Maharashtra Breaking News LIVE 11 February 2025 : मध्यमवर्गीयांसाठी आनंद देणारे बजेट – श्रीकांत शिंदे
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 11 फेब्रुवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

राज्य मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा आज, मंगळवारपासून सुरू होत आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. राज्य मंडळाकडून 271 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी यंदा 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. तर दुसरीकडे बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकणात नवी माहिती समोर आली आहे. हत्येनंतर आरोपी काळ्या स्कॉर्पिओ गाडीमधून पळून जातानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी इथून आरोपी पळून गेले. गाडीत एकूण सहा आरोपी होते. केज पोलीस आरोपींच्या गाडीचा पाठलाग करत होते, तर वाशी चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलिसांची माहिती मिळताच आरोपी गाडी सोडून पळून गेले. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
LIVE NEWS & UPDATES
-
नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाइन बैठकीला सुरुवात झाली आहे.या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, नरहरी झिरवाळ उपस्थित आहेत. पालकमंत्री पदाचा तिढा कायम असल्याने अजित पवार बैठक घेत आहेत.
-
ठाकरे यांनी कोरोना बॉडी बॅग घोटाळा केला – श्रीकांत शिंदे
काँग्रेसने देशातील शेतकऱ्यांना कर्जबाजारी केले आहे तर उद्धव ठाकरे यांनी कोरोना बॉडी बॅग, खिचडीमध्ये घोटाळा केला असा टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे.
-
-
मध्यमवर्गीयांसाठी आनंद देणार हे बजेट आहे – श्रीकांत शिंदे
अखिलेश यादव महाकुंभबाबत केलेले आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी फेटाळले आहेत. यंदा सादर केलेल्या बजेटला आपण पाठिंबा देत आहोत. यंदाचे बजेट मध्यमवर्गीयांसाठी आनंद देणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
-
भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक 16 फेब्रुवारी रोजी दिल्लीत होण्याची शक्यता
भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक 16 फेब्रुवारी रोजी दिल्लीत होऊ शकते. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल.
-
नागपूरमध्ये एका व्यक्तीची कारसह विहिरीत पडली, 3 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रातील नागपूरमध्ये गाडी चालवायला शिकणारा एक तरुण त्याच्या गाडीसह विहिरीत पडला. गाडीत बसलेल्या इतर दोन तरुणांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बालभारती मैदानाजवळ ही घटना घडली.
-
-
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती नियमात बदल
आपत्ती व्यवस्थापन समितीत अखेर एकनाथ शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अध्यक्ष, तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष असणार आहेत. मंत्रिमंडळाने या बाबतचा निर्णय घेतला आहे.
-
युट्यूबने रणवीर इलाहाबादियाचा वादग्रस्त व्हिडिओ काढून टाकला
रणवीर इलाहाबादियाचा वादग्रस्त व्हिडिओ काढून टाकण्यात आला आहे. YouTube ने ते काढून टाकले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही नोटीस पाठवली होती. यानंतर ही कारवाई झाली. एनएचआरसी सदस्य प्रियांक कानुंगो यांनीही व्हिडिओ काढून टाकण्याची मागणी केली होती.
-
केजरीवालांच्या हातातून पंजाब लवकरच निसटेल – रामदास आठवले
पंजाबचे आमदार आणि मंत्र्यांनी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्याशी केलेल्या भेटीबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, “दिल्लीचा पराभव हा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का आहे. पंजाबची स्थितीही चांगली नाही. शेतकरी आणि गरिबांसाठी कोणताही दिलासा नाही. दिल्लीच्या निवडणुका पाहता, अरविंद केजरीवाल यांना वाटते की काहीतरी चूक होऊ शकते आणि म्हणूनच त्यांनी ही बैठक बोलावली असावी. पंजाब लवकरच त्यांच्या हातातून निसटून जाईल.
-
लाँग मार्च का थांबवला?, सूर्यवंशी कुटुंबाचा सवाल
लाँग मार्च मुंबईपर्यंत जाऊ द्यायला हवा होता. तो का थांबवला असा सवाल सूर्यवंशी कुटुंबाने उपस्थित केला आहे. सूर्यवंशी कुटुंबाचा धस यांना प्रश्न विचारला आहे. येत्या दिवसात उपोषण करणार असल्याचं सूर्यवंशी कुटुंबाने सांगितलं आहे.
