सानपांचा वचपा काढण्यासाठी राऊतांचा नाशिक दौरा; भाजपचे दोन बडे नेते फोडणार?

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत गुरुवारी नाशिकमध्ये येत आहेत. (two big leaders of bjp will join shivsena soon)

सानपांचा वचपा काढण्यासाठी राऊतांचा नाशिक दौरा; भाजपचे दोन बडे नेते फोडणार?
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 3:32 PM

नाशिक: नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत गुरुवारी नाशिकमध्ये येत आहेत. यावेळी नाशिक भाजपमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून भाजपचे दोन बडे नेते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजपचे हे दोन बडे नेते कोण? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपमध्ये गेल्याचा वचपा काढण्यासाठीच राऊत यांचा हा दौरा असल्याचंही बोललं जात आहे.  (two big leaders of bjp will join shivsena soon)

शिवसेना नेते संजय राऊत नुकतेच नाशिकला जाऊन आले होते. त्यावेळी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता राऊत पुन्हा नाशिकमध्ये येत आहेत. राऊत यांचा हा पूर्वनियोजित दौरा नसून केवळ भाजपच्या दोन बड्या नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यासाठीच राऊत नाशिकला येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, हे दोन्ही बडे नेते माजी खासदार, माजी आमदार आहेत की पालिकेतील नेते आहेत? याबाबत गोपनीयता बाळगण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाटेवर असलेले हे दोन नेते कोण? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सानप गेल्याची उणीव भरून काढणार?

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी गेल्या महिन्यात शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. सानप हे पंचवटी परिसरात राहतात. या भागाचं त्यांनी प्रतिनिधीत्व केलं असून पंचवटीत त्यांचा दबदबा आहे. या परिसरातून 24 नगरसेवक निवडून जातात. नाशिकचा महापौर ठरवण्यामागे पंचवटीची नेहमीच मोठी भूमिका राहिली आहे. सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला किमान 15 जागांवर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच सानप यांनी पक्ष बदलल्याचा वचपा काढण्यासाठीच शिवसेनेने नाशिकमध्ये फिल्डिंग लावली आहे. भाजपच्या दोन बड्या नेत्यांना शिवसेनेत असून पालिकेच्या सत्तेवर स्वार होण्याची शिवसेनेची रणनीती असून त्याला कितपत प्रतिसाद मिळतो हे आगामी काळातच दिसून येणार आहे. (two big leaders of bjp will join shivsena soon)

संबंधित बातम्या:

बाळासाहेब सानप यांचा भाजपप्रवेश; पालिका, पंचायत निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला धक्का

नाशिक पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीती, राऊतांचा विश्वासू नेता महानगरप्रमुख

बाळासाहेब सानप पुन्हा भाजपात, काय आहे राजकीय जुगाड?

(two big leaders of bjp will join shivsena soon)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.