AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Political News Headlines 8 August 2024 : पूजा खेडकर हिच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी

| Edited By: | Updated on: Aug 08, 2024 | 10:01 PM
Share

TV9 Marathi, Maharashtra Political News Headlines 8 August 2024 : आज 8 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News Headlines 8 August 2024 : पूजा खेडकर हिच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. तसेच राजकीय पक्षही जोमाने कामाला लागले आहेत. आज अजित पवार नाशिकच्या काळा रामाचे दर्शन घेऊन विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेचा शुभारंभ केला जाणार आहे. तसचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज नांदेड दौऱ्यावर आहे. त्यांच्याकडून जागांची चाचपणी केली जात आहे. तर दुसरीकडे लाडकी बहिण योजनेसाठी सध्या महिलांची धावपळ सुरु आहे. तसेच महाराष्ट्रात सध्या सर्वत्र पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Aug 2024 08:54 PM (IST)

    पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली हायकोर्टात उद्या सुनावणी

    नवी दिल्ली : पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली हायकोर्टात उद्या सुनावणी होणार आहे. पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकर यांचा जामीन फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकरनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे.

  • 08 Aug 2024 08:36 PM (IST)

    सेवानिवृत्त मुख्य अग्निशामक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

    नाशिक : मनपा सेवानिवृत्त मुख्य अग्निशामक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. कायदेशीर उत्पन्नापेक्षा 42 टक्के जास्त अपसंपदा केल्याचे प्रतमदर्शनी निष्पन्न झालं आहे. अनिल महाजन यांच्या घरावर लाचलुचपत विभागाची धाड टाकण्यात आली आहे. अपसंपदा जमा करण्यात पत्नीने प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवत नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 कोटी 31 लाख 42 हजार 869 इतकी अपसंपदा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

  • 08 Aug 2024 08:07 PM (IST)

    कल्याण पूर्वेत मनसेच्या शाखेवर पालिकेची कारवाई

    कल्याण पूर्वेत मनसेच्या शाखेवर पालिकेने कारवाई केली. शाखा आणि बाहेर असलेला जेष्ठ नागरिक कट्टा अनधिकृत असल्याचे सांगत पालिकेने तोडक कारवाईसाठी जेसीबी आणलं होतं. कल्याण डोंबिवलीत अनेक पक्षाचे अनधिकृत शाखा आहेत. मग आमच्या शाखेवर कारवाई का? आधी कायदेशीर नोटीस द्या. नंतर कारवाई करण्याची सांगत मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका पाहता पालिका अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. पथक कारवाई न करताच रिकाम्या हाती परतले. कोळसेवाडी शिवराम पाटील वाडी परिसरातील चिखलीपाडा वार्ड क्रमांक 90 येथील मनसे शाखेवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी आले तेव्हा संबंधित घटना घडली.

  • 08 Aug 2024 05:52 PM (IST)

    केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑगस्टपर्यंत वाढ

    मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. त्याला तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले.

  • 08 Aug 2024 05:37 PM (IST)

    संपूर्ण बांगलादेश एक कुटुंब आहे, सर्वांचे संरक्षण हा सरकारचा धर्म: मोहम्मद युनूस

    बांगलादेशातील सत्तापालटानंतर अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेण्यासाठी पॅरिसहून बांगलादेशात परतलेले अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस म्हणाले की, सरकार लोकांच्या सुरक्षेची खात्री करेल. संपूर्ण बांगलादेश हे एक कुटुंब आहे. प्रत्येकाचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

  • 08 Aug 2024 05:25 PM (IST)

    बहुमत असते तर आम्ही विनेशला राज्यसभा सदस्य केले असते: माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा

    विनेश फोगट यांना सुवर्णपदक विजेत्याला मिळणाऱ्या सुविधा मिळाव्यात. आपण तिला प्रेरणा दिली पाहिजे. राज्यात आमचे बहुमत नाही, बहुमत असते तर मी त्यांना राज्यसभा सदस्य केले असते.