-
बळीराजासाठी कट्टर विरोधक चंद्रकांत पाटील अन् एकनाथ खडसे एकत्र
मुक्ताईनगरमधील इंदूर ,हैदराबाद भूसंपादनाचा अल्प मोबदला मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून थेटआंदोलन सुरू केलं आहे. शेतकऱ्यांसाठी मतदार संघातील दोन कट्टर विरोधक आमदार चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे शेतकऱ्यांसाठी एकत्र आलेले पाहायला मिळाले. महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांची जमीन जात आहे त्याचा मोबदला शेतकऱ्यांना अल्प स्वरूपात मिळत असल्याने शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला आहे. लवाद न्यायालयात दिलेला निर्णय चुकीचा असून प्रशासन व सरकारचा निषेध या ठिकाणी करण्यात आला.
-
शिसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर?
14 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची आभार सभा आयोजित करण्यात आली आहे. नाशिक शिवसेनेची शासकीय विश्रामगृह येथे नियोजन बैठक सुरू आहे. नियोजन बैठकीत शिंदेच्या शिसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचं बोललं जात आहे. बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेसाठी जास्तीत जास्त संख्येने शिवसैनिक आणण्याच्या उपस्थितांना सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय करंजकर यांनी गटतट असले तरी पक्षासाठी सर्वांनी एकत्र यावे लागते असे बोलल्याने पक्षातच अंतर्गत गटबाजी सुरु असल्याचं अधोरेखित केलं आहे.
-
सुहास कांदेनी पदाधिकाऱ्यांना चांगलचं धारेवर धरलं; जास्त संख्येनं शिवसैनिक आणण्यासाठी सज्जड दम
सुहास कांदेनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना चांगलचं धारेवर धरलं आहे. जास्त संख्येनं शिवसैनिक आणण्यासाठी सज्जड दम दिल्याचं समोर आलं आहे. 14 फेब्रुवारीला नाशिकमध्ये नियोजन बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत जास्तीत जास्त शिवसैनिकांना आणण्याचं आवाहन सुहास कांदेंनी पदाधिकार्यांना केलं आहे.
-
अजित दादांनी कालची बैठक आज ठेवली : भरत गोगावले
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद अजून सुरुच आहे. रायगडमध्ये काही तासांपूर्वी उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला अनुपस्थितीत राहिल्यावरुन पालकमंत्रिपदासाठी आग्रही असलेल्या भरतशेठ गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादांनी कालची बैठक आज ठेवली. ठरायगडावरील कार्यक्रमामुळे बैठकीला गेलो नाही, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी टीव्ही9 मराठीला दिली.
-
ओशिवरा परिसरातील फर्निचर मार्केटला भीषण आग
मुंबई उपनगरातून मोठी बातमी समोर आली आहे. ओशिवरा परिसरातील फर्निचर मार्केटला भीषण आग लागल्याची माहिती समोर आलीय. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीची माहिती मिळताच आसपासच्या परिसरात एकच भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
-
यमनमधील 2 नागरिक अक्कलकुवातील मदरश्यात गेल्या 9 वर्षांपासून वास्तव्यास
नंदुरबारमधून मोठी बातमी समोर आली आहे. अक्कलकुवा येथील मदरश्यात गेल्या 9 वर्षांपासून यमनचे 2 नागरिक बेकायदा राहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जामीया इस्लामिया इशातुल उलुम मदरश्यात हे यमन नागरिक सापडले. हे नागरिक व्हिसा नसताना मदरश्यात बेकायदा राहत होते. हे दोघेही नवरा बायको असल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
पुण्यात राहुल सोलापूरकरच्या घरासमोर वंचितचं आंदोलन
पुण्यात राहुल सोलापूरकरच्या घरासमोर वंचितकडून आंदोलन करण्यात येत आहे. राहुल सोलापूर याने शिवाजी महाराजांनंतर बाबासाहेब आंबडेकरांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्या निषेधार्थ पुण्यात आंबेडकरी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राहुल सोलापूरकरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. तसेच सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
-
Maharashtra News: बारावीच्या पहिल्या इंग्रजी भाषेच्या पेपरला सुरुवात…..
नंदुरबार | बारावीच्या पहिल्या इंग्रजी भाषेच्या पेपरला सुरुवात… परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त… ड्रोनच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर ठेवली जाते नजर…. जिल्ह्यातील 28 परीक्षा केंद्रांपैकी 6 सहा संवेदशील परीक्षा केंद्रांवर प्रशासन दक्ष… ड्रोन सीसीटीव्ही कॅमेरे यासोबतच व्हिडिओ रेकॉर्डिंग च्या माध्यमातून कॉपी रोखण्याचे प्रयत्न…..
