन, शासन निधी मंजूर. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात 170 बालकांना शाळेत प्रवेश करून देण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई आणि अंबरनाथ नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ४५० ते ५०० बालकांना शैक्षणिक वर्षात पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेऊन देण्यात आला होता.

  • 15 May 2025 08:58 AM (IST)

    मध्य महाराष्ट्रात पाऊस आणि गारपिटीची शक्यता

    आज मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि सातारा जिल्ह्यांत जोरदार वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता. अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट). कोकण आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिम बंगालपासून झारखंड, विदर्भ, तेलंगणा ते रायलसीमापर्यंत तसेच विदर्भापासून मराठवाडा कर्नाटक ते केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचे पट्टा सक्रिय आहे. ,

  • 15 May 2025 08:45 AM (IST)

    पुलवामा त्रालमध्ये चकमक

    पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षा दलांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरलं आहे. यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाल्याची माहिती आहे.

  • 15 May 2025 08:39 AM (IST)

    चाकणमध्ये महिलेवर बलात्कार

    चाकण MIDC कंपनीत कामावर निघालेल्या महिलेला ओढून नेत, बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना. 13 मे च्या रात्री 11 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी नराधम प्रकाश भांगरेला चोवीस तासांत बेड्या ठोकण्यात आल्यात.

  • 15 May 2025 08:37 AM (IST)

    पुण्यात दहा कोटींचे चरस जप्त

    बँकॉक मधून आलेल्या दोघांना डीआरआयने ताब्यात घेतले. महसूल गुप्तचर विभागाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहा कोटींचे चरस जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे तसेच डी आर आयच्या पथकाने मुंबईतून आणखी एकाला ताब्यात घेतले आहे.

Published On - May 15,2025 8:36 AM

Follow us
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...