  • 08 Aug 2024 05:09 PM (IST)

    पुण्यात झिका विषाणूचे आणखी 7 रुग्ण

    पुण्यामध्ये झिका विषाणूचे आणखी 7 रुग्ण आढळले आहेत. एकूण प्रकरणांची संख्या 73 वर पोहोचली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

  • 08 Aug 2024 04:47 PM (IST)

    चित्रा वाघ त्यांच्याच पक्षाकडून आउटडेटेड: सुषमा अंधारे

    शिवसनेा ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी भाजपच्या चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ यांना त्यांच्याच पक्षाकडून आउटडेटेड ठरवलं आहे. त्या आउटडेटेड झाल्यात त्यामुळे त्यांच्यावर फार काही बोलाव वाटत नाही. आज न्यायालयाने त्यांना झापल आहे. त्या प्रत्येक प्रकरणात तोंडघशी पडल्या आणि त्यांनी कसं कट कारस्थान रचल हे आता उघड झालं आहे.

  • 08 Aug 2024 04:20 PM (IST)

    नवनिर्माण यात्रा पदाधिकारी बैठकीला सुरुवात

    हिंगोलीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली आहे. कळमनुरी आणि हिंगोली विधासभेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरवात झाली आहे. या बैठकीत काय होतंय, याकडे साऱ्यांचंच लक्ष आहे.

  • 08 Aug 2024 03:55 PM (IST)

    उद्धव ठाकरे कपिल सिब्बल यांच्या भेटीला

    उद्धव ठाकरे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान कपिल सिब्बल यांच्या घरी उद्धव ठाकरे भेटीसाठी पोहोचलेले आहेत.

  • 08 Aug 2024 03:45 PM (IST)

    भाजप आणि ठाकरे गट आमनेसामने

    परभणीत विकास कामे रखडली यावरून भाजप आणि शिवसेना ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. भाजप नेते आनंद भरोसा यांनी वर्तमानपत्रात परभणी शहरातील विविध विकास कामे रखडल्याची जाहिरात दिली होती. आज पत्रकार परिषद घेत ठाकरे गटा कडून भाजपनेच विकास कामांचा निधी रोखण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. भाजपकडून ठाकरे गटावर विकासकामे करण्यात कमी पडल्याचे प्रतिआरोप करण्यात आलाय. विधानसभा निवडणुकीच्या आधीच परभणीत भाजप ठाकरे गट आमनेसामने आलेत.

  • 08 Aug 2024 03:30 PM (IST)

    बच्चू कडू यांचं मुख्यमंत्री- मुख्य सचिवांना पत्र

    आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. दिव्यांग प्रवर्गातून शासकीय आणि निमशासकीय नोकरी मिळवलेल्या फेर वैद्यकीय तपासणी करा. खोट्या दिव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवारावर आणि खोटं दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करा, अशी मागणी बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे पत्राद्वारे केली आहे. पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रानंतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा मुद्दा समोर आला आहे.

  • 08 Aug 2024 03:15 PM (IST)

    गोंदियात फ्लायओव्हर काही भाग कोसळला

    गोंदियात राष्ट्रीय महामार्गावर फ्लायओव्हर बांधकामाचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नवीन बांधकाम असून सुद्धा फ्लाय ओव्हर कशाप्रकारे कोसळल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

  • 08 Aug 2024 02:58 PM (IST)

    शंभुराज देसाई यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याच्या हितासाठी दिल्लीला जातात, पण उद्धव ठाकरेंना चाचपणी होतेय का हे पाहण्यासाठी दिल्लीत जावं लागत आहे, हे दुर्भाग्य आहे, अशी टीका शंभुराज देसाई यांनी केली. नावाचा वारसा सिद्ध करावा लागतो, दिघेंचे विचार एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत, विचारांचा वारसा त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

  • 08 Aug 2024 02:52 PM (IST)

    आडम मास्तरांचा जय श्रीरामचा नारा

    माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांनी जय श्रीरामचा नारा दिला. तेलुगू भाषिक तरुणांच्या मेळाव्यादरम्यान आडम मास्तरांची घोषणाबाजी केली. मास्तरांना आमदार करण्याचा तेलुगू भाषिक तरुणानी एकमुखी निर्धार केला.

  • 08 Aug 2024 02:41 PM (IST)

    उद्धव ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संध्याकाळी साडेपाच वाजता सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. ठाकरे कुटुंबीय आणि खासदार संजय राऊत यांच्यासह गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे.