-
Maharashtra News: मी सूर्यवंशी कुटुंबाचं भेटून सांत्वन केलं – सुरेश धस
इतर कुणी सूर्यवंशी कुटुंबाचं सांत्वन केलं की नाही माहिती नाही… मी सूर्यवंशी कुटुंबाचं भेटून सांत्वन केलं… प्रत्येक मोर्चात मी सूर्यवंशी कुटुंबाची बाजू मांडली… आव्हाडांना फक्त रॉकेल टाकण्याचंच संमजतं… असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: भुजबळांच्या वक्तव्याला भाजपच्या तुषार भोसलें कडून समाचार
हिमालयातील साधू संतांचा आपल्याला काय उपयोग असे भुजबळ यांनी केले होते काल विधान… भुजबळांचा या वक्तव्याचा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्याकडून समाचार… काही साधू संत हे समाजासाठी काम करत असतात… तुमच्या पक्षाने तुम्हालाच हिमालयात पाठवले आहे… यापूर्वीही भुजबळांनी सरस्वती पूजेवरून केले होते वादग्रस्त विधान… याच सगळ्या विधानांमुळे छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला लोकसभेवेळी झाला होता विरोध
-
Maharashtra News: अजितदादांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधला एकही आमदार नाही
अजितदादांच्या बैठकीला शिंदेंचा रायगडमधला एकही आमदार नाही.. अजितदादांच्या बैठकीला आदिती तटकरे, रायगड जिल्हाधिकारी उपस्थित… रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम… अजित पवारांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा नियोजन ऑनलाईन बैठक…
-
कार विहिरीत कोसळून तिघांचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात कार विहिरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. कठडा नसलेल्या विहिरीत कार पडल्यामुळे तीन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुटीबोरीमधील एमआयडीसी परिसरात घडली.
-
डंपरने मजुरांना उडवले, एकाचा मृत्यू
धुळे जिल्ह्यात वरखेडी गावालगत कामावर जाणाऱ्या तिघांना डंपरने उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. बोरवीर नरडाणा रेल्वे मार्गाचे कामावर असलेल्या मजुरांचा हा अपघात झाला.
-
राहुल सोलापूरकरच्या घरासमोर बंदोबस्त वाढवला
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाची धास्ती घेऊन पोलिसांनी राहुल सोलापूरकर यांच्या घराजवळ बंदोबस्त वाढवला. त्यांच्या घरासमोरील रस्ता दोन्ही बाजूने बंद करण्यात आले. आजच्या आंदोलनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आणखी वाढवली.
-
कश्यपी धरणावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
कश्यपी धरणग्रस्थांचे जलसमाधी आंदोलन पोलिसांनी रोखले आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. धरणाच्या चोहोबाजूंनी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला आहे.
-
मराठी शाळांची संख्या 60 वरून 19 वर
धुळे महापालिकेच्या मराठी शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये 60 वरून 19 वर या शाळेची संख्या आली आहे. तर यात मराठीच्या अवघ्या पाच शाळा शिल्लक आहे. तर उर्दू माध्यमाच्या 14 शाळा आहेत या 2500 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शाळेच्या आवारात झाडे झुडुपे वाढले असून आता शाळा क्रमांक 14 येथे इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून डिजिटल वर्ग तयार करण्यात येणार आहे.
-
अण्णा हजारे यांनी दिल्ली कधी पाहिली असते
अण्णा हजारे हे राळेगण सिद्धीचे दैवत होते. पण अरविंद केजरीवाल आणि मनिष सोसिदिया यांच्यामुळे त्यांनी दिल्ली पाहिली असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.
-
11 कर्तबगार महिलांना पुरस्कार
सोलापुरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा ‘रमाईची लेक’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. डॉल्बीमुक्त जयंतीच्या संकल्पनेतून रमाई आंबेडकर यांच्या वैचारिक जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.रमाई सेवाभावी शिक्षण प्रसारक मंडळाकडून सन्मान करण्यात आला. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 11 कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
-
मुलीचा थोडक्यात जीव वाचला
वसईत मोठे लिंबाचे झाड कोसळले असून, एका मुलीचा थोडक्यात जीव वाचला आहे. लिंबाचे झाड कोसळतानाचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला अशीच काहीशी परिस्थिती अंगावर झाड पडलेल्या मुलीची सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. वसईच्या ताम तलाव परिसरात ही घटना घडली आहे.
-
सोलापूरकरच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ
अभिनेता राहुल सोलापूरकरच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. सलग आठव्या दिवशीही सोलापूरकरच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज राहुल सोलापूरकर च्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
-
मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात
गडचिरोली येथे दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुख्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीच्या घरातून सहा दुचाकी ही पोलीसांनी ताब्यात घेतले. जिल्ह्यात दीड महिन्यापासून अनेक तालुक्यात दुचाकी वाहन चोरीचे प्रकार वाढले होते.
-
सोयाबीन खरेदीचा सावळा-गोंधळ काही संपेना
सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही. राज्य पणन विभागाने असे स्पष्टीकरण दिले आहे. नियमानुसार 90 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर आणखी 24 दिवसांची मुदतवाढ दिली होती.
