Maharashtra Breaking News LIVE : प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमध्ये असले पाहिजे, आंदोलन करून प्रश्न सुटत नाही : अजित पवार
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

गोंदिया जिल्ह्यातील तब्बल 52 हजार 214 लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत. तर 3 लाख 12 हजार 220 अर्ज मंजूर करण्यात आले आहे. ज्यामुळे लाडक्या बहिणींची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे गडचिरोली पोलिसांनी अवैध दारू तस्करीवर धाड टाकत जवळपास 67 लाखाच्या मुद्देमाल जप्त केला. कुरखेडा तालुक्यातील पुराडा पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 650 देशी दारूचे पेटीया या कारवाईत पोलिसांनी जप्त केले. नाशिक येथून देखील मोठी अपडेट समोर येत आहे. पश्चिम बंगालमधील बॉम्बस्फोटातील आरोपीला नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाच्या मदतीनं NIA ने कारवाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बनावट आधारकार्डच्या मदतीनं आरोपीनं एका कंपनीत नोकरी मिळवण्याचं देखील उघड झालं आहे… आरोपीला मदत करणारे आता पोलिसांच्या रडारवर, मदत करणाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे… यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
LIVE NEWS & UPDATES
-
दिल्लीत बेकायदेशीर शस्त्रास्त्र कारखान्याचा पर्दाफाश
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला बेकायदेशीर शस्त्रास्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करून मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपी बिलाल उर्फ बिल्लासह एकूण सहा जणांना अटक केली आहे. आरोपी बराच काळापासून देशी बनावटीचे पिस्तूल आणि इतर शस्त्रे बनवत होता आणि दिल्ली आणि एनसीआरमधील गुन्हेगारांना ती पुरवत होता.
-
मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर एका तरुणाचा बुडून मृत्यू, 14 तासांनंतर मृतदेह सापडला
मुंबईतील जुहू परिसरात एका 20 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह सुमारे 14 तासांनंतर किनाऱ्यावर आला, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. मृताचे नाव विघ्नेश मुर्गेश देवेंद्रन असे आहे.
-
-
भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत
काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे भाजपात प्रवेश केल्यानंतर आज ते पहिल्यांदाच जालना शहरात दाखल झाले.यावेळी कैलास गोरंट्याल यांचं भाजप पदाधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून ठीक ठिकाणी स्वागत करण्यात आल.जालना शहरातील मोतीबाग परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी स्वागत केलं.दरम्यान जालन्यात दाखल झाल्यानंतर कैलास गोरंट्याल यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
-
बिहारमध्ये जुन्या पुलाचा काही भाग कोसळला
बिहारच्या जमुई जिल्ह्यात उलाई नदीवरील जुन्या आणि बंद पुलाचा एक भाग कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.
-
कोलकाता येथील औषध कारखान्यात आग
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका औषध कारखान्यात आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. ही आग कशी लागली हे अद्याप कळलेले नाही.
-
-
यशस्वीने इंग्लंडमध्ये दुसरे शतक झळकावले, ओव्हलवर कुटुंबासमोर इतिहास रचला
टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने लीड्सनंतर ओव्हल कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने शानदार शतक झळकावले. हे त्याच्या कारकिर्दीतील सहावे शतक आहे.
-
प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमध्ये असले पाहिजे, आंदोलन करून प्रश्न सुटत नाही : अजित पवार
प्रश्न सोडवण्यासाठी सरकारमध्ये असले पाहिजे. नुसते आंदोलन करून प्रश्न सुटत नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. केंद्र सरकार अलीकडच्या काळात 150 लाख कोटी बिनव्याजी कर्ज देत आहे. मागच्या वर्षी देखील हा निधी राज्याला आणला आहे. माझी सुरवात अरेला कारे आहे. कारण नसताना आम्ही अंगावर जात नाही मात्र अंगावर आल्यावर शिंगावर घेतल्या शिवाय राहत नाही, असंही दादांनी यावेळेस म्हंटलं.
-
जळगावात केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे विरुद्ध खासदार स्मिता वाघ यांच्यात बुद्धीबळाचा सामना
जळगावात केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे विरुद्ध खासदार स्मिता वाघ यांच्यात बुद्धीबळाचा सामना रंगला. खासदार स्मिता वाघ या पहिल्याच चालीत केंद्रीय क्रीडा मंत्र्यांवर वरचढ ठरल्या. स्मिता वाघ यांनी पहिली चाल खेळत प्यादे दोन घर पुढे सरकवले. रक्षा खडसेंनी देखील आपले प्यादे दोन घर पुढे सरकवले. यावेळी स्मिता वाघ यांनी सरकवलेले प्यादे रक्षा खडसे यांच्या प्याद्याला मारणार होते. उद्योजक अशोक जैन यांच्या हे लक्षात आले. जैन यांनी खडसेंना सल्ला देत दुसरी चाल खेळण्याचा सल्ला दिला. जळगावमध्ये आयोजित राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेनिमित्ताने खासदार आणि मंत्री आमनेसामने आले.