  • 08 Aug 2024 02:30 PM (IST)

    मला अडकवण्याचा प्रयत्न – जितेंद्र आव्हाड

    मला कुठे तरी अडकवण्याचा प्रयत्न करणार याबद्दल मनात कोणती शंकाच नाही. येन केन प्रकारे मला हुक लावण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. डरेंगे नही लडेंगे, मला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाची खास भेट दिल्याचा टोला त्यांनी लगावला.

  • 08 Aug 2024 02:20 PM (IST)

    पूरग्रस्तांना तातडीची मदत करण्यासाठी मोर्चा

    पुण्यातील पाटील एस्टेट आणि शिवाजीनगर भागातील पूरग्रस्तांना मदत करा, या मागणीसाठी आरपीआयने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापलिकेवर मोर्चा काढला. त्यात स्थानिक रहिवाशी सहभागी झाले आहेत. पूरग्रस्तांना तातडीची मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

  • 08 Aug 2024 02:10 PM (IST)

    मुख्यमंत्री शनिवारी साक्रीत

    शनिवारी साक्री येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा देखील येथे कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम स्थळाची दादा भुसे हे पाहणी करणार आहेत.

  • 08 Aug 2024 02:00 PM (IST)

    राज ठाकरे हिंगोलीकडे रवाना

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंगोली कडे रवाना होणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभेचा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे हिंगोलीकडे मार्गस्थ होत आहेत.

  • 08 Aug 2024 01:55 PM (IST)

    अजित पवार थेट म्हणाले, कांद्यानं आमचा वांदा केला

    कांद्यानं आमचा वांदा केला असे अजित पवार यांनी नुकताच म्हटले आहे.

  • 08 Aug 2024 01:44 PM (IST)

    पूरग्रस्तांना तातडीची मदत करण्याची मागणी

    पुण्यातील पाटील एस्टेट आणि शिवाजीनगर भागातील पूरग्रस्तांना मदत करा. या मागणीसाठी आरपीआयच पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापलिकेवर मोर्चा. मोर्च्यात स्थानिक रहिवाशी सहभागी झालेत

  • 08 Aug 2024 01:09 PM (IST)

    स्वप्निल कुसळे याचा पुण्यात रोड शो

    पॅरिस ऑलिम्पि​क्समध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धे​तील कांस्य पदक ​विजेते स्वप्निल कुसळे याचा पुण्यात रोड शो होत आहे. पुण्यातील ऑर्चिड हॉटेल ते बालेवाडी स्टेडियमपर्यंत निघणार मिरवणूक

  • 08 Aug 2024 12:51 PM (IST)

    अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

    अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसने मोर्चा काढला आहे. शेतकरी, सर्वसामान्य, शेतमजूर विद्यार्थी, कर्जमाफी, घरकुल हप्ते यांसह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे. अमरावतीच्या इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत काँगेसने मोर्चा काढला असून त्यात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर उपस्थित आहेत.

  • 08 Aug 2024 12:40 PM (IST)

    जयपूर एक्स्प्रेस गोळीबारप्रकरणी आरोपी चेतन सिंहवर आरोप निश्चित

    जयपूर एक्स्प्रेस गोळीबारप्रकरणी आरोपी चेतन सिंहवर आरोप निश्चिती करण्यात आली. दिंडोशी सत्र न्यायालयात आरोपी आरपीएफ जवान चेतन सिंह दोषी ठरला असून दोन धर्मात तेढ, भडकावू भाषण केल्याप्रकरणी कलम निश्चिती करण्यात आली आहे. चेतन सिंहवर हत्येचा खटलाही चालणार आहे.

  • 08 Aug 2024 12:30 PM (IST)

    विधानसभा निवडणुकीबाबत भाजप हायकमांडकडून हालचाली

    नवी दिल्ली- विधानसभा निवडणुकीबाबत भाजप हायकमांडकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुका घोषित होण्यापूर्वीच महाराष्ट्राची पहिली यादी जाहीर होणार आहे. 30 ते 35 उमेदवारांची पहिली यादी असेल. महाराष्ट्रासह हरियाणा राज्यातील उमेदवारांचीही यादी जाहीर केली जाणार आहे.