-
ठाणे महापालिकेने दिली 11 हजार 582 श्वानांना रेबीज लस दिली
ठाणे महापालिकेने दिली 11 हजार 582 श्वानांना रेबीज लस दिली आहे. गेल्या वर्षी 7 हजार श्वानांना लस दिले. ठाण्यात सुमारे 60 हजारांपेक्षा अधिक श्वान आहेत. 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या काळात दहा हजार भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे. ठाणे महापालिकेची 250 स्वयंसेवकांची टीम तैनात असणार आहे.
-
ठाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी 338 तर बारावीच्या परीक्षेसाठी 197 परीक्षा केंद्राची व्यवस्थापना
ठाणे जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी 338 तर बारावीच्या परीक्षेसाठी 197 परीक्षा केंद्राची व्यवस्थापना करण्यात आली आहे. दहावीचे एक लाख 3 हजार 718 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर बारावी परीक्षा करिता एक लाख 21 हजार 244 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण विभागाअंतर्गत भरारी पथक तसेच आवश्यकतेप्रमाणे बैठे पथक नियुक्ती करण्यात आले आहेत
-
पुणे- आयुष्मान कार्डसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम
पुणे- आयुष्मान कार्डसाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील आयुष्मान भारत- प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेतील पात्र लाभार्थ्यांपैकी ५२ लाख लाभार्थ्यांचे ई-कार्ड तयार झालेले नाहीत. जिल्ह्यातील राहिलेल्या लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड लवकरात लवकर ई-केवायसी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
-
नाशिकचे 60 प्रमुख अधिकारी प्रयागराज पाहणी दौऱ्यावर जाणार
नाशिकचे 60 प्रमुख अधिकारी प्रयागराज पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत. 17 तारखेपासून प्रयागराज पाहणी दौऱ्यासाठी अधिकारी निघणार आहेत. क्राऊड मॅनेजमेंट आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्यक्ष दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने मंत्रालयातील आणि स्थानिक पातळीवर काम करणारे 60 अधिकारी दौऱ्यावर जाणार आहेत. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधारण अडीच वर्ष शिल्लक आहे. नाशिकच्या सिंहस्थदरम्यान एकाच दिवशी दोन ते तीन कोटी भाविक येण्याची शक्यता आहे.
-
बीड- चौथ्या टप्प्यात 127 शस्त्र परवाने रद्द
बीड: आतापर्यंत 310 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. पोलिसांच्या प्रस्तावानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली. पहिल्या टप्प्यात 100, दुसऱ्या टप्प्यात 60, तिसऱ्या टप्यात 23 तर चौथ्या टप्प्यात 127 परवाने रद्द करण्यात आले. शस्त्र परवाना रद्दचा आकडा 500 वर जाण्याची शक्यता आहे.
-
बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकणात आरोपी पळून जाताना सीसीटीव्हीत कैद
बीडमधील संतोष देशमुख हत्येप्रकणात नवी माहिती समोर आली आहे. हत्येनंतर आरोपी काळ्या स्कॉर्पिओ गाडीमधून पळून जातानाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी इथून आरोपी पळून गेले. गाडीत एकूण सहा आरोपी होते. केज पोलीस आरोपींच्या गाडीचा पाठलाग करत होते, तर वाशी चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलिसांची माहिती मिळताच आरोपी गाडी सोडून पळून गेले.
-
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे रेल्वे
पुणे- दिल्लीत होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशी रेल्वे गाडी धावणार, अशी माहिती मध्ये रेल्वे पुणे विभागाकडून पत्रकाद्वारे देण्यात आली. यंदाच्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद राजधानी दिल्लीकरांकडे आहे. त्यामुळे विशेष रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी साहित्यिकांकडून करण्यात येत होती.
दरम्यान, याबाबत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष रेल्वे सोडण्यात यावी, अशी विनंती रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. त्यानुसार १९ फेब्रुवारीला पुणे ते दिल्ली-सफदरजंग ही रेल्वे दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. तर रविवारी (२३ फेब्रुवारी) दिल्ली सफदरजंग स्थानकावरून रात्री १०.३० वाजता पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
-
पुण्यात जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू
पुण्यात जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ३७ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण हा बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगरमधील रहिवासी होता आणि वाहनचालक म्हणून काम करीत होता. या रुग्णाला ३१ जानेवारीपासून अशक्तपणा जाणवत होता. यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सात झाली आहे.
-
राज्यात आजपासून बारावीची परीक्षा सुरू
राज्य मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. राज्य मंडळाकडून 271 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत.
Published On - Feb 11,2025 8:08 AM
