AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ निवडणुकीच्या रिंगणात, अनिल परब यांच्याकडून मोठी घोषणा

अनिल परब यांनी गट प्रमुख मेळाव्यातून मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी महाविकासाआघाडीचा पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ निवडणुकीच्या रिंगणात, अनिल परब यांच्याकडून मोठी घोषणा
| Updated on: Oct 17, 2024 | 1:07 PM
Share

Varun Sardesai Will Fight Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्ष जागावाटपावर चर्चा करत आहे. लवकरच सर्वच पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी एक मोठा दावा केला आहे.

अनिल परब यांचे मोठे वक्तव्य

नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनिल परब यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. यावेळी त्यांनी कोणत्या मतदारसंघातून वरुण सरदेसाई निवडणूक लढतील, याबद्दलचीही माहिती दिली आहे. तसेच अनिल परब यांनी उद्धव ठाकरेंबद्दलही एक दावा केला आहे.

वरुण सरदेसाई निवडणूक लढवणार

मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीसाठी वरुण सरदेसाई इच्छुक होते. मात्र ऐनवेळी अनिल परब यांना उमेदवारी दिल्याने वरुण सरदेसाई नाराज झाले होते. यानंतर आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे गटाकडून मोठी खेळी केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वांद्रे पूर्वे विधानसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई हे निवडणूक लढवणार असल्याचे बोललं जात आहे.

त्यातच आता अनिल परब यांनी गट प्रमुख मेळाव्यातून मोठा दावा केला आहे. वरूण सरदेसाई हे बांद्रा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत आणि ते जिंकणार असा विश्वास मला आहे, असे अनिल परब यांनी म्हटले आहे. यासोबतच अनिल परब यांनी महाविकासाआघाडीची पुढील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.

वरुण सरदेसाईंची मोर्चेबांधणी सुरु

दरम्यान वरुण सरदेसाई या मतदारसंघातून निवडणूक लढले तर त्यांची लढत ही आमदार झिशान सिद्दीकी यांच्या विरोधात होऊ शकते, असे बोलले जात आहे. सध्या वरुण सरदेसाई हे या मतदारसंघात मोर्चेबांधणी करत आहेत. वरुण सरदेसाई यांनी पक्षाच्या शाखांना भेटी देणं, सामाजिक उपक्रम राबवणं सुरु केलेलं आहे. तसेच त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर या सामाजिक उपक्रमांचे आणि छत्रीवाटपाचे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या झिशान सिद्दीकीविरुद्ध वरुण सरदेसाई यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.