-
दौंड यवत हिंसाचार प्रकरण, 15 आरोपींना पोलीस कोठडी
दौंडमधील यवत हिंसाचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील 15 आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आरोपींना 6 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रहावं लागणार आहे. दौंड न्यायालयात ही सुनावणी पार पडली.
-
अमरावती महिला पोलीस अंमलदार आशा धुळे-तायडे प्रकरणात मोठी अपडेट
अमरावतीतील महिला पोलीस अंबलदार आशा धुळे-तायडे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य राखीव पोलीस दलात कार्यालयात असलेला आरोपी पती राहुल तायडे यानेच पत्नी आशा धुळे हत्तेचा कट रचला होता. दोन मित्राच्या मदतीने पत्नीचा गळा दाबून हत्या केली. आरोपी पतीने एक महिन्यापूर्वी हत्येचा कट रचला होता. अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. आरोपी राहुल तायडे याचे एका महिलेशी प्रेम प्रकरणं होत.त्यातून सतत वाद होत असल्याची माहिती आहे.
-
लातूर: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुंडण आणि दंडवत आंदोलन
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करीत पायी चालत मुंबईकडे निघालेल्या सहदेव होणाळे या शेतकऱ्याने आज लातूर जिल्ह्यातल्या धानोरा इथं मुंडण आणि दंडवत आंदोलन केले आहे. कर्जमाफी बाबत सरकारने निर्णय न घेतल्याने त्यांनी स्वतःच्या शेतात मुंडण आंदोलन केले आहे.
-
धुळे: सुभाष चंद्र बोस चौकातील दूध डेअरीवर अज्ञात टोळक्याचा हल्ला
जुने धुळे परिसरात असलेल्या सुभाष चंद्र बोस चौक परिसरात रात्रीच्या सुमारास एका दूध डेअरीवर अज्ञात टोळक्याने हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात डेअरीच मालकास दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
-
पुणे: स्वारगेट परिसरातील लक्ष्मी नारायण चौकात सकल हिंदू समाज एकत्र
पुण्यातील अनाधिकृत दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाचा मोर्चा काढण्यात आला. आमदार योगेश टिळेकर यांच्याकडून कडून हजरत दम दम शाह अली दर्गा काढून टाकण्याच्या संदर्भात पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्वारगेट परिसरातील लक्ष्मी नारायण चौकात सकल हिंदू समाज एकत्र जमला होता.
-
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ
जळगावच्या सराफा बाजारात सोन्या, चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे, सोन्याच्या दरात तब्बल १ हजार ६०० रुपयांची तर चांदीच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे, सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्यामुळे मागणी घटली आहे.
-
धारूरमध्ये शाळेत जोरदार राडा, लिपिक आणि शिक्षकामध्ये हाणामारी
धारूरमध्ये शाळेत जोरदार राडा
लिपिक आणि शिक्षकामध्ये हाणामारी
सुरुवातीला शिक्षकाने केली लिपिकाला मारहाण
नंतर लिपिकाने नातेवाईकांना बोलावून घेत शिक्षकाला मारलं
दोन्ही मारहाणीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.
-
अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन
पुण्यातील मुकुंदनगर येथील अनधिकृत हजरत दम दम शाह अली बाबाच्या दर्ग्याच्या नावाने झालेले फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात वैष्णव किन्नर आखाड्याच्या प्रमुख हेमांगी सखी, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार योगेश टिळेकर सहभागी होणार आहेत.
-
वाल्मीक कराड असलेल्या कारागृहातील मोबाईल सापडलेला आरोपीची रवानगी
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराड असलेल्या बीडच्या जेलमध्ये आरोपींनी मोबाईल आणि गांजा आत लपवून नेल्याचे समोर आले होते. यातील मोबाईल नेणारा रफिक नामक आरोपीला लातूर कारागृहात हलवण्यात आलं असून गांजा नेणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी कारागृहातून आता बाहेर काढत चौकशी केली आहे. तो सध्या बीड पोलिसांच्या कोठडीत आहे. कधी मोबाईल, कधी गांजा तर कधी रबरी बॉल यामुळे बीड जिल्हा कारागृह नेहमीच चर्चेत येत आहे. वाल्मीक कराड असलेल्या जिल्हा कारागृहात हे प्रकार घडत असल्याने लोकांमध्ये उलट सुलट चर्चा होत आहेत.