  • 08 Aug 2024 12:20 PM (IST)

    कुस्तीपटू विनेश फोगाटच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गोंधळ

    कुस्तीपटू विनेश फोगाटच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गोंधळ घालण्यात आला. विरोधी पक्षाने घोषणाबाजी करत सभात्याग केला. विरोधी पक्षाकडून नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप जे. पी. नड्डा यांनी केला.

  • 08 Aug 2024 12:10 PM (IST)

    कांदाप्रश्नी महाविकास आघाडीच्या खासदारांचं आंदोलन

    नवी दिल्ली- कांदाप्रश्नी महाविकास आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलंय. गळ्यात कांद्याच्या माळा घालून खासदारांनी संसदेच्या मकरद्वारावर घोषणा दिल्या आहेत. ‘शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा त्यांनी दिल्या आहेत. कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी आणि नाफेड करून कांदा खरेदी करण्यात यावा ही खासदारांची मागणी आहे.

    कांद्याला 35 रुपये किलो भाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या मालाला मिनिमम सपोर्ट प्राईस MSP मिळावी ही देखील त्यांची मागणी आहे. खासदार सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते, निलेश लंके, राजाभाऊ वाझे यांच्यासह इतर खासदार आंदोलनाला उपस्थित आहेत.

  • 08 Aug 2024 11:54 AM (IST)

    पुणे – सिंहगड रोड वरील उभारण्यात आलेला पूल बांधून पूर्ण तरी खुला न केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने

    सिंहगड रोड वरील उभारण्यात आलेला पूल बांधून पूर्ण तरी सुद्धा तो खुला न केल्यामुळे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.  महानगरपालिका प्रशासनाने तातडीने हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू करावा, अशी मागणी शरद पवार गटातर्फे करण्यात येत आहे.

    महापालिकेने राजाराम पूल ते फनटाईम चित्रपटगृह असा पूल बांधण्याचे काम २०२१ मध्ये सुरू केले होते. हा पूल पूर्ण बांधून तयार आहे मात्र तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. सिंहगड रोड वर मोठी वाहतूक कोंडी होते.

  • 08 Aug 2024 11:39 AM (IST)

    नवी दिल्ली – उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी दाखल

    उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून आज ते अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. उपराष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर ते  थेट केजरीवाल यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.  इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांची ते भेट घेत असून  काल उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली होती.

  • 08 Aug 2024 11:33 AM (IST)

    धुळे – नकाने तलाव परिसरात असलेल्या प्रियदर्शनी जिमखान्यातून चंदनाची चोरी…

    धुळ्यातील नकाने तलाव परिसरात असलेल्या प्रियदर्शनी जिमखान्यातून चंदनाची चोरी. प्रियदर्शनी जिमखान्यात असलेल्या चंदनाचं झाड कापून चंदन चोरांनी मधला बुंदा चोरून नेला. इलेक्ट्रिक कटरच्या साह्याने अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री केली चंदनाची चोरी. पूर्वी देखील दोन झाडांची चोरी करण्यात आली होती.

  • 08 Aug 2024 11:31 AM (IST)

    रत्नागिरी- पगार वाढ, जुनी पेन्शन योजना अशा विविध मागण्यांसाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

    रत्नागिरी- नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. पगार वाढ, जुनी पेन्शन योजना अशा विविध मागण्यांसाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून राज्यातील 228 नगरपरिषदा संपात सहभागी आहेत. मात्र या संपामुळे सर्वसामान्य माणसांचे मोठे हाल होत आहेत. घंटागाडी पाणीपुरवठा मधील कंत्राटी कर्मचारी वगळता इतर सर्वजण संपात सहभागी.

  • 08 Aug 2024 11:11 AM (IST)

    पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे मायदेशात दाखल

    पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे मायदेशात दाखल झाला आहे. स्वप्नील पुणे विमानतळावर दाखल झाला असून ढोल-ताशांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले.