-
पंढरपूरमध्ये अवैध रित्या खत विक्री करणाऱ्या फर्टीलायझर कंपनीवर छापा
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे विठ्ठल खत कारखान्यात महालक्ष्मी फर्टीलायझर, एलएलपी कंपनीचे बनावट खत तयार करून ते शेतकऱ्यांना विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील सुदीप सुरेश साळुंखे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील हंडी निमगाव येथील योगेश बाळकृष्ण जाधव यांच्यासह पंढरपूर जवळच्या विठ्ठल खत कारखाना यांच्या विरोधात पंढरपूर पोलीस तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
-
नाहीतर हल्लीचे नट सहजतेची एवढी अॅक्टिंग करतात की…; तरुण कलाकारांना नानांचा सल्ला
“एक पाखरू आमच्यावर रुसलंय जणू…” हा अरूण सरनाईकांचा फेमस डायलॉग म्हणून नानांनी सरनाईकांच्या आठवणींना उजाऴा दिला. “सरनाईक अगदी सहजगतीने अभिनय करायचे नाहीतर हल्लीचे नट सहजतेची एवढी अॅक्टिंग करतात की ते त्या भूमिकेत शिरतच नाहीत” असं म्हणत आताच्या तरुण कलाकारांना नानांनी हा सल्ला दिला आहे.
-
मंत्री दत्तात्रय भरणे यांची कृषिमंत्रीपदी निवड झाल्यानंतर धनगर समाजाकडून जल्लोष
मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत जल्लोष करण्यात आला. “एका शेतकऱ्याचं पोरगं कृषीमंत्रीपदी गेलं याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. दत्तात्रय भरणे हे तळागाळातील नेतृत्व आहे. कोरोना किंवा कोणत्याही अडचणीच्या काळात त्यांनी रस्त्यावर उतरून काम केलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांना माहिती आहेत.” असं सकल धनगर समाजाचे पदाधिकारी शेखर बंगाळे यांनी म्हटलं आहे.
-
विकास झाला पाहिजे नुसती भाषणे होऊन चालत नाही: अजित पवार
“कष्टकरी गरीब जनतेला कोणत्या कोणत्या योजनेच्या माध्यमातून सहकार्य करता येईल साठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विकास झाला पाहिजे नुसती भाषणे होऊन चालत नाही. मुंबई गोवा महामार्गावर पुस्तक लिहावे लागेल.” असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
-
पुण्यातील विकासामध्ये दादागिरी घुसलीये; देवेंद्र फडणवीस थेटच बोलले
पुण्यातील विकासामध्ये दादागिरी घुसलीये. असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच फडणवीसांच्या या वक्तव्याला सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. “पुण्यातील दादागिरी काढण्यासाठी फडणवीसांना पाठिंबा आहे” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
-
काँग्रेसचा हिंदूला बदनाम करण्याचा एकमेव अजेंडा-प्रकाश महाजन
भगवा आतंकवाद हा शब्द कोणी आणला, परवा सुशील कुमार शिंदे यांचे मी एक वक्तव्य ऐकलं, पक्षश्रेष्ठींनी मला सांगितलं भगवा आतंकवाद म्हणा म्हणून मी भगवा आतंकवाद शब्दप्रयोग केला, असे ते म्हणाले. काँग्रेसचा हिंदूला बदनाम करण्याचा एकमेव अजेंडा आहे, असे प्रकाश महाजन म्हणाले.
-
वाय एस रेड्डी यांच्याविरोधात गुन्हा दाखल
वसई विरार महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी अखेर आचोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 41 अनाधिकृत इमारत तोडक कारवाही नंतर वाय एस रेड्डी हे वादात सापडले होते
-
एकलव्य संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा
जळगावच्या चोपडा येथे एकलव्य संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. चौकशीसाठी बोलवलेल्या तरुणांचा लैंगिक छळ करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. लैंगिक छळ करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.
-
आता थेट कारवाईचे आदेश
नांदेडच्या कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या अंगावर उंदरांचा खुलेआम वावर असल्याप्रकरणात आता राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट कारवाईचे आदेश दिले आहेत.
-
काहीतरी गडबड नक्की आहे – उद्धव ठाकरे
विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत काहीतरी गडबड नक्की आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आज शेतकरी क्रांती संघटना ठाकरेंच्या सेनेत विलीन झाली. बुलडाणा, अमरावती, अकोला या परिसरात त्यामुळे ठाकरे सेनेचे बळ वाढले आहे.