  • 08 Aug 2024 11:00 AM (IST)

    Maharashtra News : आम्हाला पुन्हा संधी द्या लोकांना विनंती करणार – अजित पवार

    “आम्हाला पुन्हा संधी द्या, लोकांना विनंती करणार. मागच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांनी एक नरेटीव्ही सेट केलेलं. संविधान बदलणार आरक्षण काढणार, असं नेरटीव्ह सेट करुन लोकांची दिशाभूल केली. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्याची मोठी किंमत महायुतीला चुकवावी लागली” असं अजित पवार म्हणाले.

  • 08 Aug 2024 10:24 AM (IST)

    Maharashtra News : RBI च पतधोरण जाहीर

    RBI च पतधोरण जाहीर. रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. सध्या रेपो रेट 6.50 टक्के कायम असेल. नाही कमी होणार कर्जाचा हप्ता, रेपो रेटविषयी झाला फैसला.

  • 08 Aug 2024 10:23 AM (IST)

    Maharashtra News : पुण्यात झिकाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली

    शहरातील पुरानंतर झिकाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. एकाच दिवशी आढळले सात नवीन रुग्ण. सात पैकी सहा गर्भवती महिला. शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या 73 वर. आतापर्यंत झिकाच्या चार रुग्णांचा मृत्यू.

  • 08 Aug 2024 10:22 AM (IST)

    Maharashtra News : विद्यार्थिनींच्या वस्तीगृह परिसरात बिबट्याचा वावर

    जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थिनींच्या वस्तीगृह परिसरात बिबट्याचा वावर. मुक्त संचार करणारा बिबट्या विद्यापीठ परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बिबट्या मुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत.

  • 08 Aug 2024 09:57 AM (IST)

    Marathi News: जनसन्मान यात्रेसाठी गुलाबी बस

    जनसन्मान यात्रेची सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार आजपासून करत आहेत. नाशिकमधून या जनसमान यात्रेला सुरुवात होत आहे. या यात्रेसाठी खास गुलाबी रंगाच्या आकर्षक बस आणि गाड्या तयार करण्यात आल्या आहेत.

  • 08 Aug 2024 09:49 AM (IST)

    Marathi News: संभाजीनगरमध्ये सभा होणारच- बच्चू कडू

    संभाजीनगर येथे बच्चू कडू यांची 9 ऑगस्टला जाहीर सभा होत आहे. या सभेला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. परवानगी नाकारताच अकोला शहरामध्ये “अब मै रुकेगा नही” चे बॅनर लागले आहेत. त्यामुळे परवानगी जरी नाकारली तरी सभा होणारच असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

  • 08 Aug 2024 09:38 AM (IST)

    Marathi News: ओबीसीतून मराठा आरक्षण नाही

    ओबीसीतून मराठा आरक्षण देणार नाही, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अमृतसर येथील अधिवेशनात जरांगे पाटील यांच्या मागणी विरोधात हे महत्त्वाचे ठराव पारीत करण्यात आले आहे.

  • 08 Aug 2024 09:28 AM (IST)

    Marathi News : ठाण्यात उबाठाकडून बॅनरबाजी

    ठाण्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली. पक्ष कुणी चोरला ? दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही. काय आहे हिंदुत्व ?….अशा आशयाचे बॅनर लागले आहे.

  • 08 Aug 2024 09:12 AM (IST)

    Maharashtra News LIVE : पुण्यात विधानसभा निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरु

    पुणे : विधानसभा निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू

    पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ईव्हीएम मशीनच्या प्राथमिक तपासणीला सुरुवात

    केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व ईव्हीएम मशीन्सच्या प्राथमिक तपासणीला सुरुवात

    यामध्ये बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट अशा एकूण 49 हजार 328 मशीन्सची तपासणी करण्यात येत आहे

    पुणे जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 21 मतदारसंघ आहेत

    जिल्ह्यात सुमारे 8 हजार 417 मतदान केंद्र आहे

    निवडणुकीसाठी महत्त्वाचे असलेले “ईव्हीएम’ केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत

    केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पुणे जिल्ह्यासाठी बॅलेट युनिट 19 हजार 107, कंट्रोल युनिट 10 हजार 690 आणि व्हीव्हीपॅट 19 हजार 531 मशीन्स प्राप्त झाल्या आहेत

    या सर्व मशीनच्या प्राथमिक तपासणीला सुरुवात

  • 08 Aug 2024 09:11 AM (IST)

    Maharashtra News LIVE : गोंदिया जिल्ह्यातील 12000 महिलांचे अर्ज रद्द

    गोंदिया : ‘लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज मंजूर होण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल…..