-
पुणे-बीडमध्ये वर्दीची भीती उरली नाही
पुण्यात आणि बीडमध्ये कायद्याचा धाक उरला नाही. वर्दीची भीती उरली नाही, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. आज जी पुण्यात स्थिती आहे, तशीच बीडमध्ये असल्याचा घणाघात त्यांनी घातला.
-
देश कुणाच्या मनमानीने चालणार नाही – सुप्रिया सुळे
“पुणे आणि बीडमध्ये वर्दीची भिती राहिलेली नाही. गुन्हेगारांना पोलिसांची भिती वाटत नाही. आज जी पुण्यात परिस्थिती तीच बीडमध्ये. देश कुणाच्या मनमानीने चालणार नाही” अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.
-
वाय एस रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल
वसई विरार महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी अखेर आचोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 41 अनाधिकृत इमारत तोडक कारवाई नंतर वाय एस रेड्डी हे वादात सापडले होते. भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम (संशोधन 2018) अधिनियम 1988 चे कलम 13 (1) ब, सह 13 (2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
-
पालघरच्या माहीम येथील एसबीआयच्या एटीएमवर चोरट्यांचा डल्ला
एसबीआयच्या एटीएमवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. पालघरच्या माहीम येथील एटीएमवर चोरट्यांनी डल्ला मारला असून लाखो रुपये घेऊन चोरटे पसार झाल्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एटीएम तोडून एटीएम मधील रोकड काढून एटीएमला आग लावली. चोरीचे पुरावे नष्ट करण्यासाठी एटीएमला आग लावल्याची प्राथमिक माहिती.
-
चौकशीसाठी बोलवलेल्या तरुणांचा लैंगिक छळ, भव्य जन आक्रोश मोर्चा
जळगावच्या चोपडा येथे एकलव्य संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर काढण्यात आला भव्य जन आक्रोश मोर्चा. चौकशीसाठी बोलवलेल्या तरुणांचा लैंगिक छळ करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. लैंगिक छळ करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.
-
राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर
आज पनवेलमधील मेळाव्यात राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर येणार आहेत.
-
पुण्यातील वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच
पुण्यातील वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच असल्याचे बघायला मिळतंय. काही भागांमध्ये वाहनांचे मोठे नुकसान करण्यात आलंय.
-
रोहिणी खडसे यांचे रूपाली चाकणकरांना उत्तर
रोहिणी खडसे यांच्या पतीला अटक झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी टीका केली होती. त्यावर योग्य वेळी मी प्रत्येकाला उत्तर देईल, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.
-
बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची आमदार रोहित पवारांवर खोचक टीका
रोहित पवारांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये आधी माहिती घ्यावी म्हणत त्यांनी जोरदार टीका केलीये.
-
बीड जिल्ह्यात पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नऊ लाखांनी घटली
गत वेळी 18 लाख शेतकऱ्यांनी भरला होता पिक विमा… आतापर्यंत नऊ लाख शेतकऱ्यांनीच केली पिक विमासाठी अर्ज… पिक विमा भरण्यासाठी मुदत वाढ 14 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना पिक विमा भरता येणार…
-
गोदावरी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर आज पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे घेणार बैठक
गेल्या काही दिवसांपासून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदूषण संदर्भात केल्या जात आहेत उपाय योजना… एसटीपी प्लांटसह गोदावरी नदी प्रदूषणाबाबत केल्या जाणाऱ्या इतर उपाययोजना संदर्भात घेणात माहिती… महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेणार माहिती… आगामी कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करण्याचा सरकार पुढे आहे आवाहन…
-
चिखलदरा पर्यटन क्षेत्रामधील पंचबोल पॉईंटवर पर्यटकांमध्ये राडा जिप्सी चालकाकडून पर्यटकांना मारहाण..
पंच बोल पॉईंटवर पर्यटकांमध्ये गाणे गाण्यावरून बाचाबाची झाली, या वादात जिप्सी चालक ही पडले व त्यांनी पर्यटकांना चांगलीच मारहाण केली.. मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे… दरम्यान चिखलदरा पोलीस ठाण्याचे एपीआय प्रवीण पाटील आपल्या ताफ्यासह पंचबोल पॉईंटवर पोहोचले व त्यांनी या पर्यटकांची सुटका केली….
-
अनधिकृत इमारतींची नळ जोडणी खंडित करण्याची मोहीम
ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांच्या १३४ नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत ७९ बोअरवेल बंद करण्यात आल्या. तर, १८ मोटर पंप जप्त करण्यात आले. या सर्व नळ जोडण्या अनधिकृतपणे घेण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याची कारवाई ही करण्यात येत आहे…
Published On - Aug 02,2025 8:59 AM