    -जिल्ह्यातील 2 लाख 88 हजार 890 महिलांनी अर्ज केले होते…..

    -2 लाख 76 हजार 755 मंजूर ……

    -12 हजार 135 बहिणींचे अर्ज झाले रद्द.

  • 08 Aug 2024 09:10 AM (IST)

    Maharashtra News LIVE : पुण्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

    पुणे शहरातील पूरग्रस्तांना मोठा दिलासा

    शहरात जुलैमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण

    पंचनामाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्याकडून राज्य शासनाला सुपूर्द

    जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य सरकारकडे नुकसान भरपाई म्हणून 8 कोटी 23 लाख 67 हजार 500 रुपयांच्या निधीची मागणी

    अहवालात पुणे शहरासह पिंपरी चिंचवड मध्ये आलेल्या पूर्ण सदृश्य परिस्थितीची देखील नुकसान भरपाई देण्याची मागणी

  • 08 Aug 2024 09:09 AM (IST)

    Maharashtra News LIVE : नाशिक जिल्हा परिषदेत 15 कर्मचाऱ्यांवर कारवाई, 8 जण निलंबित

    नाशिक – जिल्हा परिषदेमध्ये तीन महिन्यांत १५ कर्मचाऱ्यांवर कारवाई – नाशिक जिल्हा परिषदेतील १५ बेशिस्त कर्मचाऱ्यांना कारवाईचा दणका – कर्तव्यात कसूर, खोटे प्रमाणपत्र, शेतकरी अनुदानात भ्रष्टाचार अशा कारणांनी १५ कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई – आठ जणांचे निलंबन सहा कर्मचाऱ्यांना सेवेतून थेट बडतर्फ तर एकाला सक्तीने सेवानिवृत्ती – कारवायांमुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

  • 08 Aug 2024 09:07 AM (IST)

    Maharashtra News LIVE : नाशिकमधून लाडकी बहिण योजनेसाठी ६ लाख अर्जांना मान्यता

    नाशिक – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रतिसाद – लाडकी बहिणी योजनेसाठी आतापर्यंत सात लाख ३७ हजार ४८२ अर्ज प्राप्त – प्राप्त झालेल्या अर्जांची तालुकास्तरावर समितीतर्फे छाननी सुरू – सहा लाख ९९ हजार ७६९ अर्जांना तालुका समितीने मान्यता – तर ३७ हजार ५२९ अर्जांमध्ये त्रुटी असल्याने अर्ज तात्पुरते अमान्य केल्याची माहिती – स्वीकृत केलेले अर्ज विधानसभा क्षेत्रनिहाय समितीकडे अंतिम निर्णयासाठी सादर

  • 08 Aug 2024 09:06 AM (IST)

    Maharashtra News LIVE : काळा रामाचे दर्शन घेऊन अजित पवार फुंकणार विधानसभेचे रणशिंग

    नाशिक – काळा रामाचे दर्शन घेऊन अजित पवार फुंकणार विधानसभेचे रणशिंग – जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर असताना घेणार काळारामाचे दर्शन – मोदी ,गडकरी, उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता अजित पवार विधानसभा निवडणुकीच्या अगोदर घेणार काळारामाचे दर्शन – काळाराम मंदिरात दर्शन घेऊन विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागणार – लोकसभेपूर्वी नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे ,नितीन गडकरी ,यांस अनेक नेते काळाराम मंदिरात नतमस्तक

  • 08 Aug 2024 09:02 AM (IST)

    Maharashtra News LIVE : अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर, शेतकऱ्यांशी साधणार संवाद

    नाशिक – आजपासून उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर – राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर – आजपासून नाशिक जिल्ह्यातून जनसन्मान यात्रेची सुरुवात – पक्षाचे सर्व कॅबिनेट मंत्री आमदार उपस्थित राहणार – नाशिकच्या दिंडोरी येथे आदिवासी नेत्यांसोबत घेणार बैठक – द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि महिला वर्गासोबतही साधणार संवाद

Published On - Aug 08,2024 9:00 AM

Follow us
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.